महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जुहू परिसरातील बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा - Gundappa Devendra death penalty Mumbai

साकीनाका बलात्कार आणि खून खटल्याच्या निकालानंतर आता मुंबईतील न्यायालयाने जुहू परिसरातील बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2019 साली ही घटना घडली होती. आरोपीने 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता.

Juhu rape accused death penalty
जुहू बलात्कार आरोपी

By

Published : Jun 4, 2022, 1:36 PM IST

मुंबई -साकीनाका बलात्कार आणि खून खटल्याच्या निकालानंतर आता मुंबईतील न्यायालयाने जुहू परिसरातील बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2019 साली ही घटना घडली होती. आरोपीने 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. गुंडप्पा देवेंद्र असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा -सरसंघचालकांच्या शिवलिंगाच्या भूमिकेवरुन शिवसेनेने टोचले भाजपचे कान

ही घटना ४ एप्रिल २०१९ रोजी घडली होती. आरोपी गुंडप्पाने मुलीचे अपहरण केले व तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली होती. मुलीचा मृतदेह नंतर गटारात सापडला होता. त्यानंतर जुहू पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. न्यायालयाने आरोपीला भा.दं.वि च्या कलम ३६३, ३७६, ३०२, २०१ आणि पोक्सोच्या कलमांतर्गत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा -महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणी ( Sakinaka Rape Case ) न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा केली. बलात्कार आणि हत्या केल्या प्रकरणात आरोपी मोहन कतवारू चौहानला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात दिंडोशी सत्र न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

हेही वाचा -सरसंघचालकांनी पक्ष बदलला का? सुप्रिया सुळेंना पडला प्रश्न

ABOUT THE AUTHOR

...view details