महाराष्ट्र

maharashtra

अजित पवारांनी अर्थसंकल्प केला सादर; जाणून घ्या क्षेत्रनिहाय घोषणा..

By

Published : Mar 8, 2021, 10:24 AM IST

Updated : Mar 8, 2021, 3:56 PM IST

Maharashtra Budget to be presented today See LIVE updates
LIVE Updates : राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर..

15:14 March 08

मुंबई :महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. सव्वा तास त्यांचे भाषण चालले. यामध्ये त्यांनी महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष योजनांची घोषणा केली. आज झालेल्या घोषणांपैकी काही ठळक योजना, वाचा एका क्लिकवर..

15:11 March 08

आर्थिक वर्षासाठी 2,18,263 कोटींचं करलक्ष्य..

15:10 March 08

ज्येष्ठ पत्रकार निवृत्तीवेतनासाठी ३५ कोटींचा निधी..

15:04 March 08

राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी विशेष तरतूद..

15:01 March 08

वन विभागासाठी १ हजार ७२३, तर पर्यावरणातील बदल विभागासाठी २४६ कोटी रुपये..

  • माझी वसुंधरा हा पर्यावरण संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम हाती घेणार. नागरिकांना पर्यावरणातील बदलांबाबत जागरुक केले जाईल.
  • विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नागपूरमध्ये गोंडवना थीम पार्क आणि सफारी सुरू करणार.
  • मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सिंह आणि व्याघ्र सफारीची पुनरर्चना करण्यात येणार.
  • हवाई-बीज पेरणी तंत्राच्या सहाय्याने वनक्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करणार.
  • समृद्धी महामार्गांच्या दोन्ही बाजूने वृक्षलागवडीसाठी योजना राबवणार.

14:58 March 08

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारीत पर्यटन आणि इतर व्यवसायांचा विकास करण्यासाठी विशेष योजना. यासाठी तीन वर्षांमध्ये दरवर्षी १०० कोटी रुपयांची तरतूद.

14:56 March 08

आदिवासी विभागासाठी ९,७३८ कोटी..

  • आदीम जमातींसाठी एकात्मिक वसाहती उभारण्यात येणार.
  • धनगर समाजाच्या अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेसाठी ३,२१० कोटी रुपयांची तरतूद.
  • अल्पसंख्याक विभागासाठी ५८९ कोटींची तरतूद.
  • आदिवासी विभागासाठी ९,७३८ कोटी निधी उपलब्ध करुन देणार.

14:55 March 08

राज्यात सध्या २५ एकलव्य शाळा सुरू. यांमध्ये पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने पहिली ते पाचवीचे सीबीएसईचे वर्ग सुरू करणार.

14:53 March 08

  • दिव्यांग व्यक्तींसाठी वेब अ‌ॅप्लिकेशन तयार करण्यात येत आहे.
  • दिव्यांगांसाठी विविध रोजगार योजनांची घोषणा.

14:51 March 08

सांस्कृतिक कार्य विभागासाठी १६१ कोटी रुपयांची तरतूद..

  • साखर संग्रहालय उभारण्याची योजना.
  • प्राचीन मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी मोठी तरतूद.
  • पहिल्या टप्प्यात आठ प्राचीन मंदिरांचे संवर्धन करण्यात येणार. यासाठी १०१ कोटी रुपयांची तरतूद.

14:43 March 08

महिलांसाठी नव्या योजना..

  • राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा. घरातील महिलेच्या नावावर घराची नोंदणी झाल्यास मुद्रांक शुल्कामध्ये सवलत.
  • ग्रामीण विद्यार्थिनींच्या मोफत बस प्रवासासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या नावाने योजना. १,५०० सीएनजी आणि हायब्रिड बस उपलब्ध करुन देण्यात येणार.
  • शहरांमध्ये 'तेजस्विनी' योजनेंतर्गत बसेस वाढवणार.
  • राज्य राखीव पोलीस दलामध्ये स्वतंत्र महिला गट स्थापन होणार.
  • महिला व बालविकास विभागासाठी ३,७६७ रुपयांची राज्य आणि केंद्राची एकत्रित तरतूद.
  • सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेसाठी बीजभांडवल म्हणून २५० कोटी रुपयांची तरतूद. यामध्ये जमा होणाऱ्या रकमेतून घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना राबवणार.

14:42 March 08

उर्जा विभागासाठी ९,४०० कोटी रुपयांची तरतूद..

  • २००० मेगाव्हॉल्टचे प्रकल्प प्रगतीपथावर..
  • तीन महामार्गांवर मेगा इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणार.

14:41 March 08

स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी चालना देणार..

14:37 March 08

बाळासाहेब स्मारकासाठी ४२१ कोटी रुपयांची तरतूद.

14:35 March 08

मुंबई व उपनगरातील वाहतुकीसाठी मोठ्या योजनांची घोषणा..

  • २०२२ पर्यंत शिवडी न्हावा-शेवा प्रकल्प पूर्ण करणार.
  • वसई ते कल्याण जलवाहतूक सुरू करणार.
  • वांद्रे-वरळी सागरी मार्गासाठी तरतूद.
  • डोंबिवली, कोलशेत, मीरा भाईंदर याठिकाणी जेटी उभारणार.
  • कोस्टल रोडचं काम २०२४ पूर्वी पूर्ण करणार.
  • मुंबईत पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर सायकल ट्रॅक सुरू करणार.

14:33 March 08

  • ग्रामीण भागासाठी शिवराज्य सुंदर ग्राम योजना.
  • उत्तम कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीला भरघोस बक्षीस.
  • पाणीपुरवठा विभागासाठी २,५३३ कोटी रुपयांची तरतूद.
  • राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची एक तुकडी रायगडमध्ये कायमस्वरुपी तैनात करण्यासाठी केंद्राकडे विनंती.
  • नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी ११,३१५ कोटींची तरतूद.
  • मदत व पुनर्वसन विभागासाठी १३९ कोटी रुपयांची तरतूद.

14:31 March 08

पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार..

  • उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी विशेष तरतूद.
  • राज्यामध्ये कौशल्य विद्यालयांची स्थापना करण्यास मान्यता.
  • महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना अनुदान मिळणार.

14:30 March 08

घरकुल योजनांसाठी ६ हजार ८२९ रुपयांची तरतूद..

14:28 March 08

परिवाहन विभागासाठी २,५७० कोटी रुपये..

बस स्थानकाच्या विकासासाठी १ हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद.

14:28 March 08

राज्यातील विमानतळांच्या कामासाठीचा सर्व खर्च राज्य सरकार करेल..

14:23 March 08

रस्ते विकासासाठी १२,९५० कोटी रुपये जाहीर..

  • मुंबई-गोवा सागरी महामार्गासाठी ९ हजार ७७३ कोटी रुपयांची तरतूद.
  • समृद्धी महामार्ग लवकर पूर्ण करण्यासाठी मोठ्या निधीची तरतूद.
  • १ मे पासून समृद्धी महामार्गाचा शिर्डी-नागपूर टप्पा सुरू होणार.
  • पूर्व द्रुतगती मार्गाला विलासराव देशमुख यांचे नाव.
  • गेल्यावर्षी टाळेबंदीमुळे सुरू न करता आलेली कामे यावर्षी पूर्ण करणार.
  • २३५ किलोमीटरच्या नव्या रेल्वेमार्गाला आजच केंद्राकडून मंजूरी.
  • नागपूर मेट्रोला आणखी शहरे जोडणार.
  • पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरिडॉर क्र. १ पर्यंत होणार मेट्रो.
  • पुण्यासाठी नव्या रिंग रोडची घोषणा.

14:20 March 08

जलसंपदा विभागासाठी १२ हजार ९१९ कोटी रुपयांची तरतूद..

  • २६ नवे सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
  • १२ धरणांच्या बळकटीसाठी ६२४ कोटी रुपयांची तरतूद.
  • गोसीखुर्द प्रकल्पासाठी एक हजार कोटींची तरतूद.

14:16 March 08

शेती-पूरक व्यवसायांसाठी विशेष तरतुदी..

  • मस्त्यव्यवसायासाठी विशेष तरतूद.
  • पशुपालनासाठी विशेष तरतूद.
  • बर्ड फ्लू सारख्या रोगांना आळा घालण्यासाठी जैव प्रयोगशाळा उभारणार.
  • दुग्ध व मस्त्य योजनांसाठी ३,२७४ कोटी रुपयांची तरतूद.
  • रेशीम उद्योगासाठी चिखलठाणा येथे विशेष केंद्र.

14:09 March 08

शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त; राज्य सरकार भक्कमपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे..

  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रयत्न.
  • महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्त योजनेंतर्गत १९,९२९ कोटी रुपयांची रक्कम ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात आली.
  • ४२ हजार कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले.
  • तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजाने पीककर्जाची तरतूद.
  • कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी चार वर्षांमध्ये २ हजार कोटी रुपयांची तरतूद.
  • कृषीपंप जोडणी धोरणासाठी महावितरणाला १,५०० कोटी रुपये प्रतिवर्षी देणार.
  • विकेल ते पिकेल धोरणासाठी २,१०० कोटी रुपयांची विशेष तरतूद.
  • 'मॅगनेट' प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद.
  • अमरावतीमध्ये अत्याधुनिक संत्रे प्रकिया प्रकल्प स्थापन करणार.
  • थकीत वीजबिलात शेतकऱ्यांना ३३ टक्के सूट. तसेच, मार्च २०२२ पर्यंत उरलेल्या थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम भरल्यास, बाकी ५० टक्के रकमेवरही सूट मिळणार.

14:04 March 08

नव्या आरोग्य योजनांसाठी ७,५०० रुपयांची तरतूद..

  • राज्यातील आरोग्य सुविधांच्या सुधारणांसाठी ७,५०० कोटी रुपयांच्या नव्या योजनांची तरतूद.
  • आरोग्य सेवांमधील मूलभूत सुविधांच्या सुधारणेसाठी पुढील पाच वर्षांसाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद.
  • संसर्गजन्य रोगांसाठी नवी रुग्णालये उभारण्याची योजना.
  • कर्करोगासाठी राज्यात १५० रुग्णालयांमध्ये विशेष सोय.
  • रुग्णालयांमधील आग प्रतिबंधक उपकरणांसाठी विशेष तरतूद.
  • सिंधुदुर्ग, नाशिक, अमरावती, परभणी याठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये उभारणार. या सर्वाच्या खर्चासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक-खासगी भागीदारीबाबत बोलणी सुरू.
  • रुग्णसेवेशी निगडीत शाखांना चालना देणार.
  • ११ शासकीय रुग्णालयांचे महाविद्यालयामध्ये रुपांतर होणार.
  • प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड पश्चात समुपदेशन केंद्र उभारणार.

14:04 March 08

जोडुनिया धन उत्तम व्यवहारे..

  • जोडुनिया धन उत्तम व्यवहारे, या संत तुकारामांच्या विचारांनी मविआ सरकार काम करत आहे.
  • कोविडचे संकट मोठे होते, मात्र राज्याने त्याला तोंड दिले. सर्व कोरोना योद्ध्यांना मी सलाम करतो.

14:00 March 08

अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प केला सादर..

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. अजित पवारांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत आपल्या निवेदनास सुरुवात केली.

12:30 March 08

अर्थसंकल्पात दीड कोटीची तुट, हातात फारसे काही येणार नाही - दरेकर

कोरोना संकटकाळात अनेकांना संकटाला सामोरे जावे लागले. जनतेच्या हातात काय लागेल हे पहावे लागेल. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच अर्थमंत्र्यांनी दीड लाख कोटींची महसुली तूट निर्माण झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पहिल्यांदाचा नाउमेद असेल तर अर्थसंकल्पात फारसे हाताला काय लागणार नाही असे दिसत आहे. तसेच विकास दरात उणे ८ ही घसरण अर्थसंकल्पासाठी योग्य चिन्ह नसल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली..

12:29 March 08

राज्याच्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राचा आधार - श्रीनिवास खांदेवाले

राज्याच्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राचा आधार - श्रीनिवास खांदेवाले

कोरोना संकटामुळे राज्यातील अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. तर काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अशा उद्योगांना पुन्हा उभारी देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी भरीव तरतूद करावी अशी अपेक्षा अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केली आहे..

12:22 March 08

लघु उद्योजकांसाठी कोकणात पायाभूत सुविधांची गरज..

लघु उद्योजकांसाठी कोकणात पायाभूत सुविधांची गरज..

देशाच्या अर्थचक्रात सर्वात महत्त्वाचा वाटा हा लघु उद्योजकांचा आहे. सर्वाधिक रोजगार निर्मितीही छोट्या उद्योगातून होत असते. मात्र, शासनाचे लघु उद्योजकांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कोकणात छोट्या उद्योजकांसाठी पायाभूत सुविधा तयार करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात छोट्या उद्योजकाला भरारी देण्यासाठी भरीव तरतूद करणे अपेक्षित आहे, असे मत उद्योजक प्रवीण सरनाईक यांनी व्यक्त केले आहे. 

11:58 March 08

साडेबारा कोटी लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात हीच आमची मागणी - सुधीर मुनगंटीवार

  • महाराष्ट्राच्या निर्मितीला 61 वर्ष झाली आहे आणि जागतिक महिला दिनाच्या दिवशी मांडणारा अर्थसंकल्प आहे.
  • साडेबारा कोटी लोकांना या अर्थसंकल्पाकडून अनेक आशा-अपेक्षा आहेत त्या सरकारने पूर्ण कराव्या अशी आमची मागणी आहे.
  • सर्व आश्वासने पूर्ण तर होणार नाहीत, मात्र काही तरी आशा-अपेक्षा पूर्ण कराव्यात.
  • पोलीस, महिला, कायदा सुव्यवस्था या संदर्भात तरतुदी हव्यात.
  • शक्तिशाली महाराष्ट्र आणि वैभवशाली भारत बनवण्याचं काम करायला हवं.
  • अर्थसंकल्पाला चालना देण्याचं काम मंत्र्यांनी करायला हवं.
  • पेट्रोल आणि डिझेल ची भाववाढ ही राज्य सरकारसुद्धा कमी करू शकते.

11:20 March 08

मराठवाड्यातील उद्योजकांच्या या आहेत अपेक्षा..

मराठवाड्यातील उद्योजकांच्या या आहेत अपेक्षा

राठवाड्यातील खराब झालेल रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच वीजदर कमी करून उद्योगांना दिलासा दिला पाहिजे अशी अपेक्षा मराठवाड्यातील उद्योजकांनी व्यक्त केली आहे. मराठवाड्यातील उद्योगांसाठीच्या पायाभूत सुविधांकरीताही अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली पाहिजे असे मत उद्योजकांनी व्यक्त केले आहे...

10:37 March 08

अजित पवार विधानभवनात दाखल..

अजित पवार विधानभवनात दाखल..

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवसाचे कामकाज काही वेळात सुरू होईल. यासाठी अर्थमंत्री अजित पवार विधानभवनात दाखल झाले आहेत.

10:26 March 08

भाजपाच्या महिला आमदारांचे आंदोलन; काळ्या साड्या घालत पोहोचल्या विधानभवनात..

'राज्यात महिला सुरक्षा राहिली नाही' असं म्हणत भाजपाच्या महिला आमदारांनी काळ्या साड्या घालून विधान भवनात प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनादिवशी राज्य सरकारला सद्बुद्धी मिळावी आणि महिला सुरक्षेसाठी खास उपाययोजना केल्या जाव्यात, म्हणून आंदोलन केला जात असल्याचं महिला आमदारांकडून सांगण्यात आले. यासोबतच, महिलादिनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जात असल्यामुळे अर्थसंकल्पात महिलांसाठी खास विशेष तरतूद असली पाहिजे, अशी मागणीही या भाजप महिला आमदारांकडून करण्यात येत आहे.

10:12 March 08

जनतेच्या काय अपेक्षा..

सोमवारी सादर होणाऱ्या अर्थसंल्पाकडून राज्यातील जनतेला काय अपेक्षा आहेत, यासदंर्भात ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.

10:04 March 08

राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर..

मुंबई :महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. यामध्ये आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करतील.

Last Updated : Mar 8, 2021, 3:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details