महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मनसुख हिरेन मृत्यु प्रकरण : एटीएसकडून घटनास्थळी नाट्य रूपांतर

मनसुख हिरेन यांच्या मृत्यु प्रकरणी एटीएसने मुंब्रा रेतीबंदर परिसरात शुक्रवारी संपूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केला. शुक्रवारी पहाटे एटीएसच्या पथकाने मुंब्रा रेतीबंदर परिसरात हा क्राईम सीन रिक्रिएट केला.

मनसुख हिरेन मृत्यु प्रकरण : एटीएसकडून घटनास्थळी नाट्य रूपांतर
मनसुख हिरेन मृत्यु प्रकरण : एटीएसकडून घटनास्थळी नाट्य रूपांतर

By

Published : Mar 12, 2021, 2:16 PM IST

Updated : Mar 12, 2021, 4:44 PM IST

ठाणे : मनसुख हिरेन यांच्या मृत्यु प्रकरणी एटीएसने मुंब्रा रेतीबंदर परिसरात शुक्रवारी संपूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केला. यावेळी खाडीला भरती आणि ओहोटी कधी येते, हे जाणून घेण्यासाठी हवामान विभागाचे तज्ञही या पथकासोबत उपस्थित होते. तसेच फॉरेन्सिक टीमही या पथकासोबत उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

एटीएसकडून घटनास्थळी नाट्य रूपांतर

स्थानिक मच्छिमार व हवामान खात्याचीही घेतली मदत
मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणाचा तपास एटीएसकडे दिल्यानंतर एटीएसने मुंब्रा रेतीबंदर परिसरात येऊन हा क्राईम सीन रिक्रिएट केला. विशेष म्हणजे नाट्य रूपांतर कराताना स्थानिक मच्छीमार आणि हवामान खात्याचीही मदत घेण्यात आली. बोटीमधून फिरुनही घटनास्थळाचा अंदाज घेण्यात आला. एटीएसच्या नाट्यरुपांतरापूर्वी दोन टिमने या ठिकाणी पाहणी केली होती. दरम्यान, एनआयएच्या टिमनेही या ठिकाणी भेट देत आढावा घेतला. मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची चौकशी केल्यानंतर रेतीबंदरच्या खाडी किनारी एनआयएच्या पथकाने पाहणी केली आहे.

5 मार्च रोजी आढळला हिरेन यांचा मृतदेह
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या इमारतीबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात ५ मार्च रोजी आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास नंतर एटीएसकडे सोपविण्यात आला.

हेही वाचा -मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : सचिन वझेंची नियंत्रण कक्षात बदली

Last Updated : Mar 12, 2021, 4:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details