महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महायुतीत रासपवर अन्याय झाला - महादेव जानकर - election news

आज आम्ही महायुतीतून बाहेर पडणे बरोबर दिसणार नाही. आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणूनच लढणार आहोत. तसेच 288 जागांवर मी महायुतीला मदत करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

महादेव जानकर

By

Published : Oct 7, 2019, 3:24 PM IST

मुंबई- आम्हाला महायुतीत दोन जागा सोडल्या पण, आमच्या चिन्हावर लढण्याचे भाजपने मान्य केले होते. त्यामुळे आम्हाला एबी फॉर्म देण्यात आला नसून आमच्यावर अन्याय झाल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. भाजपने आम्हाला धोका दिला असल्याचेही ते म्हणाले. महादेव जानकर यांनी पत्रकार परिषद घेत युतीत सर्वकाही अलबेल नसल्याचेच संकेत दिले आहेत.

हेही वाचा - नोबेल २०१९ : 'यांना' मिळाला 'शरीरविज्ञान/ वैद्यकशास्त्र' विषयातील नोबेल पुरस्कार!

गंगाखेडला रासपचा अधिकृत उमेदवार आहे. रत्नाकर गुट्टे हे आता आमचे अधिकृत उमेदवार आहेत. गंगाखेडची जागा महायुतीत सेनेला सोडली आहे. मात्र, तिथे आमचा उमेदवार लढणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी तिथून सेनेच्या उमेदवाराला माघार घेण्यास सांगावे. अन्यथा मैत्रीपूर्ण लढत होईल, असे आवाहन महादेव जानकर यांनी सांगितले. दौंडचे राहुल कूल आणि जिंतूरच्या उमेदवार मेघना बोर्डीकर हे रासपचे उमेदवार नाहीत कारण त्यांनी भाजपच्या एबी फॉर्मवर अर्ज भरले असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मी या दोन्ही उमेदवारांना माझ्या पक्षातून बेदखल करत असल्याचे जानकर यांनी सांगितले.

महादेव जानकर

आज आम्ही महायुतीतून बाहेर पडणे बरोबर दिसणार नाही. आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणूनच लढणार आहोत. तसेच 288 जागांवर मी महायुतीला मदत करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details