मुंबई -संयुक्त महाराष्ट्राच्या ( Maharashtra Day news ) चळवळीत लाखो लोकांचे योगदान आहे. एकशे सात हुतात्म्यांच्या ( Shahir contribution in Samyukta Maharashtra movement ) प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला मुंबई मिळाली. मात्र, मुंबई सहजासहजी महाराष्ट्राला मिळाली ( Maharashtra day 2022 ) नाही. यासाठी अनेक माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्यात आले. त्यामध्ये खास करून शाहिरांची भूमिका महत्त्वाची होती. कॉम्रेड डांगे यांसारख्या नेत्यांनी आपल्या भाषणातून मराठी माणसाला दिशा देण्याचे काम केले.
हेही वाचा -इंधनाचा भडका! मे महिन्याच्या पहिल्याच तारखेला 'LPG'च्या दरात 102.50 पैशांची झाली वाढ
संयुक्त महाराष्ट्राच्या ( Maharashtra din ) लढ्याला 62 वर्षे पूर्ण झाली असून, मुंबईसह महाराष्ट्र निर्मितीसाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान केले. 107 हुतात्म्यांच्या बलिदानाने नंतर मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्राची ( Samyukta Maharashtra movement news ) चळवळ तशी रस्त्यावर लढली गेली. तशीच साहित्याने देखील लढली गेली होती. शेकडो साहित्यकारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे. यामध्ये शाहीर आण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांचे नाव आघाडीवर आहेत. शाहीर अमर शेख यांनी आपल्या लेखणीतून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या पर्यंत पोहचवली.
शाहीर अमर शेख- शाहीर अमर शेख यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1916 साली बार्शी येथे झाला. शाहीर अमरशेख यांच्या आई स्वतः कवित्री असल्यामुळे त्यांना कवितेचा बाळकडू हे आपल्या लहानपणापासूनच घरातून मिळाला. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे वयाच्या 12 व्या वर्षापासूनच त्यांनी गिरणीमध्ये काम करणे सुरू केले होते. गिरणीत काम करत असताना कम्युनिस्ट चळवळीशी त्याचा संबंध आला. त्यावेळेपासूनच स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेत आपल्या गाण्यातून इंग्रजांविरोधात लढा उभारला होता.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग -देश स्वतंत्र झाल्यानंतर भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांचा आवाज त्यावेळी बुलंद मानला जात होता. शाहीर अण्णाभाऊ साठे आणि द.ना. गवाणकर यांच्या मदतीने 'लाल बावटा कला पथका'ची स्थापना करण्यात आली. या कलापथकाच्या माध्यमातून अनेक पोवाडे, गाणी रचली जाऊन मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आवाज या शाहिरांनी पोहचवला. शाहीर अमर शेख यांनी 1951 ला 'पहिला बळी' हे नाटक, तर 1958 ला 'कलश' आणि 1963 ला 'धरतीमाता' हे काव्यसंग्रह लिहिली आहेत. 'प्रपंच' आणि 'महात्मा ज्योतिराव फुले' या चित्रपटांतून त्यांनी भूमिकाही साकारल्या आहेत. आपल्या प्रत्येक साहित्य आणि भूमिकेतून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला योगदान दिले, तसेच समाजप्रबोधनाचे काम केले आहे.
शाहीर अण्णा भाऊ साठे- संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी लोकमत जागृत करण्याचे अत्यंत मोलाचे काम शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी देखील केले आहे. शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या वाणीतून आणि लेखणीतून नेहमीच संयुक्त महाराष्ट्र चळवळ सामान्य लोकांपर्यंत पोहचली. 1 ऑगस्ट 1920 रोजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यात असलेल्या वाटेगाव येथे झाला. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले अण्णाभाऊ साठे हे पोटापाण्यासाठी मुंबईत आले होते. मुंबईत आल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांचा साहित्याचा प्रवास सुरू झाला.
लोकनाट्य, कादंबर्या, पोवाडे, नाटके आणि कथा या सर्व माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांची लेखणी दणाणत होती. 1950 ते 1960 दरम्यान आपल्या लेखणीतून संपूर्ण महाराष्ट्रात अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला सामान्य लोकांपर्यंत पोहचवले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 'माझी मुंबई' हे लोकनाट्य या चळवळीचे अविभाज्य घटक बनले होते. आपल्या शाहिरीतून आणि लेखणीतून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची पेरणी अण्णाभाऊ साठेंनी संपूर्ण महाराष्ट्रभर केली.
दादरच्या शिवाजी पार्क मैदानात हजारो लोकांसमोर माझी मुंबई या लोकनाट्याने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला वेगळ्या टोकावर नेऊन ठेवले. मराठी आणि गुजराती माणसाची जुगलबंदी या गाण्यातून त्यांनी सर्वांसमोर ठेवत मुंबई ही कशी मराठी माणसाची आहे, हे सर्वांसमोर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर या त्रिकुटाने पोलिसांची नजर चुकवत शासनाचा बंदीहुकूम मोडून आपल्या शाहिरी व लोकनाट्यातून समाजमन जागृत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १९५६ ला महानिर्वाण झाल्यानंतर अण्णांनी ‘जग बदल घालूनी घाव’ ही रचना लिहिली. त्याही रचनेत अण्णा भाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या विचारांची छाप दिसते.
कॉम्रेड डांगे-संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कॉम्रेड डांगे यांचे देखील अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे शिक्षण नाशिकमध्ये झाले. लहानपणापासूनच लोकमान्य टिळकांच्या विचारांचा पगडा कॉम्रेड डांगे यांच्यावर होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात चतुर राजकारणी म्हणून कॉम्रेड डांगे यांना ओळखले जायचे. कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी कॉम्रेड डांगे होते. त्यांनी 'द सोशलिस्ट' हे वर्तमानपत्र देखील सुरू केले होते. झपाट्याने बदलणाऱ्या मुंबईवर व्यापारी वर्गाची असलेली वाकडी नजर त्यांनी अचूक ओळखली होती. म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कामगारांच्या बाजूंनी त्यांचा आवाज नेहमीच पाहायला मिळाला. १९७४ साली सोव्हिएत रशियाने आपले सर्वोच्च असे ‘लेनिन पदक’ देऊन कॉ. डांगे यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.
म्हणूनच कामगार आणि शेतकरी यांची प्रतिकृती असलेले स्मारक -कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड डांगे यांनी मुंबईतील कामगार, कष्टकरी आणि राज्यभरातील शेतकऱ्यांना एकत्र घेऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा उभा केला. त्यावेळी केंद्र सरकारने महाराष्ट्रावर मोठे जुलूम केले. याविरोधात शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागृती केली व महाराष्ट्र पेटून उठला. कम्युनिस्ट नेतृत्वाच्या आधारावर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा गावोगाव पोहचवण्याचे काम करण्यात आले.
समाजवाद हे एकच लक्ष ठेवून हा संपूर्ण लढा शेतकरी कामगार आणि मराठी माणसांनी दिला. म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राचे स्मारक ( Samyukta Maharashtra monument news Mumbai ) बनवताना त्यावर शेतकरी आणि कामगाराला स्थान देण्यात आले असल्याचे मत कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी व्यक्त केले. भाषेच्या आधारावर कष्टकऱ्यांचे राज्य उभे करण्यासाठी हा लढा महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत करण्यात आला. भांडवलदारांची वाकडी नजर मुंबईवर होती. कॉम्रेड डांगे यांच्या भाषणातून आणि शाहिरांच्या लेखणीतून कष्टकरी शेतकरी आणि कामगारांना ऊर्जा मिळाली असल्याचे मत प्रकाश रेड्डी यांच्याकडून व्यक्त करण्यात आल.
हेही वाचा -Maharashtra Day : कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकविणार - मुख्यमंत्र्यांचा निर्धार