मुंबई -महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिमेकडे वाहत जाणारे पाणी पूर्वेला कसे वळवता येईल, याबाबत आज शनिवारी जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या प्रयोगासाठी काय उपाययोजना करता येईल, कसा प्रकारे त्याला गती देता येईल, याबाबत चर्चा झाली. या बैठकीला माजी कृषीमंत्री शरद पवार हे देखील उपस्थित होते.
हेही वाचा... 'कोट्यवधीचा निधी खर्च झालाय.. सिंचन घोटाळ्याचे सत्य पुढे आलेच पाहिजे'
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही बैठक पार पडली. शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मराठवाड्यातील पाणी प्रश्नांबाबत काय उपाययोजना करण्यात येतील, याचा आढावा घेण्यात आला. यावेळी जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते. मराठवाड्याला अतिरिक्त पाणी देण्याचा आमचा मानस आहे. तसेच नाशिक, जळगाव जिल्ह्याचा पाणी प्रश्नही सोडवला जाईल, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. यावेळी राज्याच्या जलसंपदा विभागाचे मंत्री आणि खात्याचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांच्याकडून दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्प, या आंतरराज्य नदीजोड योजनांबाबत आढावा घेण्यात आला.