महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Breaking News : सीबीआय संचालक सुबोध जयस्वाल यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

Maharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Jul 28, 2022, 6:44 AM IST

Updated : Jul 28, 2022, 4:19 PM IST

16:16 July 28

सीबीआय संचालक सुबोध जयस्वाल यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

सीबीआय संचालक सुबोध जयस्वाल यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणीस घेण्यास मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडून नकार

मुंबई पोलीसचे निवृत्त एसीपी राजेंद्रकुमार त्रिवेदी यांना दुस-या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश

या प्रकरणात याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे तक्रार केल्याची माहिती

याचिकाकर्ताचे वकील एड सतीश तळेकर यांच्याकडून मात्र आरोपांचं खंडन करण्यात आले

सीबीआय संचालकपदी झालेली नियुक्ती योग्य आणि कायदेशीरच असल्याचा केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे केला दावा

14:47 July 28

खासदार भावना गवळी यांचे पती प्रशांत सुर्वे शिवसेनेत

खासदार भावना गवळी यांचे पती प्रशांत सुर्वे शिवसेनेत

खासदार गवळी यांचे सुर्वे हे पती असून त्यांचा घटस्फोट झाला आहे

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

13:40 July 28

सरकारकडे संसदेत बोलण्यासारखे काही नाही, त्यामुळे वाद- काँग्रेस नेते गुरजीत सिंग औजला

अधीर रंजन चौधरी यांनी यापूर्वीच आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. सरकारकडे संसदेत बोलण्यासारखे काही नाही. त्यामुळे ते त्यांच्या वक्तव्याचा मुद्दा बनवत आहेत. अधीरंजन यांना संसदेत बोलण्याची संधीही मिळाली नाही, असे काँग्रेस नेते गुरजीत सिंग औजला यांनी म्हटले आहे.

13:39 July 28

जर राष्ट्रपतींना वाईट वाटले असेल तर मी त्यांना वैयक्तिकरित्या भेटेन-अधिरंजन चौधरी

मी राष्ट्रपतींचा अपमान करण्याचा विचारही करू शकत नाही. ती फक्त एक चूक होती. जर राष्ट्रपतींना वाईट वाटले असेल तर मी त्यांना वैयक्तिकरित्या भेटेन आणि माफी मागेन. त्यांना हवे असल्यास ते मला फाशी देऊ शकतात. मी शिक्षा भोगायला तयार आहे, पण त्यांना (सोनिया गांधी) यात का ओढले जात आहे? अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते ए.आर. चौधरी यांनी दिली आहे.

12:44 July 28

आपचे खासदार सुशील कुमार गुप्ता यांच्यासह आणखी तीन राज्यसभा खासदार निलंबित

आपचे खासदार सुशील कुमार गुप्ता यांच्यासह आणखी तीन राज्यसभा खासदारांना या आठवड्याच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केले. राज्यसभेचे उपसभापती यांनी कारवाई केली आहे. राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले आहे.

12:43 July 28

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 120 MTPD पावडर निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साबरकांठा येथील साबर डेअरी येथे 120 MTPD पावडर निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

12:42 July 28

देश आपल्या आदिवासी लोकांचा अपमान कदापि सहन करणार नाही-पियूष गोयल

अधीरंजन चौधरी यांनी ज्या प्रकारे राष्ट्रपतींचा अपमान केला आहे, त्यावरून त्यांची मानसिकता दिसून येते. हा देश आपल्या आदिवासी लोकांचा अपमान कदापि सहन करणार नाही. काँग्रेस खासदार अधीर चौधरी यांच्या 'राष्ट्रपत्नी' टिप्पणीवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

12:29 July 28

ओबीसी आरक्षण निर्णयानंतर देखील आरक्षण मिळणार नाही हा मुद्दा योग्य वाटत नाही-हरिभाऊ राठोड

होऊ घातलेल्या 92 नगरपरिषद निवडणुकांची नव्याने ओबीसी आरक्षण सहित जाहीर होईल असे वाटले होते

मात्र न्यायालयाचा हा निर्णय न समजण्यासारखा आहे

निवडणुकांना स्थगिती असल्याने नवीन तारखा येणार आहेत.

ओबीसी आरक्षण निर्णयानंतर देखील आरक्षण मिळणार नाही हा मुद्दा योग्य वाटत नाही, असे हरिभाऊ राठोड यांनी म्हटले आहे.

12:07 July 28

राज्य सरकारला आणखी एक धक्का , 92 नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना

राज्य सरकारला आणखी एक धक्का

92 नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी

निवडणुका ंचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता

निकालापूर्वी कार्यक्रम जाहीर झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणा विना घ्याव्यात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

आरक्षणाची सोडत नव्याने काढता येणार नाही तसे झाल्यास न्यायालयाचा अवमान ठरेल

11:26 July 28

अधीर चौधरी यांच्या राष्ट्रपतींवरील टिपण्णीवरून राज्यसभेत गोंधळ, १२ वाजेपर्यंत राज्यसभेचे कामकाज स्थगित

माफी मागण्याचा प्रश्नच नाही. मी चुकून 'राष्ट्रपत्नी' बोललो होतो, आता तुम्हाला त्यासाठी मला फासावर लटकवायचे असेल, तर तुम्ही लटकवा, असे काँग्रेस खासदार अधीर चौधरी यांनी त्यांच्या 'राष्ट्रपत्नी' या टिपण्णीवर म्हटले आहे. त्यांनी आधीच माफी मागितली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष अधीर चौधरी यांच्या अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांच्यावर केलेल्या ‘राष्ट्रपत्नी’ टिप्पणीवर दिली आहे.

10:53 July 28

लातूरात ढगफुटीसदृश्य पाऊस , दुचाकीस्वार गेला वाहून

लातूर : औसा तालुक्यातील टेंभी, लामजाना,अपचुंदा, परिसरात अवघ्या तीस मिनिटात ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. पुलावरुन वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने उमरगाहून बाभळगांवकडे जाणारी एक दुचाकी पुलाच्या मध्यभागी आल्यावर वाहून गेली. या दुचाकीवर दोघे स्वार होते.

लातूर जिल्ह्यात रात्री अनेक ठिकाणी पावसाने तुफान बॅटींग केली. औसा तालुक्यातील टेंभी, लामजाना, अपचुंदा परिसरात तुफान पाऊस पडला, तेही अवघ्या 40 मिनीटात. या पावसामुळे लहान-मोठे ओढे, नाले ओव्हरफ्लो झाले. लामजना ते लातूर या मार्गावर अपचुंदा व जयनगर या दोन गावाच्या दरम्यान वाहणाऱ्या ओढ्याला प्रचंड पाणी आले होते . पुलावरुन वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बाभळगांवकडे जाणारी एक दुचाकी पुलाच्या मध्यभागी आल्यावर वाहून गेली. या दुचाकीवरुन दोघे प्रवास करत होते. यातील एकाला झाडाचा आधार मिळाला. पंधरा मिनिट जीव वाचविण्याची धडपड सुरु होती. कालांतराने पाणी वाढल्याने तो पाण्यात वाहून गेला तर दुसऱ्याला गावकऱ्यांनी वाचवले.

10:51 July 28

पार्थ चॅटर्जी यांना मंत्रिपद आणि पक्षातून हटवावे- कुणाल घोष

पार्थ चॅटर्जी यांना मंत्रिपद आणि सर्व पक्षीय पदावरून तत्काळ हटवावे. त्याची हकालपट्टी झाली पाहिजे. जर हे विधान चुकीचे मानले जात असेल तर पक्षाला मला सर्व पदांवरून हटवण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे ट्विट TMC सरचिटणीस कुणाल घोष यांनी केले.

10:19 July 28

पुण्यातील गांजवेवाडी परिसरात मध्यरात्री तरुणाचा खून

पुणे - गांजवेवाडी परिसरात मध्यरात्री तरुणाचा खून

आखाडपार्टी करताना वाद, वादानंतर हत्या

रेकॅार्डवरील बारक्या दोरी या आरोपीचा तिक्ष्ण हत्याराने खून

पूर्ववैमनस्यातून खून केल्याची प्राथमिक माहिती

मृतकावर कोयत्याने वार केल्याच्या खूना

पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू

10:00 July 28

माजी मंत्री दादा भुसे यांची आज सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद

शिवसेनेचे बंडखोर नेते, माजी मंत्री दादा भुसे यांची आज सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद आहे. मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत.

10:00 July 28

बेल्लारे येथील परिस्थिती नियंत्रणात, कलम १४४ लागू

दक्षिण कन्नडमधील बेल्लारे येथील परिस्थिती नियंत्रणात आहे, मंगळवार, 26 जुलै रोजी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येनंतर दक्षिण कन्नड जिल्हा पोलीस हद्दीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

09:44 July 28

शिंदे गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात, महाराष्ट्रात पुन्हा सत्तापरिवर्तन होणार - संजय राऊत

ईडीचा दबाव असल्याचे अर्जुन खोतकर यांनी मान्य केले आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्तापरिवर्तन होणार आहे. कोणीतीही कारवाई करा, मी गुडघे टिकवणार नाही. शिंदे गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.

09:25 July 28

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 1 ऑगस्टला गुजरातला भेट देणार

आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 1 ऑगस्टला गुजरातला भेट देणार आहेत. ते सोमनाथमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. 1 ऑगस्टनंतर अरविंद केजरीवाल 6, 7 आणि 10 ऑगस्टला गुजरातमध्ये असतील.

09:01 July 28

भारताला कॉमनवेल्थमध्ये मिळाले पहिले सुवर्णपदक, कुस्तीपटू सूरज वशिष्ठने जिंकला कुस्तीचा फड

भारतीय कुस्तीपटू सूरज वशिष्ठने रोम, इटली येथे झालेल्या ग्रीको-रोमन अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पहिले सुवर्णपदक कॉमनवेल्थमध्ये जिंकले.

08:57 July 28

एनआयचे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियांशी संबंधित ठिकाणांवर बिहारमध्ये छापे

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या फुलवारी शरीफ प्रकरणाच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आज सकाळपासून बिहारमधील अनेक ठिकाणी छापे टाकत आहे.

07:47 July 28

अर्पिता मुखर्जी यांच्या घरात ईडीला सापडले 29 कोटी रुपये, पैशांनी भरले 10 ट्रंक

पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या बेलघारियातील निवासस्थानातून ईडीच्या अधिकाऱ्यांनी 10 ट्रंक भरून सुमारे 29 कोटी रुपये जप्त केले आहे. तिच्या परिसरातून आतापर्यंत एकूण 40 कोटी रुपये सापडले आहेत.

07:23 July 28

मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी रद्द; मंत्रिमंडळाचा पेच कायम

मुंबई - राज्याला नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असताना दिल्लीतून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने पेच अद्याप कायम आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनाही मंत्रिमंडळ विस्तारासाठी सातत्याने दिल्लीवारी करावी लागत आहे. बुधवारी देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीला जाण्याचे नियोजन केले. मात्र, दिल्लीतून अचानक आलेल्या निरोपामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार असल्याचे बोलले जाते.

07:20 July 28

अर्पिता मुखर्जीच्या घरातून पुन्हा १५ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त

बेलघरिया येथील अर्पिता मुखर्जीच्या घरातून किमान १५ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्या घोटाळ्यात सापडलेल्या मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळच्या विश्वासू व्यक्ती आहेत.

07:18 July 28

निलंबित खासदारांनी ५० तासांहून अधिक वेळ संसदेच्या आवारात आंदोलन

निलंबित खासदारांनी संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ 50 तासांचे दिवस-रात्र आंदोलन सुरूच ठेवले आहे. खासदार मणिकम टागोर म्हणाले, की आम्ही, काँग्रेसचे लोकसभा खासदार, राज्यसभेतील विरोधी खासदारांसोबत आमची एकजूट दाखवत आहोत. विरोधी पक्षांच्या खासदारांचे निलंबन करण्याला विरोध करत आहेत.

07:16 July 28

मंकीपॉक्स लस विकसित करण्यासाठी केंद्राचा पुढाकार

आयसीएमआरकडून मंकीपॉक्स लस विकसित करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे.

07:13 July 28

भारतासह मोरोक्कोच्या शांतीसैनिकाच्या हत्येचा संयुक्त राष्ट्रसंघाकडून निषेध

काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताक, MONUSCO मध्ये 2 भारतीय आणि 1 मोरोक्कन शांतीसैनिकांच्या नुकत्याच झालेल्या मृत्यूचा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने निषेध केला आहे. त्या संदर्भात भारत आणि फ्रान्सने मांडलेले निवेदनही स्वीकारले आहे.

07:12 July 28

चर्चेला विषय नसल्याने विरोधकांनी दिला अविश्वास प्रस्ताव- छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल

राज्याच्या विधानसभेच्या अधिवेशनात विरोधकांकडून (भाजप) अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला, कारण त्यांच्याकडे चर्चेसाठी कोणतेही विषय नव्हते; ते खूप निराशाजनक होते. आमच्या खासदारांनी ताकदीने भूमिका पाळली, अशी प्रतिक्रिया छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिली आहे.

07:07 July 28

पावसामुळे थांबलेल्या मिरची व्यापाऱ्याचे २० लाख रुपये पळविले, नागपूरमधील घटना

नागपूर- मिरची व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला लुटून त्याच्या जवळील वीस लाख रुपयांची रोकड पळवल्याची घटना नागपुरातील यशोधरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गत चिखली फ्लायओव्हरवर घडली आहे. सिद्धार्थ रामटेके नावाचा मिरची व्यापाऱ्याचा कर्मचारी कळमना बाजार पेठेतील एका व्यापाऱ्यांकडून वीस लाख रुपयांची रोकड घेऊन आपल्या मालकाच्या घरी जात असताना चिखली उड्डाणपूलावर त्याला लुटण्यात आले. सिध्दार्थ पाऊस येत असल्यामुळे रेनकोट घालण्यासाठी थांबला होता. त्याच वेळेस पाठीमागून आलेल्या दोन लुटारूंनी सिद्धार्थला मारहाण करत त्याच्याकडील वीस लाख रुपयांची रोकड पळविली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनेचा तपास सुरू केला आहे

07:03 July 28

देशात २४ तासात मंकीपॉक्सचे आढळले ४ रुग्ण

भारतात मंकीपॉक्सचे बुधवारी ४ रुग्ण आढळले आहेत. ३ केरळमधील आणि १ दिल्लीती रुग्ण आहेत. ओडिशाचे सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ निरंजन मिश्रा म्हणाले, की सर्व राज्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे; आम्ही सर्व जिल्ह्यांना उच्च जोखीम असलेल्या देशांच्या प्रवासाचा इतिहास असलेल्या लोकांना सतर्क राहण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत

07:00 July 28

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी 45 फूट शिल्पाचे केले उद्घाटन

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी 45 फूट शिल्पाचे उद्घाटन केले. त्यांनी ममल्लापुरम येथे 44 व्या FIDE बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या ठिकाणांची पाहणी केली. चेन्नई येथे 28 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑलिम्पियाडचे उद्घाटन होणार आहे.

06:58 July 28

आसाममध्ये एका ट्रकमधून 1920 किलो गांजा जप्त

आसाममध्ये एका ट्रकमधून 1920 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो इंफाळचा रहिवासी आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे कोक्राझारचे एसपी ठुबे प्रतीक विजय कुमार यांनी सांगितले.

06:57 July 28

कर्नाटकात जनोत्सव अधिवेशन रद्द

भाजप कार्यकर्त्याच्या मृत्यूमुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 'जनोत्सव अधिवेशन' रद्द केले

06:56 July 28

नागपुरात स्वाईन फ्लूचे १६ रुग्ण आढळले

नागपुरात इन्फ्लूएंझा ए (एच1एन1) किंवा स्वाइन फ्लूचे १६ रुग्ण आढळून आले आहेत, ही माहिती नागपूर महानगरपालिकने दिली आहे.

06:19 July 28

Maharashtra Breaking News: सरकारकडे संसदेत बोलण्यासारखे काही नाही, त्यामुळे वाद- काँग्रेस नेते गुरजीत सिंग औजला

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघेजणच राज्याचा कारभार पाहत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार का करत नाहीत, असा सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नागपुरात बुधवारी माध्यमांशी बोलताना केला. अजित पवार ( Ajit Pawar slammed gov ) म्हणाले, मुख्यमंत्री दिल्लीत जाणार ( CM Eknath Shinde Delhi Visit ) होते. पण दिल्लीतही जात असले तरी तेथे ज्यांना भेटायच आहे, त्या पक्षश्रेष्ठींना देशाचा कारभार सांभाळावा लागतो. त्यामुळे वेळ मिळणे कठीण जात असावा असेही ते म्हणाले.

Last Updated : Jul 28, 2022, 4:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details