मुंबई -दिवसेंदिवस मुंबईतून जलमार्गाने एलिफंटा व अलिबाग जाणाऱ्या पर्यटकांची आणि प्रवाशांची संख्या वाढत जात आहेत. त्यामुळे गेट वे ऑफ इंडियावरील जेट्टीवर मोठ्या प्रमाणात ताण येतो आहेत. हा ताण कमी करण्यासाठी आणि पर्यटकांचा सुविधेसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबईतील कुलाब्यातील रेडिओ क्लब येथे नवी जेट्टी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता सागरी महामंडळाकडून निविदा सुद्धा काढण्यात आली आहे. या नव्या जेट्टीमुळे प्रवासी वाहतूक क्षमता तिप्पटीने वाढणार असल्याने पर्यटकांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अलिबाग व एलिफंटा जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर; 'गेट वे ऑफ इंडिया'ची प्रवासी वाहतूक क्षमता तिप्पटीने वाढणार! - new jetty at radio club in colaba at mumbai
मुंबईच्या नजीकच्या शहरांना जलमार्गाने जोडणाऱ्याचा आणि जल वाहतुकीसाठी नव्या जेट्टी उभारण्याचे काम महाराष्ट्र सागरी मंडळाकडून करण्यात येत आहेत.आता गेट वे ऑफ इंडियावरील जेट्टीवर ताण कमी करण्याकरिता आणि प्रवासी वाहतूकीची क्षमता वाढविण्यासाठी कुलाब्यातील रेडिओ क्लब येथे नवी जेट्टी उभारण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. याकरिता सागरी महामंडळाकडून निविदा सुद्धा जाहीर केली आहे. या जेट्टी उभारण्याकरिता अंदाजित १३० कोटी रुपयांच्या खर्च अपेक्षित आहेत.
कुलाब्यातील रेडिओ क्लब येथे नवी जेट्टी - सागरमाला उपक्रमांतर्गत देशातील समुद्रकिनार्याचा उपयोग करून जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली आहे. त्यामाध्यमातून मुंबईच्या नजीकच्या शहरांना जलमार्गाने जोडणाऱ्याचा आणि जल वाहतुकीसाठी नव्या जेट्टी उभारण्याचे काम महाराष्ट्र सागरी मंडळाकडून करण्यात येत आहे. आता गेट वे ऑफ इंडियावरील जेट्टीवर ताण कमी करण्याकरिता आणि प्रवासी वाहतूकीची क्षमता वाढविण्यासाठी कुलाब्यातील रेडिओ क्लब येथे नवी जेट्टी उभारण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. याकरिता सागरी महामंडळाकडून निविदा सुद्धा जाहीर केली आहे. या जेट्टी उभारण्याकरिता अंदाजित १३० कोटी रुपयांच्या खर्च अपेक्षित आहेत.
६ तराफे उभारण्यासाठी ८० रुपयांची तरतूद - सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याचा अटी नुसार माहिती दिली, की कुलाब्यातील रेडिओ क्लब येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या जेट्टीमध्ये दहा तराफे असणार आहेत. ज्यामध्ये एकाच वेळी २० फेरी बोटी प्रवासी वाहतुकीसाठी उभ्या राहू शकतील. सध्या गेट वे ऑफ इंडिया येथे फक्त तीन तराफे असल्याने एलिफंटा व अलिबाग जाणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सागरी मंडळाने जाहीर केलेल्या पहिल्या निविदेमध्ये एकूण ६ तराफे उभारण्याचे नियोजन केलेले आहे. त्यासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद आहे. यामध्ये राज्य व केंद्र शासनाचा समसमान वाटा असेल. याउलट येत्या तीन महिन्यांत दुसरी निविदा जाहीर होणार असून त्यामाध्यमातून आणखी ४ तराफे उभारले जातील. या तराफ्यांच्या दुतर्फा फेरी बोटी प्रवाशांची ने-आण करण्यासाठी उभ्या राहतील. त्यामुळे गेट वे ऑफ इंडियाला पर्यायी जेट्टीमुळे प्रवाशांच्या वेळेसह पैशांचीही बचत होणार आहे.
जेट्टीवरील गर्दी कमी होणार -रेडिओ क्लब येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या जेट्टी समुद्रात सुमारे २०० मीटरपर्यंत असणार आहेत. त्यामुळे विकेन्ड आणि सुट्ट्यांच्या कालावधीत एलिफंटा व अलिबागला जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथे उसळणारी गर्दी कुलाब्याच्या नव्या जेट्टीमुळे विभागली जाणार आहे. तसेच सध्या गेट वे ऑफ इंडिया येथे मर्यादित जागेमुळे फक्त ९२ बोट चालकांकडून पर्यटकांना सेवा दिली जात आहे. त्यात नवी जेट्टी उभारल्यानंतर बोटीची संख्या वाढणार आहेत.