महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Breaking News संशयित बोटची अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेशी पृष्टी नाही, तपास सुरू असल्याचे फडणवीसांची माहिती

Maharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Aug 18, 2022, 6:32 AM IST

Updated : Aug 18, 2022, 4:56 PM IST

16:07 August 18

संशयित बोटची अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेशी पृष्टी नाही, तपास सुरू असल्याचे फडणवीसांची माहिती

मुंबईसंशयित बोट प्रकरणी कोणत्याही दहशतवादी संघटनेची पुष्टी झाली नाही. सर्व पैलू तपासत आहोत. पोलिसांना हाय अलर्टवर राहण्यास सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

15:03 August 18

महाराष्ट्रात पुन्हा घातपाताचा प्रयत्न, श्रीवर्धनमध्ये एका बोटीत आढळल्या एके-47

श्रीवर्धन समुद्र किनारी एक संशयास्पद बोट आढळली असून या बोटीत दोन ते तीन एके-47 आढळल्याने खळबळ उडाली आहे.

14:06 August 18

केंद्राकडून द्वेष पसरविणारे ८ युट्यूब चॅनेल व फेसबुक अकाउंट बंद

केंद्राने बनावट, भारतविरोधी द्वेषयुक्त माहिती देणारे 8 YouTube व 1 Facebook खाते ब्लॉक केले आहे.

13:28 August 18

आम आदमी पक्षाने जाहीर केली नऊ उमेदवारांची दुसरी यादी

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने नऊ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

13:28 August 18

काबूलमध्ये मशिदीच्या स्फोटात २१ जणांचा मृत्यू

काबूल सुरक्षा कमांडच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने पीडी 17 येथील मशिदीत काल झालेल्या स्फोटात 21 जणांचा मृत्यू झाला आणि 33 जण जखमी झाले.

12:34 August 18

कारागृहात पोलीस कर्मचारी सुरक्षित नाहीत

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बॅरेक का चेंज केलं असा सवाल या पोलीस कर्मचाऱ्याने या कैद्यांना केल्याने या कैद्यांनी प्रभू चरण पाटील या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली खुनाच्या गुन्ह्यातील या आरोपींनी ही मारहाण केली आहे.

12:28 August 18

जीएसटीवरून छगन भुजबळ आक्रमक

जीएसटी वाढत आहे, हे दिल्लीला जाऊन उपमुख्यमंत्र्यांनी सांगावे. त्यांचा दिल्लीत दरारा वाढला आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मंदी नाही तर एवढी जीएसटीचे प्रमाण का, असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केला.

12:04 August 18

पुणे म्हाडाच्या एकूण ५२११ सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा आज शुभारंभ

पुणे मंडळामार्फत #म्हाडा च्या विविध योजनतील २७८ सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या २८४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २०८८ सदनिका अशा एकूण ५२११ सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा आज शुभारंभ झाला.

11:40 August 18

बीड जिल्हा अवैध गर्भपातामुळे प्रसिद्ध, भाजप आमदार भारती लव्हेकर यांच्या या वक्तव्याने सभागृहात गोंधळ

बीड जिल्हा अवैध्य गर्भपातामुळे प्रसिद्ध झाला आहे. भाजप आमदार भारती लव्हेकर यांच्या या वक्तव्याने सभागृहात गोंधळ.

11:39 August 18

आर आय बी टोल वसुली कशी करते, भाजप आमदार मनीषा चौधरी यांचा मंत्र्यांना प्रश्न

रस्त्यात इतके खड्डे आहेत की लोकांचे जीव जात आहेत अशात आर आय बी टोल वसुली कशी करते. भाजप आमदार मनीषा चौधरी यांचा मंत्र्यांना प्रश्न.

11:39 August 18

पचास खोके एकदम ओके यानंतर आज नवी घोषणा

आले आले गद्दार आले

या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय

गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी, चलो गुवाहाटी

पचास खोके एकदम ओके यानंतर आज नवी घोषणा

10:45 August 18

मुंबई गोवा महामार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार, रविंद्र चव्हाण यांची ग्वाही

मुंबई गोवा महामार्गावर निषकृष्ठ दर्ज्याच्या रस्त्याची पाहणी करणार आहोत. मुंबई गोवा महामार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

10:39 August 18

मराठवाड्यातील अतिवृष्टीवरून विरोधकांची विधान भवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी

मराठवाड्यातील अतिवृष्टीवरून विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी सुरू केली आहे. सभागृहात कोकणाला जाणाऱ्या रस्त्यांवरून विषयावर चर्चा सुरू आहे.

09:08 August 18

सुरतमध्ये पूरसदृश्य परिस्थिती

सुरतमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागात पूरसदृश परिस्थिती आहे.

09:08 August 18

जोरहाट एअर फोर्स स्टेशन ऑपरेशन तयारी

ईस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल डीके पटनायक यांनी आसाममधील जोरहाट एअर फोर्स स्टेशनच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला. त्यांनी प्रमुख वाहतूक विमान तळ आणि तेथे निर्माण होत असलेल्या नवीन सुविधांची पाहणी केली आहे.

09:08 August 18

भाजी विक्रेत्याच्या मुलीवर झाडल्या गोळ्या

पाटणामधील बेऊर पीएसच्या सिपारा भागातील इंद्रपुरी परिसरात काल एका भाजी विक्रेत्याच्या मुलीवर गोळ्या झाडण्यात आल्या. मानेवर गोळी लागल्याने जखमी तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रकरण प्रेमप्रकरण असल्याचे बोलले जात आहे.

09:07 August 18

राजस्थानमध्ये साधुची हत्या

राजस्थानमध्ये 17 ऑगस्ट रोजी सकाळी हनुमानगडच्या भाखरावली गावात एका साधूची त्याच्या घरात हत्या झाल्याचे आढळून आले. चेतन दास असे या साधूचे नाव आहे. पुढील तपास सुरू आहे.

09:07 August 18

कोरोनाबाबत घ्या काळजी

कोविड 19 अजूनही आहे, गेल्या काही दिवसांत वाढला आहे. सर्व आवश्यक खबरदारी, मास्क आणि सामाजिक अंतर महत्वाचे असल्याचे नीती आयोगाने म्हटले आहे.

09:07 August 18

आरटीओ अधिकाऱ्याच्या घरातून १६ लाख रुपये जप्त

आर्थिक गुन्हे शाखेने जबलपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी संतोष पाल यांच्या निवासस्थानावर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी छापा टाकला. ब्युरोने एकूण 3 ठिकाणी छापे टाकले आहेत. त्याच्या घरातून 16 लाख रुपये रोख आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.

09:07 August 18

हिराकुड धरणाचे ४० दरवाजे उघडले

ओडिशा राज्यात पावसाचा जोर कायम असल्याने कटकमधील मुंडली बॅरेज येथील महानदीत पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू आहे. हिराकुड धरणाचे ४० दरवाजे उघडले आहेत.

07:07 August 18

सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याने अजित डोवाल यांच्या ताफ्यातील तीन कमांडो बडतर्फ

फेब्रुवारीमध्ये NSA अजित डोवाल यांच्या निवासस्थानी सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले. या प्रकरणात तीन सीआयएसएफ कमांडो बडतर्फ करण्यात आले आहेत. तर एक डीआयजी आणि एका कमांडंट दर्जाच्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे.

07:07 August 18

CUET UG 2022 चा टप्पा 4 परीक्षा पुढे ढकलली

काही अपरिहार्य तांत्रिक कारणांमुळे शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मधील 13 केंद्रांवर आज होणारी परीक्षा रद्द करण्यात आली. 1,45,885 उमेदवारांपैकी एकूण 8693 उमेदवारांना त्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

07:07 August 18

युक्रेनच्या खार्किव येथे रशियन हल्ल्यात तीन ठार

युक्रेनच्या खार्किव येथे रशियन हल्ल्यात तीन ठार, 10 जखमी झाले आहेत.

07:07 August 18

चेन्नईत गोदामाला भीषण आग

चेन्नईतील वनाराम येथे एका तेल कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली. कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

07:06 August 18

दिल्ली ते डेहराडून महामार्ग होणार सुसाट

दिल्ली ते डेहराडून 2.5 तासात अंतर कापणे शक्य होणार आहे. एक्सप्रेस वे अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

07:06 August 18

दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेला प्रारंभ

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते 2 दिवसीय राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.

07:06 August 18

पोलिसाच्या वाहनाखाली स्फोटके ठेवणाऱ्या दहशतवाद्याचा शोध सुरू

सुमारे 2.5 किलो वजनाच्या पोलिसाच्या वाहनाखाली आयईडी सापडला. दहशतवादी कोण आहेत, हे तपासले जात असल्याचे पंजाब पोलिसांनी सांगितले.

07:06 August 18

4.67 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका

ओडिशामध्ये 4.67 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे.

07:06 August 18

लालू प्रसाद प्रसाद यादव पोहोचले बिहारमध्ये

आरजेडी प्रमुख लालू प्रसाद प्रसाद यादव हे दिल्लीहून पाटणाला पोहोचले आहेत.

07:05 August 18

सीबीआयचे पथक टीएमसी नेत्याच्या घरी पोहोचले

सीबीआयचे पथक टीएमसी बीरभूम जिल्हा अध्यक्ष अनुब्रता मंडल यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. ते त्यांच्या मुलीची चौकशी करणार आहेत. गुरांच्या तस्करी प्रकरणी अनुब्रत मोंडल 20 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत आहेत.

07:05 August 18

पाकचा ड्रोनद्वारे होणारा डाव उधळला

जम्मूमध्ये पाकिस्तानी ड्रोनने टाकलेले शस्त्रास्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आले आहे.

07:05 August 18

अरविंद केजरीवाल यांची नवीन मोहिम सुरू

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी भारताला जगात नंबर वन बनवण्याचे मिशन सुरू केले.

07:05 August 18

इंग्लंडचे पंतप्रधान कोण होणार

लिझ ट्रस यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक यांच्या पुढे आघाडी सुरू ठेवली आहे.

07:05 August 18

हैदराबादमध्ये आंतरराज्य अमली पदार्थ तस्कराला अटक

हैदराबाद अमली पदार्थ विरोधी विभागाने पोलिसांसह आंतरराज्य अमली पदार्थ तस्कराला अटक केली. 20 एक्स्टसी गोळ्या, एलएसडी आणि 4 ग्रॅम एमडीएमए आणि फोन आणि 4000 रुपये रोख जप्त केले. मुख्य आरोपी गोव्याचा असल्याचे डीसीपी चक्रवर्ती गुम्मी यांनी सांगितले.

07:04 August 18

पाकिस्तानमध्ये बनाना प्रजासत्ताक

पाकिस्तानमध्ये बनाना प्रजासत्ताक होत असल्याची टीका पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे.

07:04 August 18

काबूलमधील मशिदीत झालेल्या स्फोटात किमान 20 ठार, 40 जखमी

काबूलमधील मशिदीत झालेल्या स्फोटात 20 जण ठार झाले आहेत. तर 40 जण जखमी झाले आहेत.

06:22 August 18

Maharashtra Breaking News केंद्राकडून द्वेष पसरविणारे ८ युट्यूब चॅनेल व फेसबुक अकाउंट बंद

मुंबईभाजप नेते मोहित कंबोज Mohit Kamboj tweet यांनी राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर तत्कालीन जलसंपदा मंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली Ajit Pawar in irrigation scam आहे. सिंचन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी क्लीनचिट दिली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने अजित पवारांना क्लीनचिट दिली नाही. ajit pawar clean chit report in court आहे. त्यामुळे मोहित कंबोज यांचा निशाणा अजित पवार हे असावेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Last Updated : Aug 18, 2022, 4:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details