मुंबई - राज्यात ( Maharashtra corona update ) कोरोनाची रुग्णसंख्या आज स्थिर स्थावर आहे. सुमारे 2 हजार 797 जणांना संसर्गाची बाधा झाली असून 40 जण दगावले आहेत. तर, सक्रिय रुग्ण 23 हजार इतके असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.83 टक्के आहे. ओमयक्रोनचा मात्र आज एकही रुग्ण आढळला नसल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
हेही वाचा -निवडणुकीच्या तोंडावरच भाजपाला भगवतगीता कशी आठवली, काँग्रेस नेत्याचा सवाल
देशासह राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमालीची घटली आहे. राज्यात मागील दोन दिवसांपासून रुग्ण स्थिरस्थावर आहेत. बुधवारी 2 हजार 748 जणांना संसर्ग झाला होता. आज 2 हजार 797 बाधितांची नोंद झाली आहे. तर, 40 जण दगावले आहेत. 6 हजार 383 रुग्ण बरे झाले असून, बरे होण्याचे प्रमाण 97.82 टक्के आहे. बुधवारी हे प्रमाण 99.77 टक्के होते.
आजपर्यंत 7 कोटी 67 लाख 67 हजार 774 कोविड चाचण्या केल्या. त्यापैकी 10.22 टक्के इतके म्हणजेच, 78 लाख 53 हजार 291 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 51 हजार 23 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 1 हजार 146 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 23 हजार 816 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.