महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : फडणवीसांच्या बंगल्यावर हालचालींना वेग; सरकार स्थापन करण्याची शक्यता - eknath shinde news

एकनाथ शिंदे यांनी बंड ( Eknath Shinde revolt ) केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi government ) अखेरच्या घटका मोजत आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या ( BJP government) गोटात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या शासकीय सागर निवासस्थानी कालप्रमाणे आजही त्यांना भेटीसाठी नेत्यांची रिघ लागली आहे.

Leader of Opposition Devendra Fadnavis
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

By

Published : Jun 23, 2022, 4:06 PM IST

मुंबई -एकनाथ शिंदे यांनी बंड ( Eknath Shinde revolt ) केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi government ) अखेरच्या घटका मोजत आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या ( BJP government) गोटात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या शासकीय सागर निवासस्थानी कालप्रमाणे आजही त्यांना भेटीसाठी नेत्यांची रिघ लागली आहे.

फडणवीसांच्या बंगल्यावर हालचालींना वेग

फडणवीसां भेटण्यासाठी नेत्यांची रिघ -प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर, जयकुमार रावल, आशिष शेलार, नितेश राणे, गिरीश महाजन, मंगेश चव्हाण, खासदार धनंजय महाडिक, सुभाष भामरे, श्रीकांत भारतीय, राहुल नार्वेकर हे सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत. याशिवाय अपक्ष आमदार प्रकाश आवडे यांचे पुत्र राहुल आवडेदेखील फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत.



भाजपाच्या गोटात मोठी खलबत सुरू आहेत. मात्र जोपर्यंत एकनाथ शिंदे; आपली पुढची भुमिका किंवा रणनीती स्पष्ट करत नाहीत. तोपर्यंत भाजपा आपले पत्ते किंवा रणनीती स्पष्ट करणार नाही. अशी भूमिका सध्या भाजपने घेतली आहे. यासंदर्भात एकाही भाजपा नेत्याला मीडियाशी न बोलण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. दरम्यान एकीकडे वर्षावर आणि सिल्व्हर ओकवर अखेरपर्यंत सरकार वाचवण्यासाठी बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. तर दुसरीकडे सागर बंगल्यावर एकनाथ शिंदे गटाला बरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी रणनीती आखली जात आहे.

हेही वाचा -कायद्यानुसार गटनेता पक्षप्रमुख ठरवतो, त्यामुळे शिंदे हे गटनेता नाहीत - नरहरी झिरवाळ

हेही वाचा -Sanjay Raut Appeal to Eknath Shinde : शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, तुम्ही 24 तासात मुंबईत दाखल व्हा - राऊतांचे शिंदेंना आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details