मुंबई - आज राज्यात ५ हजार ३६३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ७ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १४ लाख ७८ हजार ४९६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.३९ टक्के एवढे झाले आहे.
हेही वाचा -रेडीरेकनर दर कपातीत राज्याचे २० हजार कोटींचे नुकसान? भाजप आमदाराचे राज्यपालांना पत्र
राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४३ हजार ४६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७ लाख ३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ५४ हजर ०२८ (१९.०१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख २८ हजार ९०७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, १३ हजार २३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ लाख ३१ हजार ५४४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या जवळ
राज्यातील कोरोना संसर्गाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच रिकव्हरी रेटही ९० टक्क्यांच्या जवळ पोहचला आहे. तर, कोरोना मृतांची संख्याही घटली आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना संसर्गाने थैमान घातले होते. राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. यातच ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे.
हेही वाचा -न्यायालयात सरकारचे वकील उपस्थित राहत नाहीत, ही अतिशय गंभीर बाब - संभाजीराजे