मुंबई - खुनी लोकांचे समर्थन करणारे हे सरकार आहे. तसेच, हे सरकार दाऊत समर्पित सरकार आहे. आपण बाकी सोडा, दाऊदशी सबंधीत व्यक्तीशी हे व्यव्हार करतात. यांना मुंबईत दुसरा व्यक्ती सापडला नाहीका? असा प्रश्न उपस्थित करत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. (Fadnavis Comment On Govt) मुंबईवर बॉंबस्फोट करण्यासाठी मदत करणाऱ्यांशी यांचे संबंध आहेत. हा राष्ट्रवादीचा खरा चेहरा आहे असा आरोपही फडणीसांनी यावेळी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मी विधान सभेत काही पुरावे बाहेर काढणार
मी कधीच हवेत आरोप करत नाही. मी पुराव्यानिशी आरोप करतो. त्यामुळे मी तुम्हाला हवेतही माहिती देणार नाही असे म्हणत मी विधान सभेत काही पुरावे बाहेर काढणार आहे असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याने उद्यापासून सुरू होत असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच गाजणार आहे अस दिसतय. तसेच, सरकारने आमंत्रित केलेल्या चहापाण्याच्या कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत असही फडणवीस म्हणाले आहेत.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप व मित्र पक्षाची आज अधिवेशनाच्या पूर्व संध्येला बैठक झाली. यात कुठले मुद्दे प्रामुख्याने मांडायचे या बाबत चर्चा झाली. देशाच्या इतिहासात कधी घडले नाही ते महाराष्ट्रात पाहायला भेटत आहे असे सांगत, देशद्रोही दाऊद इब्राहिम बरोबर मनी लाॅंडरींग करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला पूर्ण सरकार उभे राहिले आहे. त्यामुळे या सरकार बरोबर चहापान करण्यात आम्हाला कुठलाही रस नाही असे सांगत विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारच्या चहापानावर बहिष्कार केला. मुंबई झालेल्या बैठकी नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.
नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही
याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की देशद्रोही दाऊद बरोबर जमिनीचे व्यवहार केल्याप्रकरणी मंत्री नवाब मलिक
पोलिस कस्टडी मध्ये गेल्यावर सुद्धा सरकार त्यांचा राजीनामा घेत नाही. तसेच शिवसेना, मुख्यमंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ पुढे येतात. परंतु आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे यासाठी सभागृहात संघर्ष करू. त्याशिवाय सभागृह चालू देणार नाही.आम्हाला चर्चा करण्यात रस आहे. अनेक दिवसा नंतर हे जास्त दिवसाचे अधिवेशन होत आहे. पण आम्हाला सविस्तर चर्चा हवी. सरकार कडून जर लोकशाही पायदळी तुडविली जात असेल तर ते आम्ही सहन करणार नाही.
शेतकऱ्यांच्या व राज्याच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील
अजित पवार यांच्या शब्दाला कुठलीही किंमत नाही. मागच्या अधिवेशनात विजेचे कनेक्शन आम्ही कापणार नाही असे ते म्हणाले होते. आता उघडपणे वीज कनेक्शन कापले जात आहेत. शेतकऱ्यांवर पूर्वी आस्मानी व आता सुलतानी संकट आहे. जनते बाबत अहंकारी भूमिका या सरकारची आहे. ऊसाचा मोठा प्रश्न समोर आहे. मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र सर्व ठिकाणी ऊसाचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांना सरकारचे अनुदान भेटले नाही आहे, त्या बाबत आमचा आग्रह असणार आहे.
या सरकारला दारू उत्पादन करणारा घटक जवळचा वाटतो
या अधिवेशनात मराठा, ओबीसी आरक्षण महत्वाचा मुद्दा आहे. मराठा समजाच्या सुरू असलेल्या योजना बंद करण्याचे काम या सरकारने केले आहे. महाज्योती योजना बंद करण्याचं काम हे सरकार करत आहे. जो पर्यंत याला निधी भेटत नाही तो पर्यंत संघर्ष करणार. आदिवासी विभागवार मोठा अन्याय होत आहे, परीक्षांचे घोटाळे, भ्रष्टाचार चरण सीमेला आहेत. कायदा सुव्यवस्था स्थिती अतिशय वाईट आहे. अधिकाऱ्यांना बंदुकीचा परवाना कंत्रादारांकडून वाचण्यासाठी हवा आहे. या सरकारला दारू उत्पादन करणारा घटक जवळचा वाटतो. परंतु, १२ बलुतेदारांसाठी काही निर्णय नाही. वाळू तस्करी, खंडणी या बाबत या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ठाकरे सरकार मधील लोक दाऊदची धुणी-भांडी करतात ती बंद करा
नवाब मलिक यांचा राजीनामा न घेणे म्हणजे हा निर्णय एक विशिष्ठ समजाला समोर ठेऊन केला गेला आहे असे फडणवीस म्हणाले. संजय राठोड यांचा राजीनामा होतो पण नवाब मलिक यांचा राजीनामा होत नाही. आमच्या लोकांना मागील २ वर्षापासून टार्गेट केले जात आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाही होत आहे. महा विकास आघाडी सरकार हे कांगावा करणारे सरकार आहे असे सांगत महाराष्ट्र झुकणार नाही पण आम्ही तुम्हाला झुकऊ. तुमच्यातील काही लोक दाऊदची धुणीभांडी करतात ती बंद करा. असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे. तसेच एसटी च्या ८० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या हे या सरकारला दिसत नाही. अहंकार सरकारच्या डोक्यात गेला आहे. या संदर्भात जो काही अहवाल आला आहे तो सार्वजनिक करायला हवा अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. तसेच ऑपरेशन गंगा च्या माध्यमातून मोदी सरकार परदेशात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढायचा प्रयत्न करत आहे असेही ते म्हणाले.
हेही वाचा -Indian Student In Ukraine : युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्याचा अनुभव ईटीव्ही भारत'वर