महाराष्ट्र

maharashtra

Mahavikas Aghadi-BJP Protest : राज्यात आज महाविकास आघाडी आणि भाजपाचे एकमेकांविरोधात आंदोलन

By

Published : Feb 24, 2022, 11:41 AM IST

Updated : Feb 24, 2022, 10:51 PM IST

live news
लाईव्ह अपडेट्स

14:12 February 24

ईटीव्ही भारत प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी आढावा घेतला

ईटीव्ही भारत प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी आढावा घेतला

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर महा विकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून ईडी च्या आणि केंद्र सरकारच्या विरोधात महा विकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी आंदोलन केले. मंत्रालयाच्या परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या समोर बसून शांततेने सुरू असलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनात केंद्र सरकार आणि व्हिडिओ च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून करण्यात आली. केंद्र सरकार राज्याच्या कारभारामध्ये केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून हस्तक्षेप करत आहे. नेत्यांना मंत्र्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र याचा कडवट प्रतीकार येणाऱ्या काळामध्ये केला जाईल असा इशारा महाविकासआघाडी कडून देण्यात आला आहे. या आंदोलनात केंद्रसरकार आणि तिच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी कार्यकर्ता तसेच नेत्यांकडून करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे मंत्री मोठ्या प्रमाणात सहभागी झाले असले तरी आज शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई वगळता इतर मंत्री किंवा ज्येष्ठ नेते अनुपस्थित राहिल्याने शिवसेनेच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र उत्तर प्रदेश मधील ज्येष्ठ नेत्यांचा दौरा आणि आंगणेवाडीची जत्रा असल्याने शिवसेनेचे जेष्ठ नेते मंडळी आणि मंत्री अनुपस्थित असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सांगण्यात आले होते. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी

12:23 February 24

मलिकांच्या अटकेवर आसामच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

नवाब मलिकच्या अटकेवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, फक्त ईडीला कायदेशीर बाबी कळतील, मी त्यावर भाष्य करू इच्छित नाही, परंतु प्रथमदर्शनी जेव्हा तुम्हाला कळते की दाऊदशी जमिनीचा कोणाचा तरी व्यवहार आहे, तेव्हा असे होत नाही. मला वाटते शिवसेना कठोर कारवाई करेल, असे ते म्हणाले,

12:09 February 24

महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसलेले महाविकास आघाडीचे नेते, मंत्री उपस्थिती

जोरदार घोषणाबाजी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सुप्रियाताई सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक, नगरसेवक कप्तान मलिक, सलील देशमुख, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, मंत्री अस्लम शेख, गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, मंत्री के. सी. पाडवी, लोकभारतीचे आमदार कपिल पाटील, कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, प्रवक्ते सचिन सावंत, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, माजी खासदार हुसेन दालवाई, माजी मंत्री नसीम खान, युवराज मोहिते, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई, आमदार सुनील राऊत, आमदार मनिषा कायंदे, उपनेते सचिन अहिर, आमदार यामिनी जाधव, आमदार योगेश कदम, माजी आमदार विनोद घोसाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार अशोक पवार, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार संजय जगताप, आमदार संजय दौंड, आमदार चेतन तुपे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुनिल अण्णा टिंगरे, आमदार कारेमोरे, आमदार चंद्रीकापुरे, भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी आमदार हेमंत टकले,माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ,आमदार पोतनीस, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, आमदार अमर राजोरकर,प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदींसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित आहेत.

11:51 February 24

नागपुरात भाजपाचे आंदोलन

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणी नागपूर भाजपाने आंदोलन केले आहे. नागपुरातील आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

11:25 February 24

छगन भुजबळांची प्रतिक्रिया

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने आंदोलन करण्यात येत असले तरी शिवसेनेचे नेते आणि मंत्री अद्यापही आंदोलन सही पोहोचलेले नाहीत याबाबत तर्कवितर्क लढवले जात असले तरी शिवसेनेचे नेते आणि मंत्री लवकरच आंदोलनस्थळी पोहोचतील अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

11:14 February 24

आंदोलनात शिवसेनाही सामिल

महाविकास आघाडी आंदोलन

महाविकास आघाडीच्या आंदोलनात शिवसेना नेते सुरुवातीला दिसले नाहीत. त्यामुळे माध्यमांच्यामध्ये वेगळी चर्चा रंगली होती. मात्र शिवसेना नेते आंदोलनात सहभागी आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई आंदोलनस्थळी दाखल झाले. तसेच भाजपाकडून काही बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केला.

10:47 February 24

राज्यात आज महाविकास आघाडी आणि भाजपाचे आंदोलन

महाविकास आघाडी आंदोलन

मुंबई - ईडीने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राज्याचे राजकिय वातावरण तापले आहे. मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्ध महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निदर्शने देण्यात येत आहे. तर मलिक यांना अटक झाल्याने त्यांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजपा आंदोलन करत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आंदोलनमय झाला आहे.

Last Updated : Feb 24, 2022, 10:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details