मुंबई -कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा शाळा पूर्णपणे सुरू होणार आहेत. या शाळांची तयारी कशी सुरु आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक कशी वेळ दिली जाईल या सगळ्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत.
प्रश्न - शाळांसाठी आपली तयारी काय आहे, पाठ्यपुस्तके लवकर देण्यासाठी आपण काय करतो?
काही मुलांनी ऑफलाइन नंतर पुढे ऑनलाईन, असे शिक्षण घेतले. ऑफलाइन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुलांचे शाळेमध्ये येणं सुरू झाले, त्यामुळे येणारे हे वर्ष हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण दोन वर्षानंतर मुले पूर्णपणे शाळेत येतील. बालवाडी आणि पहिलीत जाणाऱ्या मुलांना आत्मविश्वास मिळावा. मुलांना बेसिक गोष्टींचे ज्ञान असावे, त्यासाठी त्यांच्या पालकांनी लक्ष घालावे. कारण, जोपर्यंत पालक सहभागी होत नाही, तोपर्यंत शिक्षणामध्ये मुले प्रगती करु शकत नाही. यासाठी आम्ही व्हॉट्सअॅप वर मातांचे ग्रुप्स तयार केले आहे. त्यातून जवळपास चार लाख माता जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामाध्यमातून पहिले पाऊल हे अभियान करत आहे. त्याचा पहिला मेळावा झाला आहे. दुसरा मेळावा 13 जूनला होणार आहे. जेव्हा 15 जूनला मुले शाळेत येतील तेव्हा त्यांचा पहिले पाऊल मजबुतीचा असावा हा आमचा प्रयत्न आहे. गणवेश खरेदीसाठी पैसे देण्यात आले आहे. 13 तारखेपर्यंत मुलांच्या पुस्तक मिळाली पाहिजे. कारण मुलांच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना शालेय जीवनात पुस्तक, दप्तर, ड्रेस हे वातावरण खूप आनंददायी असते. हे वर्ष मुलांसाठी आनंद घेऊन येणार असून, सक्षम, आत्मविश्वास निर्माण करणारे आहे.
प्रश्न - डिजिटायझेशन करण्यासंदर्भात आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावले उचलली आहेत. नेमके आपण यात काय करतो?
आदर्श शाळांच्या माध्यमातून आम्ही नव्याने खूप सारे उपक्रम करत आहोत. त्यामध्ये संरक्षण, गुड टच बॅड टच, वोकेशनल एज्युकेशन आणि आपली शाळा कशी असली पाहिजे, याची संकल्पना असे विविध अभियान उपक्रम राबवण्याचा आपला प्रयत्न आहे. आपले एक लाखांपेक्षा अधिक शाळा आणि जिल्हा परिषद जवळपास 65 हजार शाळा सुधारण्याचे काम करण्याचे प्रयत्न झाला आहे. या वर्षी आम्ही आदर्श शाळांसाठी 300 कोटी रुपयांचे बजेट केले आहे. मराठवाड्यातील निजामकालीन ज्या शाळा आहेत त्यासाठी राजमाता जिजाऊ शिक्षण अभियान सुरू केलेले आहे.
प्रश्न - धारावीचा जो प्रकल्प आहे, तो गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक वेळा त्याच्या निविदा निघाल्या, जागतिक स्तरावर निघाल्या. परंतु,आता काही होत नाही नेमकी त्याची स्थिती काय? ऑस्ट्रेलियन राजदूत आज सुद्धा तिकडे जाणार नेमकं काय,?
मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून धारावी देशाला जरवर्षी 100 कोटी रुपये देतो. त्यामुळे धारावी डेव्हलपमेंटच्या माध्यमातून कशा पद्धतीने भविष्यात गोष्टी घडणार आहेत. त्यांना माहिती हवी होती. धारावीचा जेव्हा उल्लेख केला जातो, तेव्हा ती मोठी झोपडपट्टी म्हटले जाते. त्याशिवाय सुद्धा धारावीची ओळख आहे. अनेक समाजाचे लोक एकत्र राहतात. एकमेकांचे सण साजरे करतात. आजच्या परिस्थितीला जर सगळ्यात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे हम सब एक है हे धारावीने दिलेले ब्रीदवाक्य आज जगामध्ये गेले आहे. त्यामुळे एक सामाजिक सलोखा, मायक्रो फायनान्स व्यवसायात काम करणारी आणि धारावीचा होणारा विकास या तीन विषयावरती भेटण्यासाठी ते येणार आहे. मला अपेक्षा आहे की, त्यांच्या माध्यमातून धारावी बद्दलचा चांगली दृष्टीकोन जगासमोर जाईल.