महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Corona Update : रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार सुरूच; मंगळवारी ५६०९ नवे रुग्ण, १३७ मृत्यू - maharashtra corona new cases

मंगळवारी राज्यात ५६०९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, १३७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३४,२०१ मृत्यूची नोंद झाली आहे.

Corona Update
Corona Update

By

Published : Aug 10, 2021, 9:54 PM IST

मुंबई -राज्यात रविवारी कोरोना विषाणूच्या ५ हजार ५०८ रुग्णांची नोंद झाली. सोमवारी त्यात घट होऊन ४ हजार ५०५ रुग्णांची नोंद झाली. त्यात मंगळवारी वाढ होऊन ५ हजार ६०९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल सोमवारी ६८ मृत्यूंची नोंद झाली होती त्यात मंगळवारी वाढ होऊन १३७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात गेले काही दिवस रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार सुरू आहे.

हेही वाचा -थेट मंत्रालयातच 'चिअर्स'! दारूच्या बाटल्या सापडल्या, विरोधक आक्रमक

  • ७७२० रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात मंगळवारी ७७२० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,५९,६७६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८ टक्के एवढे झाले आहे. मंगळवारी राज्यात ५६०९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, १३७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३४,२०१ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९९,०५,०९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६३,४४२ (१२.७५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,१३,४३७ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ६६,१२३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • मृत्यूदर २.१ टक्के -

१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा -विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! 17 ऑगस्टपासून शाळा सुरु, अशा असतील मार्गदर्शक सूचना

  • या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई - २३९
रायगड - १२९
अहमदनगर - ५६३
पुणे - ५८४
पुणे पालिका - २४७
पिपरी चिंचवड पालिका - १३८
सोलापूर - ५६५
सातारा - ७८२
कोल्हापूर - ३६९
कोल्हापूर पालिका - ७९
सांगली - ५४६
सांगली मिरज कुपवाडा पालिका - १५६
सिंधुदुर्ग - १०५
रत्नागिरी - १५८
उस्मानाबाद - २०१
बीड - १५४

  • मागील काही दिवसातील रुग्णसंख्या -

10 ऑगस्ट - 5609 नवे रुग्ण
9 ऑगस्ट - 4505 नवे रुग्ण
8 ऑगस्ट - 5508 नवे रुग्ण
7 ऑगस्ट - 6061 नवे रुग्ण
6 ऑगस्ट - 5539 नवे रुग्ण
5 ऑगस्ट - 6695 नवे रुग्ण
4 ऑगस्ट - 6126 नवे रुग्ण
3 ऑगस्ट - 6005 नवे रुग्ण
2 ऑगस्ट - 4869 नवे रुग्ण
1 ऑगस्ट - 6479 नवे रुग्ण
31 जुलै - 6959 नवे रुग्ण
30 जुलै - 6600 नवे रुग्ण
29 जुलै - 7242 नवे रुग्ण
28 जुलै - 6857 नवे रुग्ण
27 जुलै - 6258 नवे रुग्ण
26 जुलै - 4877 नवे रुग्ण
18 जुलै - 9000 नवे रुग्ण
7 जुलै - 9558 नवे रुग्ण
5 जुलै - 6740 नवे रुग्ण
4 जुलै - 9336 नवे रुग्ण
3 जुलै - 9489 नवे रुग्ण
1 जुलै - 9195 नवे रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details