महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Gym, Parlor will partially open : जिम, ब्युटी पार्लरची नियमावली शिथिल - Gym, Parlor will partially open

राज्य सरकारने 50 टक्के क्षमतेने जिम, पार्लर सुरु करण्यास परवानगी दिली (Gym, Parlor will partially open) आहे. लसींचे दोन डोस बंधनकारक असतील, (Two dose Vaccination is Mandatory) असे राज्याचे मुख्य सचिव देवाषिश चक्रवर्ती यांनी म्हटले आहे.

gym
gym

By

Published : Jan 9, 2022, 5:22 PM IST

Updated : Jan 10, 2022, 12:21 PM IST

मुंबई - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर नियमावली (Maharashtra Corona Rules and Regulation) अंमलबजावणी लागू केली असून, जिम ब्युटी पार्लर बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याला जोरदार विरोध झाला असून, राज्य शासनाने नियमावली शिथिल केली आहे. 50 टक्के क्षमतेने जिम, पार्लर सुरु करण्यास परवानगी दिली (Gym, Parlor will partially open) आहे. लसींचे दोन डोस यासाठी बंधनकारक असतील, असे राज्याचे मुख्य सचिव देवाषिश चक्रवर्ती यांनी म्हटले आहे.

राज्य नियमावली

ब्युटी पार्लर, स्पा, सलून व्यवसायिकांचा विरोध
राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 10 जानेवारीपासून रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवेशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदाने, उद्याने, चित्रपटगृहे, केशकर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी नियमावली लागू करण्यात आली आहे. मात्र, मुंबई लोकल प्रवासासाठी कुठलेही निर्बंध लावलेले नाहीत. सलून बरोबर ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी जोरदार मागणी राज्यातील ब्युटी पार्लर व स्पा व्यवसायिकांनी ऑनलाईन बैठक घेऊन राज्य शासनाकडे केली.

अशी असेल नियमावली
राज्य शासनाने ही बाब विचारात घेत, सुधारीत नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार जिम आणि ब्युटीपार्लरवरील निर्बंध मागे घेतले आहेत. 50 टक्के क्षमतेने जीम आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, नवीन नियमांचे पालन करणे गरजेचे असेल. तसेच जिम आणि ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्यांसह ग्राहकांनी लसींचे दोन घेणे बंधनकारक असेल, असे नव्या नियमावलीत नमूद केले आहे. तसेच हेअर कटिंग सलून, ब्युटी पार्लर रोज रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील, सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे, असे आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा -Pune Police Team in Jalgaon : भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ; पुणे पोलिसांच पथक जळगावात दाखल

Last Updated : Jan 10, 2022, 12:21 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details