ठाणे - शिवतिर्थावरील दसरा मेळावा हा बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्या शिवसेनेचा आहे. असा घणाघाती टोला शिंदे गटातील आमदार शहाजीबापु पाटील यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
Breaking News Live : उरलेल्या चंबुगबाळ्यांनीही शिंदे गटात सामील व्हा - शहाजीबापू पाटील
21:12 October 02
शिवतिर्थावरील मेळावा बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्या शिवसेनेचा - शहाजीबापू पाटील
20:26 October 02
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणाऱ्याला लोणावळ्यामधून अटक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणाऱ्याला लोणावळ्यामधून अटक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करण्याच्या कटाची खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या इसमास लोणावळा पोलिसांनी केली अटक
19:13 October 02
मुंबईत आज १०२ नवे कोरोना रुग्ण, १ मृत्यूची नोंद
मुंबई - मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला आहे. आज १०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या ६९९ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
18:14 October 02
कांदिवली गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, गुजरातमधून आरोपींना बेड्या
कांदिवली गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, गुजरातमधून आरोपींना बेड्या
18:13 October 02
वरळीतून शेकडो शिवसैनिक शिंदे गटात सामील
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Former Environment Minister Aditya Thackeray ) यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतून शेकडो शिवसैनिक आज एकनाथ शिंदे गटात सामील ( Shiv Sainik joins Eknath Shinde group today ) झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सर्व शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे गटांमध्ये प्रवेश केला.
18:13 October 02
अमित शाह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात सायबर विभागाकडे गुन्हा दाखल
अमित शाह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात सायबर विभागाकडे गुन्हा दाखल
देशाचे गृहमंत्री अमित शाह,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर केल्याप्रकरणी पुणे सायबर विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप पुणे शहर सोशल मीडिया अध्यक्ष पदाधिकारी विनित बाजपेयी यांनी रामदास शिर्के यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
16:34 October 02
खर्गे काँग्रेसमध्ये बदल घडवूनआणू शकत नाहीत - थरूर
नागपूर - आम्ही शत्रू नाही, हे युद्ध नाही. आमच्या पक्षाच्या भवितव्यासाठी हे मतदान आहे. खरगे जी काँग्रेस पक्षाच्या शीर्ष 3 नेत्यांमध्ये येतात. त्यांच्यासारखे नेते बदल घडवून आणू शकत नाहीत आणि विद्यमान व्यवस्था चालू ठेवतील. कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार मी बदल घडवून आणेन: काँग्रेस खासदार एस थरूर
16:29 October 02
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जमलं तर भाई भाई नाही तर कुस्ती; रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य
जालना:स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत Swarajya Sanstha Election जमलं तर भाई- भाई, नाही जमलं तर कुस्ती, निवडणुकी आधी नाही युती झाली तरी निवडणुकीनंतर शिवसेनेसोबत युती (शिंदे गटाशी). स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही आमची ताकद दाखवू जालन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचं Raosaheb Danve Minister State Central Railway मोठं वक्तव्य. या निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येवून जिल्हा परिषद Zilla Parishad नगरपरिषद ताब्यात घेवू.
15:17 October 02
मुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षा वाढवली
मुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षा वाढवली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका
मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आत्मघाती हल्ला करण्याची धमकी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक महिन्यापूर्वी आली होती पत्राद्वारे धमकी
मुख्यमंत्र्यांची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क
14:51 October 02
तेलंगणातील आडेली देवीचा नवस फेडण्यासाठी जाणारा पिकअप टेम्पो उलटला; 19 अतिगंभीर, 28 जण जखमी
नांदेड - तेलंगणातील आडेली देवीचा नवस फेडण्यासाठी जाणारा पिकअप टेम्पो उलटला आहे. यात 19 अतिगंभीर असून 28 जण जखमी झाले आहेत.
14:28 October 02
मुंबई विमानतळावर प्रवाशाला 5 किलो हेरॉईनसह अटक
मुंबई विमानतळाच्या सीमाशुल्क विभागाने एका परदेशी प्रवाशाला 5 किलो हेरॉईनसह अटक केली, ज्याची किंमत 34 कोटी रुपये आहे.
13:22 October 02
संपूर्ण काँग्रेस पक्ष जामिनावर बाहेर- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची टीका
आज गांधी जयंती आहे, मी खोट्या गांधींबद्दल का बोलू? संपूर्ण काँग्रेस पक्ष जामिनावर बाहेर - राहुल गांधी, सोनिया गांधी आणि डीके शिवकुमार जामिनावर बाहेर आहेत. कर्नाटक काँग्रेस पक्षासाठी एटीएम होते, आता ते गेले, अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे.
12:16 October 02
इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देणारा ईमेल, मुंबई पोलिसांकडून तपास सुरू
मुंबई विमानतळावर काल इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला होता. फ्लाइटच्या तपासणीदरम्यान काहीही आढळले नाही. पुढील तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
12:01 October 02
बोट उलटल्याने 6-7 जण बेपत्ता
धुबरी जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदीत आज सुमारे 30 जणांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने 6-7 जण बेपत्ता झाले आहेत. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे
10:38 October 02
मोदी सरकारच्या मुत्सद्देगिरीमुळे इतर देशांना दहशतवादाचा मुद्दा गांभीर्याने घेण्याची प्रेरणा मिळाली- परराष्ट्र मंत्री
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी सांगितले की, पाकिस्तानसारखा दहशतवाद इतर कोणताही देश पसरवत नाही. 'रायझिंग इंडिया अँड द वर्ल्ड: फॉरेन पॉलिसी इन मोदी एरा' या विषयावर ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारच्या मुत्सद्देगिरीमुळे इतर देशांना दहशतवादाचा मुद्दा गांभीर्याने घेण्याची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमानंतर श्रोत्यांशी संवाद साधताना जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानने जसा दहशतवाद पसरवला आहे तसा अन्य कोणताही देश करत नाही. एवढ्या वर्षात पाकिस्तानने भारताविरुद्ध जे काही केले, ते जगाच्या इतर कोणत्याही भागात घडले आहे का? 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर, आपल्यासाठी हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे की अशा प्रकारचे वर्तन आणि कृती अस्वीकार्य आहे आणि त्याचे परिणाम होतील.
10:15 October 02
24 तासात 3,375 नवीन कोरोना रुग्ण आढळले
देशात 24 तासात 3,375 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर देशात 37,444 कोरो रुग्ण हे उपचार घेत आहेत.
09:01 October 02
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुले होणार
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प आजपासून 2022-23 हंगामासाठी पर्यटकांसाठी खुले होणार आहे. प्रतिकूल हवामानामुळे, काझीरंगा रेंज, कोहोरा आणि वेस्टर्न रेंज, बागोरी या दोन रेंजमधील जीप सफारीसाठी पार्क अंशतः उघडे राहणार आहे.
07:24 October 02
शिंदे गटाच्या खासदाराची संसदीय समितीत लागणार वर्णी?
शिंदे गटातील सेनेच्या खासदाराला संसदीय समितीच्या आयटी समितीत स्थान मिळण्याची शक्यत आहे.
07:23 October 02
1.2 कोटी रुपयांचे लाल चंदन जप्त
आंध्र प्रदेशातील चित्तूर पोलिसांनी सुमारे 1.2 कोटी रुपयांच्या 122 लाल चंदनाच्या लाकडासह 30 लाख रुपये किमतीचा एक ट्रक, दोन कार, एक मोटारसायकल जप्त केली. आठ जणांना अटक करण्यात आली असून एक अद्याप फरार आहे:
शिंदे गटातील सेनेचे खासदार थरूर आयटी पॅनलचे प्रमुख म्हणून जाण्याची शक्यता आहे
07:23 October 02
राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गांधी जंयती निमित्त राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
07:21 October 02
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघाचे ट्विट
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त, आम्ही महात्मा गांधींचा जन्मदिवस आणि शांतता, आदर आणि प्रत्येकाने सामायिक केलेल्या आवश्यक प्रतिष्ठेची मूल्ये साजरी करतो. ही मूल्ये आत्मसात करून आणि विविध संस्कृतींमध्ये कार्य करून आम्ही आजच्या आव्हानांना पराभूत करू शकतो, असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी ट्विट केले.
07:21 October 02
फुटबॉल सामन्यात झालेल्या हिंसाचारात 127 जणांचा मृत्यू
इंडोनेशियातील फुटबॉल सामन्यात झालेल्या हिंसाचारात 127 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
07:16 October 02
स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये नवी मुंबई देशातील तृतीय क्रमांकाचे सर्वात स्वच्छ शहर
नवी मुंबई- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये नवी मुंबई शहरास देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्यात नेहमीप्रमाणेच नवी मुंबई नंबर वनचे स्वच्छ शहर आहे. नवी दिल्ली येथील तालकोटरा स्टेडियम येथे आयोजित 'स्वच्छ अमृत महोत्सव' भव्य समारंभात महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने माजी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा सन्मान स्विकारला. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्री हरदीप पुरी व राज्यमंत्री कौशल किशोर, केंद्रीय सचिव मनीष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
06:58 October 02
MAHARASHTRA BREAKING NEWS
नवी मुंबई- नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे येथील बोनकोडे गावात चार मजली इमारत कोसळली आहे. इमारत हलत असल्याने नागरिकांना काढले बाहेर होते. बोनकडे गावात कोसळलेली इमारत फार जुनी होती. ही इमारत कोसळण्या अगोदर इमारत हलत असल्याचे निदर्शनास आल्याने इमारतीत राहत असलेल्या नागरिकांना इमारती बाहेर काढण्यात आले. त्या इमारतीत ४० कुटुंब राहत होते.
हे पेज दिवसभर अपडेट होत आहे. अपडेट बातम्यांसाठी हे क्लिक करा आणि रहा अपडेट! ( Maharashtra Breaking News )