मुंबई- केरळपाठोपाठ महाराष्ट्रातही झिकाची लागण झालेला रुग्ण आढळला आहे. ही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील 50 वर्षीय महिलेला झिकाची लागण झाली आहे. या महिला रुग्णाची तब्येत चांगली असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
MAHARASHTRA BREAKING : चिंताजनक.. केरळपाठोपाठ महाराष्ट्रातही झिका विष्णूचा शिरकाव, पुणे जिल्ह्यात आढळला पहिला रुग्ण - मुख्यमंत्री पूर आढावा
22:11 July 31
चिंताजनक.. केरळपाठोपाठ महाराष्ट्रातही झिका विष्णूचा शिरकाव, पुणे जिल्ह्यात आढळला पहिला रुग्ण
17:08 July 31
पॉर्नोग्राफी प्रकरण : राज कुंद्राला उच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच, सोमवारी पुन्हा सुनावणी
मुंबई -राज कुंद्राला तूर्तास हायकोर्टाचा दिलासा नाही. राज कुंद्राच्या याचिकेवर सोमवारी पुन्हा होणार सुनावणी. ऑनलाईन सुनावणीत तांत्रिक दोष आल्यामुळे आता प्रत्यक्ष कोर्टात सुनावणी होणार आहे. पॉर्नोग्राफी केसमध्ये मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
16:38 July 31
गणपतराव देशमुख यांच्या पार्शिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सोलापूर - शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पार्शिवावर दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास शेतकरी सहकारी सुतगिरणी सांगोला येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
16:23 July 31
आजीच्या दशक्रियेसाठी नदीवर अंगोळीला गेलेल्या दोन तरुण नातवांचा नदीत बुडून मृत्यू
अमरावती - आजीच्या दशक्रियेसाठी नदीवर अंगोळीला गेलेल्या दोन तरुण नातवांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूरमध्ये ही घटना घडली. मनीष टोपमे व ईश्वर टोपमे असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.
15:13 July 31
डिसीपींच्या ऑडिओ क्लिप संदर्भात अहवाल आल्यानंतर सरकार घेणार निर्णय - गृहमंत्री
पुणे - डिसीपींच्या ऑडिओ क्लिप संदर्भात पुणे पोलीस आयुक्तांना दोन्ही बाजू तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचा चौकशी अहवाल आल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेणार आहे. -गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
15:12 July 31
पुण्यात शिथिलता देण्यासंदर्भात एक-दोन दिवसात निर्णय - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
पुणे -काल बैठकीत जो निर्णय झाला की, पुणे शहर आणि जिल्हा लेव्हल 3 मध्ये आहेत. शिथिलता देण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून येत्या 1 ते 2 दिवसात शिथिलता देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल -गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
15:12 July 31
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना विकास कामांवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घ्या - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
13:53 July 31
अतिवृष्टीने विस्कळीत झालेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकारकडून योग्य पाऊले
नागपूर -आज आव्हानात्मक परिस्थिती आहे, नैसर्गिक आपत्ती आली आहे, रस्ते वाहून गेले आहेत, सार्वजनिक बांधकाम विभाग यावर लक्ष ठेवून आहे, राज्यसरकार अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी योग्य पाऊले उचलेल. राज्यातील रस्ते दर्जेदार व्हावे, यासाठी चांगले अधिकारी आणि कंत्राटदार एकत्र येऊन चांगले काम करावे लागेल. समृद्धी महामार्ग मराठवाड्यातील जात असल्याने ते 8 जिल्हे जोडले जात आहे, विदर्भात रेल्वेचे काम सुरू आहे, यामध्ये हे रेल्वेलाइमध्ये मराठवड्याची गावे जोडावी अशी विनंती केली अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे केली.
13:49 July 31
मुंबई आणि नागपूर हे शहर जवळ करण्याची गरज - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपूरातील उडान पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करून बोलण्याची सुरुवात केली. युतीतील सरकार असतांना मुंबई पुणे रोडचे बांधकाम करण्यासंदर्भात बोलत असताना मुख्यंमत्र्यांनी गडकरींचे कौतुक केले.
महापुरात जे काही नुकसांन झाले आहे, विकास कामे करताना सांभाळून काम करू पर्यावरणाला सांभाळून करू, प्राणघातक रेल्वे फाटक, जीवघेणी ठरू नये म्हणून उडान पूल करू. या आपत्तीतून सावरण्यासाठी मोठा खर्च येत आहे, यामुळे जे काही करायचे ते कायम स्वरूपी करायचे आहे. विकासकामात राजकीय अडथळे येऊ न देता सर्वांना विकास कामासाठी सोबत घेऊन काम करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
13:42 July 31
पुढील तीन तासात रायगड, रत्नागिरी, घाट परिसर यासह पुणे जिल्ह्यात पावसाचा अंदाज - आयमडी
12:24 July 31
2024 ला खेला नाही, मोंदीचा मेला होईल, आठवलेंची ममतांवर टीका
ममता बनर्जी म्हणत आहेत की, 2024 मध्ये 'खेला होबे' होईल. मात्र मी त्यांना सांगू इच्छूतो की 2024 मध्ये 'खेला' नाही तर 'नरेंद्र मोदीं का मेला' होगा. 2024 मध्ये पुन्हा मोदी सत्तेत येतील. भाजपाला विरोधी पक्षाची भीती वाटत नाही. तुम्ही भाजपाला जितका विरोध कराल तितकीच ती आणखी मजबूत होईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
12:19 July 31
राज कुंद्राला अटक करण्यासाठी 5 महिने 15 दिवस का लागले? राम कदम
राज कुंद्राला अटक करण्यासाठी 5 महिने 15 दिवस का लागले ? त्याला नेमके कोण वाचवत आहे. का वाजे आणि राजकुंद्रा यांच्यामध्ये काही बोलणी, गाठीभेठी किंवा देणे घेणे झाले आहे का ? तसेच या काळ्या धंद्यामध्ये वाजेवर वरदहस्त असलेली व्यक्ती सहभागी आहे का , कोणाच्या आशीर्वादाशिवाय कुंद्राची अटक इतक्या दिवस कशी काय टळू शकते असे प्रश्न भाजपा आमदार राम कदम यांनी आपल्या ट्विवटरवरून उपस्थित केले आहेत.
11:28 July 31
कोल्हापूर विमानतळाचे 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे नामकरण करा, संभाजीराजेची मंत्री सिंदियांकडे मागणी
राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नूतन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर विमानतळाचे 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ' असे नामकरण करण्याविषयी चर्चा केली तसेच. कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडीगची सुविधा सुरू करण्यात येणारे अडथळे जलद दूर करावेत, अशी मागणी केली.
11:26 July 31
राज्यात रस्त्यांचे 1800 कोटी रुपयांचे नुकसान - अशोक चव्हाण
राज्यात अतिवृष्टी, पूरपरिस्थिती तसंच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे, रस्त्यांचं सुमारे १ हजार ८०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
07:27 July 31
शासकीय इतमामात होणार भाई गणपतराव देशमुखांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
सांगोला- माजी आमदार आणि शेकापचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्यावर आज दुपारी 1 वाजता सांगोला येथील शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि राजकीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
06:26 July 31
राज्यात रस्त्यांचे 1800 कोटी रुपयांचे नुकसान - अशोक चव्हाण
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे सोलापुरात निधन झाले. त्यांचा पार्थिव देह आज पहाटे 5:30 वाजता अश्विनी रुग्णालयातून पेनूरमध्ये आणण्यात आला. त्यानंतर काही काळ अंत्यदर्शनासाठी पार्थिव पेनूरमध्ये ठेवण्यात आले होते. आज सांगोल्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.