मुंबई - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ( Maharashtra Budget Session ) सुरू आहे. अनेक दिवसांपासून विविध कारणावरून हे अधिवेशन गाजत आहे. आज (सोमवार) विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. सरकार विरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून घोषणाबाजी करण्यात आली. सरकार हम से डरती है, दाऊद को आगे करती है अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. तर मंत्री आदित्य ठाकरे विधान भवनात प्रवेश करताच ठाकरे सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी भाजपने केली.
विधीमंडळ परिसरात घोषणाबाजी -
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात ही भाजपा नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक असल्याचे पाहायला मिळाले. आज विधिमंडळाच्या पायऱ्यावर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनचे देखील पडसाद उमटले. सरकार हम से डरती है, दाऊद को आगे करती है, अशा घोषणा देत विधिमंडळ परिसर दणाणून सोडला होता.