मुंबई -सामाजिक न्याय विभागाच्या ( Social Justice Department ) अंतर्गत असलेल्या चार महामंडळांच्या बीज भांडवलामध्ये ( Four Mahamandal Seed Capital Increased ) भरघोस वाढ करण्यात आली आहे. आज ( 28 एप्रिल ) मंत्रिमंडळाच्या बैठकीत ( Maharashtra Cabinet Meeting ) हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Minister Dhananjay Munde ) यांनी दिली आहे.
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध महामंडळांच्या बीज भांडवलात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यात महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या ( Mahatma Phule Magaswargiya Vikas Mahamandal ) पाचशे कोटी रुपयांच्या बीज भांडवलात वाढ करून एक हजार कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या ( Annabhua sathe Vikas Mahamandal ) ३०० कोटींच्या बीज भांडवलात वाढ करून एक हजार कोटी रुपये केले आहे.