महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Budget session :अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होण्याची दाट शक्यता - Maharashtra Budget session

येत्या 15 तारखेला कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई घेण्यावर चर्चा होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्रीविजय वडेट्टीवार यांनी दिली ( Vijay Wadettiwar on Budget session place ) आहे. अहवालानुसार 15 फेब्रुवारीला होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ( Report on MH Budget ) अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

मुंबई मंत्रालय
मुंबई मंत्रालय

By

Published : Feb 9, 2022, 6:57 PM IST

मुंबई-अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच होणार यावर जवळजवळ ( Maharashtra Budget Session in Mumbai ) आता शिक्कामोर्तब झाले आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे.

येत्या 15 तारखेला कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई घेण्यावर चर्चा होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली ( Vijay Wadettiwar on Budget session place ) आहे. नागपूरमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन घेता येईल का ? याबाबत विधिमंडळ समितीच्या सदस्यांनी पाहणी केली. तसेच याबाबतचा अहवालही सादर केला आहे. त्या अहवालानुसार 15 फेब्रुवारीला होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ( Report on MH Budget ) अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा-Facebook Live Suicide UP : धक्कादायक : फेसबुक लाईव्हवर दाम्पत्याने विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर

नागपूरमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याची स्थिती नाही
नागपूरमध्ये असलेले आमदार भवन येथे कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली होती. त्यामुळे अद्यापही तेथे रुग्णांवर काही प्रमाणात उपचार सुरू आहेत. त्यामुळे अजूनही नागपूरमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याची स्थिती नाही, असे मत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही व्यक्त केले आहे.

हेही वाचाKarnataka Hijab Controversy : हिजाब बंदीला आव्हान देणारी याचिका वरिष्ठ खंडपीठाकडे वर्ग

अर्थमंत्री अजित पवार काय म्हणाले होते?

नवीन आर्थिक वर्षाकरिता राज्य सरकार 11 मार्चला अर्थसंकल्प ( MH budget on 11th March ) सादर करणार आहे. त्याबाबत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली होती. अर्थमंत्री अजित पवार म्हणाले होते, की महाराष्ट्र सरकार आपले बजेट मांडेल. कोरोनामुळे आलेल्या अडचणीतून अजूनही राज्य सरकार ( Ajit Pawar on MH economy ) सावरलेले नाही. राज्याच्या आर्थिक उत्पन्नाचा अंदाज घेतला गेला होता. त्याप्रमाणे अद्यापही राज्याला आर्थिक उत्पन्न आलेले नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील आपण चर्चा करणार ( MH finanace Minister on Budget ) आहोत. केंद्र सरकारचा बजेट पाहून राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details