मुंबई -संचारबंदीच्या काळात चिकन, मटण दुकाने खुली ठेवण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवल्याने गरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यानंतर शहरातील चिकन आणि मटण विक्रेत्यांनी दुकाने उघडली आहेत.
चिकन, मटण, मासेविक्रीला परवानगी; नागरिकांमध्ये आनंद
संचारबंदीच्या काळात चिकन, मटण दुकाने खुली ठेवण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवल्याने गरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यानंतर शहरातील चिकन आणि मटण विक्रेत्यांनी दुकाने उघडली आहेत.
कोरेनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक, खासगी कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आल्या होत्या. यामध्ये भाजीपाला, मेडिकल व अन्य अत्यावश्यक सेवांचा समावेश होता. मात्र, आज यामध्ये अंडी, चिकन, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीचा समावेश करण्यात आला असून त्याच्या विक्रीवरील बंधने उठवण्यात आली आहेत.
कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही कोरोनासंदर्भात आवश्यक स्वच्छता व सुरक्षितता बाळगायची आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.