मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना झटका दिला आहे. सुनील गावस्कर यांच्या "सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशला"मध्ये इतर खेळ सुरू करण्याची परवानगी देताना गृह विभागाने अट घातली आहे. राज्य सरकारने 1988 साली वांद्रे कुर्ला संकुल तेथे क्रिकेट प्रशिक्षणासाठी म्हाडाकडून भूखंड दिला होता. मात्र 33 वर्ष उलटूनही या भूखंडावर अद्याप कोणताही विकास या फाउंडेशनकडून करण्यात आलेला नाही. त्यामुळे येत्या तीन वर्षात या भूखंडावर बांधकाम पूर्ण करून अकादमी सुरू करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाने दिले आहेत.
सुनील गावस्कर यांच्या "सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशला" राज्य सरकारने 1988 साली वांद्रे कुर्ला संकुल तेथे क्रिकेट प्रशिक्षणासाठी म्हाडाकडून भूखंड दिला होता. मात्र 33 वर्ष उलटूनही दोन हजार चौरस मीटर एवढ्या मोठ्या भूखंडावर अद्याप कोणताही विकास या फाउंडेशनकडून करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण विभागाने आता सुनील गावस्कर क्रिकेट फाऊंडेशनला येत्या तीस दिवसात म्हाडा सोबत करार करण्याची सूचना केली आहे. तसेच हा करार झाल्यानंतर एक वर्षाच्या आत या भूखंडावर बांधकामाची सुरुवात करावी आणि पुढील तीन वर्षात हे बांधकाम पूर्ण करावे, अशी अट घालण्यात आली आहे. या अटीवर गावस्करांच्या क्रिकेट फाउंडेशनला या अकादमीमध्ये इतर खेळ सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.