मुंबई- राज्यात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या ६,९५९ रुग्णांची शनिवारी नोंद झाली होती. त्यात रविवारी किंचित घट होऊन ६,४७९ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यात आज आणखी घट होऊन ४,८६९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात गुरुवारी १९०, शुक्रवारी २३१, शनिवारी २२५, रविवारी १५७ मृत्यूची नोंद झाली. आज त्यात घट होऊन ९० मृत्यूची नोंद झाली आहे.
८,४२९ रुग्णांना डिस्चार्ज -
राज्यात आज ८,४२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,०३,३२५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६५ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ४,८६९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ९० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३३,०३८ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८३,५२,४६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,१५,०६३ (१३.६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,६१,६३७ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ७५,३०३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मृत्यूदर २.१ टक्के -
१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.