मुंबई मुंबईमध्ये पावसाळा सुरु झाल्यावरपावसाळी आजार डोके वर काढतात. यंदाही पावसाळी आजाराला सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात स्वाईन फ्ल्यूच्या १०५ रुग्णांची नोंद झाली होती. आता १ ते २८ ऑगस्ट या २८ दिवसात मलेरियाच्या ७३६, डेंग्यूचे १४७ तर एच १ एन १ म्हणजेच स्वाईन फ्लूच्या १८३ रुग्णांची नोंद झाली आहे. मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यूसह Malaria, dengue, swine, flu इतर पावसाळी आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णसंख्येत वाढMalaria, dengue, swine, flu patients मुंबईमध्ये १ ते २८ ऑगस्ट दरम्यान मलेरियाचे ७३६ रुग्ण, लेप्टोचे ६१, डेंग्यूचे १४७, गॅस्ट्रोचे ४४४, हेपेटायसिसचे ५१, चिकनगुनियाचे ३ तर एच १ एन १ च्या १८३ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील महिन्यात म्हणजेच जुलै २०२२ मध्ये मलेरियाचे ५६३ रुग्ण, लेप्टोचे ६५, डेंग्यूचे ६१, गॅस्ट्रोचे ६७९, हेपेटायसिसचे ६५, चिकनगुनियाचे २ तर एच १ एन १ च्या १०५ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी ऑगस्ट २०२१ मध्ये मलेरियाचे ८४८ रुग्ण, लेप्टोचे ३७, डेंग्यूचे १४३, गॅस्ट्रोचे ३००, हेपेटायसिसचे ३५, चिकनगुनियाचे ८ तर एच १ एन १ च्या १८ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी लेप्टोमुळे ३ तर डेंग्यूमुळे ३ अशा ६ जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षी आतापर्यंत मलेरियाने १, लेप्टोने १, डेंग्यूने २ तर एच १ एन १ ने २ अशा ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
अशी घ्या काळजी मुंबईमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ताप, खोकला, घशात खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, डायरिया, उलटी अशी लक्षणे असलेल्या नागरिकांनी त्वरित उपचार करून घ्यावेत. शिकताना आणि नाक पुसण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा. नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून घ्यावे. हात साबणाने, पाण्याने स्वच्छ धुवावेत. डोळे नाक आणि तोंड यांना हात लावू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. मोठ्या प्रमाणात ताप आला असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, त्वचा, डोळे, ओठ पडल्यास त्वरित पालिकेच्या रुग्णालयात उपचार करून घ्यावे अन्यथा त्याचा मृत्यू होऊ शकतो, असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.