महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BREAKING : कोल्हापुरातले सर्व व्यवसाय सोमवारपासून होणार सुरू

maharashtra-breaking-news-today
maharashtra-breaking-news-today

By

Published : Jul 17, 2021, 6:56 AM IST

Updated : Jul 17, 2021, 10:30 PM IST

22:28 July 17

सेलू तालुक्यात फायनान्स कंपनीच्या तगाद्याला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या

वर्धा - फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या तगादाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केली. सेलू तालुक्यातील केळझर शिवारात शनिवारी ही घटना उघडकीस आली. कृष्णा श्यामराव देवतळे (वय५०) असे मृताचे नाव आहे. देवतळे यांनी बजाज फायनान्सकडून कर्ज घेतले होते. कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सातत्यानं तगादा लावल्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीजवळ सुसाईड नोट आढळली आहे. कर्जाच्या हफत्याचा इएमआय चेक बाऊन्स झाला होता. त्याची पेनॉलटी भरण्यास तयार असूनही बजाज फायनान्सचे अतुल बालपांडे, करण पाठक त्रास देत असल्याचा चिठ्ठीत उल्लेख आहे. सेलू पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सुरू आहे. 

20:36 July 17

नागपुरात बंदुकीतून गोळी सुटल्याने पोलीस शिपाई जखमी

नागपूर - नागपूर शहरातील बेलतरोड़ी पोलीस स्टेशन समोर असलेल्या चहाच्या दुकानात बिट मार्शल पिस्टल लॉक झाली. बंदुक अनलॉक करताना अचानक गोळी फायर झाली. यामध्ये बिट मार्शल पोलीस शिपाई शेश कुमारच्या पायाला गोळी लागली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

19:51 July 17

कोल्हापुरातले सर्व व्यवसाय सोमवारपासून होणार सुरू

कोल्हापूर - सोमवारपासून कोल्हापुरातले सर्व व्यवसाय सुरू होणार आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत सर्व व्यवसाय सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नियमावली जाहीर केली आहे. 

19:45 July 17

अकोला शहरात भावानेच केली बहिणीची हत्या

अकोला -भावानेच बहिणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला शहरातील गौरक्षण रोडवर घडला आहे. नेहा नंदनलाल यादव(२०) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर २४ वर्षीय ऋषिकेश उर्फ़ बॉबी राममोहन यादव असे मारेकरी भावाचे नाव आहे. या दोघांमध्ये हेडफोनवरुन वाद होवून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आरोपी बॉबी यादव हा मृत नेहाचा मामेभाऊ असून, सध्या त्याला खदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येचे नेमके कारण अद्यापपर्यंत कळू शकले नाही. 

18:50 July 17

दुबईवरून येणाऱ्या विमानात आरडीएक्स असल्याचा फोन मुंबई विमानतळ प्रशासनाला

मुंबई -दुबईवरून येणाऱ्या विमानामध्ये आरडीएक्स असल्याचा धमकीचा फोन मुंबई विमानतळ प्रशासनाला आला आहे.  त्यामुळे विमानतळाची सुरक्षा वाढवली आहे. विमानाची तपासणी केली असता, विमानात आक्षेपार्ह काहीही आढळले नाही, अशी माहिती मिळत आहे. 

16:09 July 17

पंतप्रधान मोदी-शरद पवार यांची बैठक सहकार बँकांसंदर्भात; नवाब मलिक यांची माहिती

मुंबई - मागील दोन दिवसांपासून शरद पवार दिल्लीत आहेत. शुक्रवारी पियुष गोयल यांना राज्यसभेत नेते घोषित केल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची परंपरेनुसार भेट घेतली. राज्यसभेत सहयोग मिळावा यासाठी ही भेट होती. तसेच राजनाथ सिंह यांच्या दालनात एक बैठक झाली. यावेळी शरद पवार, ए के अँटनी आणि बिपीन रावत उपस्थित होते. सीमेवर काय परिस्थिती आहे याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.  

आज पंतप्रधान मोदी यांची भेट मागितली होती. त्यानुसार भेट झाली आहे. यात को ऑपरेटिव्ही बँकेच्या प्राणांकित केलेल्या बदलाबाबत चर्चा झाली. को ऑपरेटिव्ह बँक राज्याच्या कायद्यानुसार तयार केल्या जातात. मात्र, ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहावे यासाठी RBI त्यावर देखरेख ठेवते, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

12:26 July 17

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट

10:34 July 17

लिंगाऐवजी बोटांचा वापर करणं हा बलात्कराच - मुंबई उच्च न्यायालय

मुंबई - मालाडमध्ये गतिमंद मुलीवर झालेल्या  बलात्कार प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. लिंगाऐवजी बोटांचा वापर करणं हा बलात्कराच' असल्याचे महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाचे नोंदवले आहे. 

10:31 July 17

पाकिस्तानच्या दहशती कारवायांचे परिणाम जगाला भोगावे लागतील -संजय राऊत

मुंबई -  तालिबानचे निर्माता कोण आहेत? पाकिस्तानच आहेत ना? आधी अफगाणिस्तान नंतर हिंदुस्तान, पाकिस्तानने तालिबानचा वापर करून जो दहशतवाद पसरवला आहे, त्याचे परिणाम पूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. त्यामुळे इम्रान खान वर विश्वास ठेऊ नये, अशी  प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 

आरएसएसची आयडोलॉजी काय आहे? की जम्मू काश्मीर हिंदुस्थानचा भाग आहे, हे खरंच आहे, ही तर पूर्ण देशाच्या लोकांची भावना आहे, आरएसएसची भावना जर असेल की पूर्ण हिंदुस्तान, पाकिस्तानसहित असावा तर ही देशाची भावना आहे, त्यामुळे ही चर्चा होताच असते, आरएसएस एक संघटन आहे, त्यांची भावना काहीही असू शकते पण चर्चा ही देशाशी आणि देशाच्या पंतप्रधानाशी होते,असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

09:49 July 17

सचिन वाझेचा एनआयए कोर्टाकडे जामिनासाठी अर्ज

मुंबई - निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने एनआयए कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जातून त्याने जामिनावर सोडण्याची विनंती केली आहे.  कारण NIAने  वाझेला अटक करून  90 दिवस उलटून गेले तरी अद्याप आरोप पत्र दाखल करण्यात आले नाही. त्या पार्श्वभूमीवर 

09:46 July 17

हॉटेल मालकाच्या मुलीला पळवले, मारहाणीत पळवून नेणाऱ्या दोघांचा मृत्यू

खेड/पुणे - खेड तालुक्यातील करंजविहिरे येथे बेदम मारहाणीत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.   हॉटेल मालकाच्या मुलीला पळवून नेणाऱ्या दोघांना हॉटेल मालक व त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या दोघांचा जागेवर मृत्यू झाला आहे.  घटेनची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल...

09:29 July 17

आपलीही केंद्र सराकारकडे कामं असतात, देवेंद्र फडणवीस

नागपूर - नवीन नंत्र्यांची भेट आणि काही कामांसाठी मी शुक्रवारी दिल्लीत गेलो होतो, आपले काही केंद्र सरकारमध्येही कामं असतात. मात्र दिल्लीच्या वारी वाढल्याचा राजकीय अर्थ लावण्याची गरज .  मनसे सोबत युतीबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, अजून त्याला वेळ आहे. चंद्रकांत दादा यांचं वक्तव्य पूर्ण समजून घेतले नाही, अर्धवट समजून घेता आणि प्रतिक्रिया मागता अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली 

09:27 July 17

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 भाजपा आमदार अतुल भातखळकर यांना वनराई पोलिसांनी घेतले ताब्यात

06:48 July 17

पुणे जिल्ह्यातील पर्यंटनस्थळी कलम 144 लागू, पर्यटकांवर निर्बंध

पुणे - जिल्ह्यातील 7 तालुक्यामधील पर्यटनस्थळांवर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी कलम 144 लागू केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी 

06:31 July 17

आषाढीवारी निमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई

    श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी यात्रा २०२१ निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या मंदिरावर, श्री.संत.नामदेव पायरी, श्री.संत.ज्ञानेश्वर दर्शन मंडप आणि श्री.संत तुकाराम भवन येथे आकर्षक व नयनरम्य अशी विद्युतरोषणाई करण्यात आली आहे...


     

    06:25 July 17

    मुंबईत आज पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. बांद्रा कलानगर परिसरातील काही सखल भागात थोड्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. 


     

    Last Updated : Jul 17, 2021, 10:30 PM IST

    ABOUT THE AUTHOR

    ...view details