मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी युती सरकार मधील शिवसेना आणि भाजप आमदारांसाठी खास स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवी मुंबईतील ज्येष्ठ भाजप नेते गणेश नाईक यांची भेट झाली. बऱ्याच वर्षांनी ठाणे जिल्ह्यातील हे दोन नेते एकमेकांशी दिलखुलासपणे गप्पा मारताना दिसले
Breaking News Live : शिंदेंची डिनर डिप्लोमसी आणि आमदारांची दिलं जमाई - महाराष्ट्र लेटेस्ट न्यूज टुडे
23:01 September 06
शिंदेंची डिनर डिप्लोमसी आणि आमदारांची दिलं जमाई
21:35 September 06
एसएफआय आणि एबीव्हीपी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
शिमला येथील कोटशेरा येथील सरकारी पदवी महाविद्यालयात आज एसएफआय आणि एबीव्हीपी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. गुन्हा दाखल झाला असून ताब्यात घेतलेल्या 7 आरोपींना सोडण्यात आले आहे.
19:15 September 06
मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतले मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील बाप्पाचे दर्शन
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थावरील बाप्पाचे दर्शन घेतले.
18:58 September 06
थोड्याच वेळात रंगणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना
आशिया कप स्पर्धेत आज टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये सामना होणार आहे. सुपर 4 राऊंडमधील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. मागच्या सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानने 5 विकेट राखून पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात टीम इंडियासाठी विजय आवश्यक आहे. थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होणार आहे.
18:29 September 06
थोड्याच वेळात भाजपाची बैठक सुरु होणार; अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा मुख्यालयात दाखल
भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पक्षाच्या बैठकीसाठी भाजपा मुख्यालयात पोहोचले आहे. भाजपाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
16:14 September 06
पुण्यातून 900 किलो भेसळयुक्त पनीर जप्त; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
पुणे - अन्न आणि औषध प्रशासनाने पुण्यातील मांजरी खुर्द येथील एका बेकायदेशीर कारखान्यावर छापा टाकला. यात सुमारे 1.98 लाख रुपये किमतीचे 900 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले आहे. २.२४ लाख रुपयांचे स्किम्ड मिल्क पावडर आणि आरबीडी पामोलिन तेलही जप्त करण्यात आल्याची माहिती एफडीएचे सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे यांनी दिली आहे.
15:39 September 06
सायरस मिस्त्रींची 'ती' अपघातग्रस्त कार चौकशीसाठी जर्मनीला पाठवली जाणार
टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे कार अपघातात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी मुंबईतील वरळी येथिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधीनुसार अंत्यसंस्कार पार पडले. ज्या कारचा अपघात झाला ती कार आता चौकशीसाठी जर्मनीला उत्पादक कंपनीला पाठवली जाणार आहे. यात काही तांत्रिक दोष आहेत याची चौकशी पोलीस करणार आहेत.
15:14 September 06
इंट्रानासल COVID 19 लसीला DCGI कडून आपत्कालीन वापरासाठी मान्यता; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती
भारत बायोटेकला इंट्रानासल COVID 19 लसीसाठी DCGI कडून आपत्कालीन वापरासाठी अधिकृत मान्यता मिळाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिली आहे. कोविडसाठी ही भारतातील पहिली नाका वाटे दिली जाणारी लस असणार आहे.
14:52 September 06
गणपती विसर्जनाच्या वेळी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
गणपती विसर्जनाच्या वेळी महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि नागरी प्रशासनाला सतर्क केले आहे.
14:24 September 06
मंत्रालयात महात्मा फुले आणि सावित्री फुलेंचा फोटो लावणार; मुख्यमंत्र्यांचे आदेश
मंत्रालयात महात्मा फुले आणि सावित्री फुलेंचा फोटो लावणार असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
14:04 September 06
राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल; स्नेहभोजनाला हजेरी
राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. शिंदे यांनी ठेवलेल्या स्नेहभोजनाला ते हजर राहणार आहेत.
13:41 September 06
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयावर त्यांनी सकारात्मक चर्चा केली.
13:09 September 06
सायरस मिस्त्रींवर वरळीतील स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार
टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे कार अपघातात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी मुंबईतील वरळी येथिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधीनुसार अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मिस्त्रींना श्रद्धांजली वाहिली.
12:33 September 06
17 सप्टेंबरपासून राज ठाकरे जाणार महाराष्ट्र दौऱ्यावर; विदर्भातून करणार सुरुवात
आता राज ठाकरे यांचे मिशन महाराष्ट्र
17 सप्टेंबर पासून राज ठाकरे जाणार महाराष्ट्र दौऱ्यावर
विदर्भापासून राज ठाकरे करणार मिशन महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात
राज ठाकरे आज वर्षा बंगल्यावर सहकुटुंब जाणार
ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचे दर्शन
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी केलं जाणार प्लॅनिंग
12:15 September 06
अर्निया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार; भारतीय जवानांकडूनही चोख प्रतिउत्तर
आज सकाळी पाकिस्तानकडून अर्निया सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. याला भारतीय जवानांनी देखील चोख प्रतिउत्तर दिले आहे. बीएसएफ जवानांना कोणतीही हानी, इजा झालेली नाही, अशी माहिती पुढे आली आहे.
12:01 September 06
सायरस मिस्त्रींवर मुंबईतील वरळी स्मशानभूमीत विधी सुरू
टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे कार अपघातात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी मुंबईतील वरळी येथिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधी सुरु झाले आहे..
11:40 September 06
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्ष प्रकरणी शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात नवी चाल
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्ष प्रकरणी शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात नवी चाल
निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला तातडीने ग्रीन सिग्नल द्यावा यासाठी कोर्टाकडे विनंती करणार
आज शिंदे गटाच्यावतीने वकील सुप्रीम कोर्टात मेन्शनिंग करणार
आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला 23 सप्टेंबर पर्यंतची मुदत
10:53 September 06
ड्रेसकोड असलेल्या शाळेत धार्मिक प्रथांचे पालन केले जाऊ शकते का? सुप्रीम कोर्टाचा सवाल
नवी दिल्ली -कर्नाटकमधील हिजाब प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने अनेक प्रश्न उपस्थित केले. प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. मात्र, ड्रेसकोड असलेल्या शाळेतही हा अधिकार लागू होतो का, असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे. शिक्षण संस्थांमध्ये हिजाब बंदी हटवण्यास कर्नाटक सरकारने नकार दिला. त्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
10:53 September 06
धुळ्याच्या जवानाला सियाचीन येथे सेवा बजावत असताना वीरमरण
धुळे - तालुक्यातील न्याहळोद येथील रहिवाशी मनोहर रामचंद्र पाटील (वय ४२ वर्ष) हे भारतीय सैन्य दलात ९ जानेवारी २००२मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. शियाचीन ग्लेशियर याठिकाणी ऑपरेशन मेघदूतमध्ये सेवा बजावत असतांना १६जुलै२०२२ या दिवशी तेथील हवामानाच्या दुष्परिणामांमुळे त्यांना तीव्र डोके दुखी, उलटीचा त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारार्थ त्यांना हेलिकॉप्टरने ४०३ फिल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, या ठिकाणी उपचार सुरू असतांना जवान मनोहर रामचंद्र पाटील यांची ५ सप्टेंबर च्या सायंकाळी ५:२२ वाजता प्राणज्योत मालवली .त्यांचे पार्थिव आज (६सप्टेंबर )हवाई मार्गे पुणे येथे तेथून रुग्णवाहिकेतून त्यांच्या गावी न्याहळोद येथे आणण्यात येत आहे.
10:35 September 06
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी ईडीचे महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये छापेमारी
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) छापे टाकले आहेत. दिल्ली आणि उत्तर प्रदेश, पंजाब हरियाणा, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये छापे सुरू आहेत.
09:49 September 06
गणपती विसर्जनावेळी तरुण पंचगंगेत वाहून गेला; इचलकरंजी येथील घटना
कोल्हापूर :कोल्हापुरातल्या इचलकरंजी येथे गणेश विसर्जनावेळी तरुण पाण्यातून वाहून गेल्याची घटना घडली आहे. येथील पंचगंगा नदीमध्ये रुई येथे विसर्जन करताना हा तरुण पाण्यात वाहून गेला. स्वप्नील पाटील असे या वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेल्या एका तरुणाला वाचवण्यात यश आले मात्र स्वप्नीलचा अध्याप शोध लागला नाहीये.
09:49 September 06
कल्याण पत्री पुलाजवळील रेल्वे रुळांना तडे; मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली
मुंबई -आज मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा कोलमडलेली आहे .कल्याण पत्री पुलाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनटे उशिराने धावत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस कसारा कर्जत कडे जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस कडे येणाऱ्या सर्व गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे.
09:20 September 06
नितेश राणेंच्या गाडीला अपघात; पुणे-मुंबई मार्गावरील उर्से टोल नाक्यावर ट्रकने दिली धडक
पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे राणे कुटुंबियांच्या मोटारीचा किरकोळ अपघात झाला आहे, या मोटारीत नितेश राणे यांची पत्नी, मुलं आणि नातेवाईक होते. नितेश राणे यांची पत्नी नातेवाईकांसह पुण्याच्या दिशेने येत होत्या, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उर्से टोल नाका येथे टोल भरण्यासाठी मोटर रांगेत होती, तेव्हा पाठीमागे असलेल्या ट्रकने राणे कुटुंबियांच्या मोटारीला किरकोळ धडक दिली, या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेत कोणीही जखमी नाही.
08:54 September 06
हिंदू राष्ट्र संघटनेचा अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर ससून रुग्णालयात खुनी हल्ला
हिंदू राष्ट्र संघटनेचा अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर ससून रुग्णालयात खुनी हल्ला
अज्ञाताकडून हंबीर याच्यावर ससून रुग्णालयात खुनी हल्ला
हंबीर यांना वाचवण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी हल्यात गंभीर जखमी
खून आणि अनेक गंभीर मोक्याच्या गुन्ह्यात तुषार हंबीर अनेक वर्ष होता येरवडा कारागृहात, हंबीर याच्यावर उपचारासाठी दहा दिवसांपूर्वी केलं होतं ससून रुग्णालयात दाखल.
उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमधून हंबीर याला बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात आलेल्या अज्ञात दोघाजणांनी हंबीर याच्यावर फायरिंग करण्याचा प्रयत्न करात फायरिंग चुकली असता हल्लेखोराने कोयत्याने वार करत केला खुनी हल्ला..
08:32 September 06
इगतपुरीत बिबट्याच्या कातड्यांची तस्करी करणारे चारजण अटकेत
नाशिक -इगतपुरी अबोली गावातून बिबट्याच्या कातड्याची तस्करी (Four accused caught with leopard skin) करणाऱ्यांना वनविभाग पकडले आहे. चार आरोपींना बिबट्याच्या कातडीसह पकडण्यात आले आहे. आम्ही चौकशी करत आहोत आणि त्यांच्यात काही आंतरराष्ट्रीय संबंध आहेत का ते तपासू, अशी माहिती वन उपसंरक्षक पंकज गर्ग यांनी दिली.
08:06 September 06
मुंबई - पुणे महामार्गावर कारचा अपघात; दोघांचा मृत्यू
मुंबई - पुमे महामार्गावर आज पहाटे एका कारचा अपघात झाला. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिघे गंभीर आहेत. जखमींना पनवेलमधील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत
07:50 September 06
आव्हान टिकवण्यासाठी भारताला श्रीलंकेवर विजय हवाच; आज रंगणार मॅच
यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत सध्या अटीतटीच्या लढती होत आहेत. सध्या सुपर-४ फेरीतील सामने खेळवले जात आहेत. ४ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-पाक सामन्यात भारताचा पराभव झाला. याच कारणामुळे सध्या भारतीय संघापुढे ‘करो या मरो’ची स्थिती निर्माण झाली आहे. भारताला या स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवायचे असेल, तर ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्रीलंकेविरोधातील सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवणे आवश्यक आहे.
07:47 September 06
गांजा आणि मोबाईल बॅटरी नागपूर कारागृहात घेऊन जाताना माक्कोच्या कैद्याला अटक
नागपूर - न्यायालयातील कारवाईनंतर कारागृहात नेत असलेल्या मोक्काच्या कैद्याकडे गांजा आणि मोबाईलच्या १५ बॅटरी आढळून आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कारागृहाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरज कवळेला अटक केली आहे.
07:14 September 06
सायरस मिस्त्रींवर आज वरळीतील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
मुंबई - टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा Former Tata Sons Chairman Cyrus Mistry funeral Worli Mumbai रविवारी मुंबईजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. रविवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. सायरस यांच्या कुटुंबातील एकही सदस्य सकाळी रुग्णालयात पोहोचू शकला नाही. सायरस यांचे कुटुंब परदेशात आहेत. सायरस यांच्यावर आज मंगळवारी सकाळी 10 वाजता वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
06:30 September 06
दृष्टिहीन व्यक्तींनांना चलन आणि नाणी ओळखता यावे याकरिता तज्ञांकडून उच्च न्यायालयाने सूचना मागितल्या
मुंबई - दृष्टीहीन तसेच अंध व्यक्तींना भारतीय चलनातील नोटा ओळखणे सोईस्कर होण्यासाठी कोणती साधने आणि कोणत्या पद्धतीचा अवलंब करता येऊ शकतो यासाठी तज्ज्ञांकडून सूचना मागवाव्यात, असे निर्देश सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले आहे.
06:26 September 06
Maharashtra Breaking News
अमरावती - शहरातील महर्षी पब्लिक स्कुल येथे असणाऱ्या आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात होणाऱ्या अन्यायाच्या निषेधात वसतिगृहातील शेकडो विद्यार्थी सोमवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यलयात धडकले. न्याय मिळाल्याशिवाय जाणार नाही अशी भूमिका घेत या विद्यार्थ्यांनी रात्रभर जिल्हा काचेरीतच मुक्काम ठोकला.