महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Politics शिंदे- फडणवीस सरकारच्या कामाचा सपाटा; गोरगरीब जनतेपासून श्रीमंता पर्यंत सर्वांसाठी सरकार काम करतेय ?

Maharashtra Politics राज्यातील नाट्यमय सत्तांतरानंतर आखिरकार 2 महिन्यापूर्वी शिंदे- फडणवीस सरकार Shinde Fadnavis Govt अस्तित्वात आले आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी घेतलेल्या पावित्र्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेची पूर्णतः वाताहात झाली. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांना विराजमान करून भाजपने एक नवी खेळी खेळली आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics

By

Published : Sep 2, 2022, 5:59 PM IST

मुंबई राज्यातील नाट्यमय सत्तांतरानंतर आखिरकार 2 महिन्यापूर्वी शिंदे- फडणवीस सरकार Shinde Fadnavis Govt अस्तित्वात आले आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी घेतलेल्या पावित्र्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेची पूर्णतः वाताहात झाली. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांना विराजमान करून भाजपने एक नवी खेळी खेळली आहे. यानंतर हे सरकार जास्त दिवस चालणार नाही, अशी टीका महाविकास आघाडी नेत्यांकडून सुरू झाली. पण ज्या पद्धतीने मागील दोन महिने या सरकारने निर्णय घेतले आहे, ते पाहता हे सरकार सर्व सामान्य जनतेपासून श्रीमंतापर्यंतचे हे सरकार आहे. ते तुमच्या पाठीशी आहे, हा संदेश देण्याचे काम शिंदे- फडवणीस करत आहे.

हे सरकार जनतेचे ? सरकार स्थापन झाल्यावर सुरुवातीलाच राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हाल बेहाल झाले आहेत. अशात फक्त 2 व्यक्तींच असणारे सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी राज्यभर अतिवृष्टी पाहणीचे दौरे सुरू केले. यादरम्यान शेतकऱ्यांसाठी मदतीच्या विविध घोषणाही केल्या आहेत. सरकारने घेतलेल्या काही निर्णयांना तात्पुरती स्थगिती देत जनहितासाठी निर्णय घेतले आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून असलेले निर्बंध पूर्णतः उठवण्यात आले. हिंदूंचे सण पुन्हा धुमधडाक्यात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. या कारणामुळे राज्यात विशेष करून युवा वर्गात मोठ्या प्रमाणात उत्साह संचारला आहे. तात्काळ निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे हे सरकार अति वेगाने काम करते आहे, अशी भावना जनतेत, सरकार विषयी निर्माण झाली आहे, असे सरकारला वाटत आहे.

विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर मागच्याच महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये शिंदे- फडणवीस सरकार हे विरोधकांवर हावी ठरले. हे सरकार कशा पद्धतीने काम करू शकते. सरकारने घेतलेले निर्णय किती महत्त्वाचे आहेत. हे शिंदे फडणवीस सरकारने Shinde Fadnavis Govt दाखवून दिलं आहे. या अधिवेशनात विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल Attack the government करण्याचा एकही प्रयत्न सोडला नाही. परंतु, शिंदे- फडणवीस सरकारने दोन्ही सभागृहात त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देत विरोधकांना शांत केले आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवरील सत्ताधारी व विरोधक यांच्याकडून होणारी घोषणाबाजी हा तर नित्य नियमाचा भाग झाला होता.

उद्धव ठाकरे यांना जमलं नाही, ते करण्याचा प्रयत्न ? आता राज्यात राजकीय हालचालींना वेग आलेला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्याने राजकारणातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांना पुन्हा सोडण्यासाठी ते स्वतः अँटीलियाच्या गेटपर्यंत आल्याने यांच्यात असलेले संबंध सर्वश्रुत झाले आहेत. एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री असतील जे उघडपणे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी गेले आहे. मागील काही वर्षापासून मुकेश अंबानीसह त्यांच्या कुटुंबीयांना असलेला धोका लक्षात घेता, ते चर्चेत राहिले होते. परंतु आता शिंदे- फडणवीस यांनी स्वतः अंबानी यांच्या घरी भेट देऊन सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी असल्याचे त्यांनी दाखवून दिलं आहे. ही सरकारसाठी जमेची बाजू असणार आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना ज्या गोष्टी जमल्या नाहीत, त्या सर्व करण्याचा प्रयत्न शिंदे- फडणवीस सरकार करताना दिसत आहे. ही शिंदे गटासाठी व त्याचबरोबर भाजपसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे.

शिवसेनाला संपवण्याचे भाजपचे षडयंत्र ? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची सुद्धा सदिच्छा भेट घेतली होती. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती बाप्पाच्या दर्शनाचे निमित्त साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ, या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला पोहचले. तब्बल पन्नास मिनिटे त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी जरी सांगितलं असलं, तरी सुद्धा शिंदे गेट व उद्धव ठाकरे गट यांच्यातील वादाचा निकाल अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरण पुन्हा बदलू शकतात आणि म्हणूनच ही भेट सुद्धा महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री, शिवसेना ज्येष्ठ नेते, मनोहर जोशी त्याचबरोबर तसेच शिवसेना सचिव, मिलिंद नार्वेकर यांच्या घरी सुद्धा गणपती दर्शनासाठी भेट देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला डिवचलं आहे. येणाऱ्या दिवसात राज्याच्या राजकारणातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पूर्णपणे हद्दपार करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून एकीकडे मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांना विराजमान केलं असून दुसरीकडे ठाकरे घराण्याचेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधून सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेला पुन्हा उभारण्याची एकही संधी न देता, चारी मुंड्याचित करण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे.

हेही वाचाNanded Crime हवी असलेल्या ब्रँडची बिअर मिळाली नसल्याने आला राग, बार मॅनेजरचा खंजीर खुपसून खून

ABOUT THE AUTHOR

...view details