महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Monsoon Updates : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. उद्यापर्यंत मान्सून महाराष्ट्रात होणार दाखल.. - Maharashtra Monsoon Updates

शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. आगामी २४ तासांमध्ये महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मान्सूनला पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून, लवकरच उन्हाने त्रस्त झालेल्या मराठीजनांना पावसाचा सुखद गारवा मिळणार आहे.

Maharashtra Monsoon Updates
महाराष्ट्र मान्सून अपडेट्स

By

Published : Jun 10, 2022, 7:04 AM IST

मुंबई :पुढील २४ तासांत महाराष्ट्रासह देशातील काही प्रदेशात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यामध्ये मध्य अरबी समुद्रासह, गोवा, दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडूचा काही भाग आणि दक्षिण आंध्र प्रदेशातील काही भागांत मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील 2 दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

..तरच मान्सूनला मिळणार बळकटी :कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विशेषतः सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. मान्सूनच्या प्रगतीसाठी पूर्व मोसमी पावसाचा उपयोग होणार असल्याचा अंदाज आहे. मान्सूनचा पाऊस दक्षिण कर्नाटकात थांबला आहे. त्याठिकाणी कारवार, चिकमंगलळूर, बंगळूर, धर्मापुरी दरम्यान स्थिर झाला आहे. कर्नाटकात रेंगाळलेल्या मान्सूनला बळकटी मिळाल्यास तो महाराष्ट्रात पुढील वाटचाल करेल.

राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज -भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकतेच मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला असून, त्यामध्ये देशात यंदा १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण, मुंबई तसेच पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.


कोकणात सुरुवात :गोव्याच्या वेशीवर रखडलेल्या मान्सूनने आता कोकणात एंट्री केली आहे. काल दिवसभर कोकणात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी हलक्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. सुमारे एक तासाहून अधिक काळ हलका पाऊस झाला आहे. रत्नागिरीसह संगमेश्‍वर, लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली आहे.

हेही वाचा : TODAYS GOLD SILVER RATES : सोने- चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ.. जाणून घ्या देशभरातील बाजारभाव

ABOUT THE AUTHOR

...view details