मुंबई -ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत, ही महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य सरकार सोमवारी विधिमंडळात विधेयक ( Obc Reservation Bill In Assembly ) मांडणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ( AJit Pawar On OBC Reservation ) केली.
विधानपरिषदेत ओबीसी आरक्षणाप्रश्नावर नियम 289 अन्वये उपस्थित विषयावरील प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार ( AJit Pawar On OBC Reservation ) म्हणाले, सभागृहातील सर्वच सदस्य ओबीसी आरक्षणाच्या बाजूने आहेत. निवडणुका घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये म्हणून मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे सोमवारी विधेयक विधीमंडळात मांडले जाणार आहे. या विधेयकाला सर्वांनी एकमताने पाठिंबा द्यावा. राज्य सरकारवर कोणाचाही कसलाही दबाव नाही. सरकारवर कोणीही दबाव टाकू शकत नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.