महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Movie on Mahatma Phule Life : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावरील चित्रपटासाठी सव्वा दोन कोटी रुपये मंजूर

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित पूर्ण लांबीचा चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय ( movie on jyotiba phule life ) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. याबाबत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाला विनंतीही करण्यात आली होती. मात्र राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने विलंब लावल्यामुळे हा चित्रपट विशिष्ट कालावधीत पूर्ण करण्यासाठी खुल्या बाजारातून निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यासाठी महात्मा फुले यांच्या जीवनावरील चित्रपटासाठी निधी मंजुर करण्यात आला आहे.

Movie on Mahatma Phule Life
महात्मा ज्योतिबा फुले

By

Published : Dec 6, 2021, 3:45 PM IST

मुंबई - महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपट ( Movie on Mahatma Phule Life ) निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने सव्वा दोन कोटी रुपये मंजूर ( Maharashtra govt 2.20 cr sanction ) केले आहेत. हा चित्रपट वेळेत आणि योग्यरित्या पूर्ण करण्याबाबत माहिती संचालनालयाला निर्देश दिले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय -

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित पूर्ण लांबीचा चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. याबाबत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाला विनंतीही करण्यात आली होती. मात्र राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने विलंब लावल्यामुळे हा चित्रपट विशिष्ट कालावधीत पूर्ण करण्यासाठी खुल्या बाजारातून निविदा मागवण्यात आल्या होत्या.

सहिता लेखनाचे काम पूर्ण -

महासंचालनालयामार्फत निवड करण्यात आलेल्या संस्थेमार्फत चित्रपटाच्या सहिता लेखनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हे संहिता लेखन समाधानकारक असल्याची सहमती तज्ञ समितीनेही दर्शवली आहे. त्यानुसार संशोधन संहिता लेखनासाठी पूर्वतयारी आणि परिपूर्ण संहिता परत देण्याच्या कामासाठी झालेल्या खर्चाला शासनाने मंजुरी दिली आहे.

चित्रपट निर्मितीला होणार सुरुवात -

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील चित्रपटांसाठी खुल्या बाजारातून ही निविदा प्रक्रिया राबवून चित्रपट निर्माण करून त्याचे वितरण करण्यासाठी महासंचालनालयामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या मे. इलोक्योंस मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला दोन कोटी 20 लाख रुपये अदा करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सदर निधी संस्थेला अदा करून तात्काळ संस्थेकडून चित्रपट निर्मिती प्रक्रिया सुरू करून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश महासंचालनालयाला देण्यात आले आहेत. चित्रपट निर्मिती प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे चित्रपट निर्मिती प्रक्रियामध्ये कुठेही खंड पडणार नाही याची दक्षता घेणे, चित्रपटनिर्मिती पूर्ण करण्याचा कालबद्ध कार्यक्रम तयार करून शासनाला सादर करणे, तसेच चित्रपटाची निर्मिती ऐतिहासिक सत्याला धरून होत असल्याबाबत खात्री करणे आणि देखरेख ठेवून चित्रपट निर्मिती वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयावर असणार आहे.

हेही वाचा -Omicron Variant - विदेशातून येणाऱ्या लोकांबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका घ्यायला हवी -अजित पवार

ABOUT THE AUTHOR

...view details