मुंबई: केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रानं सुरु केलेल्या आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमातील 'संकल्प से सिद्धी' परिषद (sankalp Se Siddhi Council) मुंबईतल्या ताज पॅलेसमध्ये पार पडली. या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मिनाक्षी लेखी, महाराष्ट्र राज्याचे (CHIEF MINISTER) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री (DEPUTY CHIEF MINISTER) देवेंद्र फडणवीस आणि कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण करणार. तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारमध्ये हा पहिला कार्यक्रम आहे. आपचं सरकार उंच भरारीसाठी तयार आहे.
समृद्धी महामार्गाचा लवकरच एक टप्पा सुरू होणार:याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरू करणार आहोत. हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. मी स्वतःला भाग्यशाली समजतो की एवढी मोठी जबाबदारी फडवणीस यांनी माझ्यावर दिली. या समृद्धी महामार्गमुळे शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. गडकरी साहेबांच्या कार्यकाळात १२ ते ३६ किलोमीटरचे रस्ते दररोज होत आहेत. आमच्या सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून विशेष करून सामान्य जनतेच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात आहेत. अगोदर काय झाले ते माहित नाही? परंतु आत्ता विकासकामांना गती येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार असून इलेक्ट्रिक वाहनांवर भर देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राने डिझेल व पेट्रोल वरील वॅट कमी केला आहे. त्या पद्धतीने आता आम्ही राज्यातही तो कमी करण्याचा विचार करत आहोत. आमच्या नवीन सरकारला सर्वांच सहकार्य पाहिजे. राज्याच्या विकासात इंडस्ट्री महत्त्वाची भूमिका बजावते, राज्यातील इंडस्ट्री राज्याबाहेर का गेल्या याचाही विचार आम्ही करणार आहो. हे सरकार शिवसेना-भाजपचं आहे, असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा शिवसेनेला विशेष करून उद्धव ठाकरे यांना टोमणा लगावला आहे. माझा शपथविधी होण्याअगोदरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आशीर्वाद दिला. आम्ही मेहनत करणारे लोक आहोत व आमच्याबरोबर सुपरमॅन गडकरी साहेब आहेत, असं सूचक वक्तव्यही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केलं.