महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मानखुर्दमध्ये लोकलवर दगडफेक करणाऱ्यास अटक - मानखुर्द

अटक करण्यात आलेला आरोपी कन्नन हरिजन हा ठाणे व कापूरबावडी पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यांत 10 महिने शिक्षा भोगून बाहेर आला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने ओळख पटवून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांनी दिली.

मानखुर्द मध्ये लोकलवर दगडफेक करणाऱ्यास अटक

By

Published : Jul 29, 2019, 10:09 AM IST

मुंबई-हार्बर मार्गावरील वाशी ते मानखुर्द लोकलवर दगडफेक करणाऱ्याला वाशी रेल्वे पोलिसांना अटक केली आहे. 26 जुलैच्या सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास वाशी ते मानखुर्द दरम्यान धावत्या लोकलवर दगडफेक झाली होती. यावेळी आर. के. यादव या लोकलच्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात दगड लागल्याने ते जखमी झाले होते.

रेल्वे पोलिसांनी लोकलवर दगडफेक करणाऱ्या कन्नन धनपाल हरिजन वय 20 यास मानखुर्द परिसरातील मुंशी शाळेच्या परिसरातून अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी कन्नन हरिजन हा ठाणे व कापूरबावडी पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यांत 10 महिने शिक्षा भोगून बाहेर आला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने ओळख पटवून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांनी दिली.

शुक्रवारी वाशी वरून सीएसएमटीकडे निघालेली हार्बर मार्गावरील लोकल मानखुर्द रेल्वे स्थानक जवळ येताच या लोकलवर दगडफेक करण्यात आली. दगड लोकलच्या शेवटच्या डब्यावर पडले. यातील काही दगड मोटरमनच्या केबिन मध्ये गेले यात आर. के. यादव यांच्या डोक्याला दगड लागल्याने ते जखमी झाले होते.

मुंबईत लोकलवर दगडफेकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक दिवसापासून लोकलवर बाटली फेक, चालत्या लोकलवर फटका मारणे आणि दगडफेकीचा घटना वाढत असताना रेल्वेच्या सुरक्षेविषयी आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details