मुंबई -राज्यात ( Maharashtra Corona Update ) कोरोना आटोक्यात आला असून रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली आहे. तर, दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. आज 15 हजार 252 नवे रुग्ण सापडले. तर, 30 हजार 235 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. मात्र, 75 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. ओमायक्रोनचा एकही बाधित आढळून आलेला नाही, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
हेही वाचा -Medical Officer Murder Case : कौटुंबिक वादातून डॉ. सुवर्णा वाजे यांची पतीकडून हत्या
राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत बुधवारी वाढ झाली होती. सुमारे 18 हजार 67 नवे रुग्ण तर, 79 रुग्णांचा मृत्यू झाला. आज 15 हजार 252 रुग्णांना संसर्ग झाला आहे. तर 75 रुग्ण दगावले आहेत. आजचा मृत्यूदर 1.83 टक्के आहे. 30 हजार 281 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 74 लाख 63 हजार 868 करोनाबाधित बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या बधितांचे प्रमाण यामुळे 96.07 टक्के इतके आहे. तर, 7 कोटी 50 लाख 99 हजार 654 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 10.34 टक्के इतके म्हणजेच, 77 लाख 68 हजार 100 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9 लाख 5 हजार 696 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 261 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 1 लाख 58 हजार 151 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ओमायक्रोनचा दिलासा