मुंबई -राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवार) अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी अनेक नव्या घोषणा केल्या. यात रस्ते व महामार्गासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.
रस्ते बांधकामासाठी 12950 कोटी रुपयांची तरतूद -
स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे 44 टक्के काम जवळपास पूर्ण झाले असून 700 किलो मीटरपैकी 500 किलो मीटरचा मार्ग खुला होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच 1 मे पासून नागपूर-शिर्डी मार्ग सुरू होईल, असेही ते म्हणाले. तसेच परिवहन विभागासाठी 2 हजार 570 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामध्ये बस स्थानकांच्या विकासासाठी 1 हजार 400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्प 2020-21 मध्ये रस्ते बांधकामासाठी 12950 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामध्ये नांदेड-जालना 200 किमीचा नवा मार्ग, पुण्यात नवीन रिंगरोडसाठी 24 हजार कोटी, राज्यातील एकूण 5689 कोटींच्या रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. तसेच पूर्व दृतगती मार्गाला विलासराव देशमुखांचे नाव देण्यात येणार असून राज्यातील महत्त्वाच्या महामार्गावर मेगा ईलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच मुंबईत, पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गावर सायकल चालवण्यासाठी विशेष मार्गीका तयार करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. कोस्टल रोडचे काम 2024 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी केला.
समुद्री मार्गासाठी 9540 कोटींची तरतूद -