सभागृहात शिस्तीचे पालन झाले पाहिजे. जावई आमच्यावर लक्ष ठेवतील, अन्यथा आम्ही लेकीला कळवू, अशी मिश्किल टिप्पणी मंत्री जयंत पाटील यांनी केली.
Vidhan Sabha Speaker Election : जावई आमच्यावर लक्ष ठेवतील, अन्यथा आम्ही लेकीला कळवू- जयंत पाटील
13:17 July 03
जावई आमच्यावर लक्ष ठेवतील, अन्यथा आम्ही लेकीला कळवू- जयंत पाटील
12:57 July 03
देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल दु:ख वाटते- सुनील प्रभू
देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री पदी होणार असे वाटत होते. त्यामुळे मित्र म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल दु:ख वाटत असल्याचे सुनील प्रभू यांनी सांगितले. व्हिप मोडून मतदान झाले, हीदेखील खंत असणार आहे.
12:45 July 03
अमित शाह एकच डाव टाकतात...छगन भुजबळ
विधानसभेत अभिनंदपर ठरावात नेत्यांची चौफेर टोलेबाजी सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले, की अमित शाह एकच डाव टाकतात..कुठे सोंगट्या जातात..हे कळतच नाही, हा प्रश्न जागतिक बुद्धीबळपट्टूलाही पडल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.
12:33 July 03
राज्याच्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सहकार्य कराल ही आशा - उपमुख्यमंत्री फडणवीस
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युतीचे हे सरकार महाराष्ट्राच्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यासाठी तुम्ही (सभापती) चांगले सहकार्य कराल अशी आशा आहे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले.
12:30 July 03
माझ्यसह अनेक मंत्री सरकार सोडून गेले ही खूप मोठी गोष्ट - एकनाथ शिंदे
मी स्वतः मंत्री होतो, इतर अनेक मंत्रीही सरकार सोडून गेले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारधारेला वाहिलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती,असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
12:23 July 03
लोक विरोधी पक्षातून सरकारमध्ये जात असल्याचे पाहिले, यावेळी सरकारचे नेते विरोधी पक्षात गेले - एकनाथ शिंदे
आता बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासावर आधारित भाजप-शिवसेना सरकारने सत्ता हाती घेतली आहे. आजपर्यंत, लोक विरोधी पक्षाकडून सरकारकडे जात होते, हे आपण पाहिले. परंतु, यावेळी सरकारचे नेते विरोधी पक्षात गेले, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत बोलले.
12:19 July 03
राहुल नार्वेकर हे देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष - देवेंद्र फडणवसी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. राहुल नार्वेकर हे देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष असल्याचे ते म्हणाले.
12:16 July 03
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहुल नार्वेकरांना केले अभिनंदन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहुल नार्वेकरांना केले अभिनंदन.
12:09 July 03
भाजपचे राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला
भाजप आमदार राहुल नार्वेकर यांनी "जय भवानी, जय शिवाजी", "जय श्री राम", "भारत माता की जय" आणि "वंदे मातरम" च्या घोषणांमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
12:04 July 03
एआयएमआयएमने भाजपच उमेदवाराच्या विरोधात मतदान करणे टाळले
एआयएमआयएमनेही भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या विरोधात मतदान करणे टाळले. नार्वेकरांच्या विरोधात अंतिम मतांची संख्या 107 आहे. त्यांना समर्थनार्थ 164 मते मिळाली आहेत.
11:58 July 03
मोठी बातमी.. विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर
विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे.
11:56 July 03
नवाब मलिक आणि अनिल देशमुख विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गैरहजर
राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गैरहजर.
11:52 July 03
शिवसेनेच्या यामिनी जाधव मतदान करताना सभागृहात 'ईडी' 'ईडी' ची घोषणाबाजी, पाहा व्हिडिओ
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव यांनी मत दिले तेव्हा विरोधी बाकावरील आमदारांनी "ईडी, ईडी" अशी घोषणाबाजी केली.
11:45 July 03
समाजवादी पक्षाने भाजपच्या उमेदवाराविरोधात मतदान करणे टाळले
समाजवादी पक्षाने (एसपी) भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या विरोधात मतदान करणे टाळले. त्यांचे दोन्ही आमदार अबू आझमी आणि रईस शेख शीरगणती प्रक्रियेवेळी बसून राहिले.
11:43 July 03
एकनाथ शिंदे गट आणि भाजपला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमत मिळाले
एकनाथ शिंदे गट आणि भाजपला बहुमत मिळाले. शिंदे गटाने सेनेचा व्हिप पाळला नाही.
11:38 July 03
भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना 164 पेक्षा अधिक मते मिळवलीत
भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना 164 पेक्षा अधिक मते मिळवलीत. बहुमताचा आकडा पार केला.
11:36 July 03
भाजपच्या नार्वेकरांना 145 पेक्षा अधिक मत, बहुमत जिंकले
भाजपच्या नार्वेकरांना 145 पेक्षा अधिक मत, बहुमत जिंकले.
11:27 July 03
मविआचे राजन साळवी आणि भाजपचे राहुल नार्वेकर यांच्यात अध्यक्षपदासाठी लढत
मविआकडून राजन साळवी आणि भाजपकडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या रिंगणात.
11:23 July 03
शिंदे गटाने नार्वेकरांच्या बाजूने केले मतदान, शिवसेनेचा व्हिप पाळला नाही
शिंदे गटाने नार्वेकरांच्या बाजूने मतदान केले. शिंदे गटाने शिवसेनेचा व्हिप पाळला नाही.
11:19 July 03
शीरगणतीची प्रक्रिया नव्याने सुरू
शीरगणतीची प्रक्रिया नव्याने सुरू. आमदारांना जागेवरून नाव, अनुक्रमांक सांगावे लागेल.
11:15 July 03
शिंदे गट आणि भाजपची मतमोजणी सुरू
मतमोजणीला सुरुवात. शिंदे गट आणि भाजपची मतमोजणी सुरू.
11:10 July 03
विधानसभा अध्यक्षांची निवडणूक शीरगणती पद्धतीने होणार
विधानसभा अध्यक्षांची निवडणूक शीरगणती पद्धतीने होणार. मतदानावेळी सभागृहाचे दरवाचे बंद राहतील.
11:07 July 03
विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन सुरू
विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन सुरू झाले.
10:44 July 03
अतिरेक्यासारखे शिंदे गटातील आमदारांना आणले- आदित्य ठाकरे
मुंबई- आम्हाला धोका दिला तसा मुंबईला धोका देऊ नका, अतिरेक्यासारख शिंदे गटातील आमदारांना आणल्याची टीका मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
10:31 July 03
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या जवळपास ४८ आमदारांना वाय प्लस सुरक्षा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या जवळपास ४८ आमदारांना वाय प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. शिवसेनेचे बंडखोर आणि काही अपक्ष आमदारांचा यामध्ये समावेश असणार आहे. राज्य सरकारतर्फे या आमदारांना लवकरच 24 तास वाय प्लस ( Y - PLUS ) सुरक्षा देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभागाच्या सुचनेनंतर पोलीस विभागाचा महत्वपूर्ण निर्णय
10:11 July 03
शिवसेनेचे विधानभवनमधील कार्यालय बंद
मुंबई-शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय यांनी कळवल्यानुसार शिवसेनेचे विधानभवनमधील कार्यालय बंद करण्यात आले. शिंदे गटाने हे कार्यालय बंद केल्याचे समजते.
09:35 July 03
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला व्हिप लागू होत नाही- सुधीर मुनंगटीवार यांचा दावा
११ वाजता अधिवेशनाची सुरुवात होईल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा परिचय होईल. राहुल नार्वेकर यांचा प्रस्ताव सभागृहाचा समोर येईल. आवाजी मतदानाने ही प्रक्रिया होईल. जर कोणी आक्षेप घेतला तर वैयक्तिक मते घेतली जाईल. त्यानंतर अध्यक्षपदाची निवड होईल, असे भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी सांगितले.
08:45 July 03
शिवसेना उपनेते शिवाजीराव पाटील यांची शिवसेनेतून हाकलपट्टी, काय ठरले कारण?
मुंबई- शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पाटील यांची पक्षातून केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.
08:39 July 03
दणक्यात विधानसभा अध्यक्षपद जिंकू- भाजप नेते राम कदम
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या तोंडापूर्वी भाजप नेते राम कदम यांनी ट्विट केले आहे. दणक्यात विधानसभा अध्यक्षपद जिंकू, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
07:56 July 03
राज्यपाल महोदयांनी घटनाबाह्य कृतीचे पेढे खाल्ले...शिवसेनेची सामनातून राज्यपालांवर टीका
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने सामनातून राज्यपालांवर टीका केली आहे. सामनात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लिहिलेल्या रोखठोकमध्ये म्हटले, की पक्षांतरबंदी विरोधी कायद्याने बंडखोरांची आमदारकी जाऊ शकते. पण महाराष्ट्राचे राज्यपाल व सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर करणाऱ्यांना बळ दिले. पक्ष बदलणाऱ्या अपात्र ठरण्याची शक्यता असलेल्या आमदारांनी महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य ठरविले. राज्यपाल महोदयांनी घटनाबाह्य कृतीचे पेढे खाल्ले, या शब्दात संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
07:42 July 03
अजित पवारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, मात्र तरीही राहणार बहुमत चाचणीला उपस्थित
मुंबई - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, 3 आणि 4 जुलैला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. या अधिवेशनात पहिल्याच दिवशी नवीन सरकारला बहुमत चाचणी द्यावी लागणार आहे. विरोधी पक्षचे आमदार म्हणून त्यांनाही यावेळी मतदान करावे लागेल. त्यामुळे अजित पवार यांनी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करून घेतली. मात्र ही चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पण बहुमत चाचणीसाठी कोरोना नियमांचे पालन करून अजित पवार सभागृहात उपस्थित राहणार आल्यसाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
07:31 July 03
बंडखोर आमदारांना कुणाचा व्हीप लागू होणार...विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी पेच
दोन दिवसीय विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे सरकारला राज्यपालांनी आपले बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच उद्या विधानसभा अध्यक्षाची देखील निवडणूक पार पडणार आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाकडून राहुल नार्वेकर तर, महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना पक्षाने ठरवून दिलेल्या उमेदवाराला मतदान करावे यासाठीच व्हीप जारी करण्यात आले आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी करण्याची माहिती प्रसारमाध्यमांना शनिवारी दिली आहे. महाविकास आघाडीचे विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत उमेदवार राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
व्हिप म्हणजे काय?एखाद्या पक्षाने कोणत्या मुद्द्यावर सभागृहामध्ये भूमिका घ्यायची याबद्दल घेतलेला निर्णय म्हणजेच व्हिप होय. संसदीय लोकशाहीत पक्षातर्फे प्रतिनिधिंना व्हिप जारी केला जातो.पक्षाचा आदेश सर्व आमदारांना बंधनकारक असतो. हा व्हीप राजकीय पक्षाचा अधिकार असतो. विधिमंडळात आमदारांना पक्षादेश पाळणे हाच व्हीपचा मुख्य हेतू असतो. विधानसभेत महत्त्वाच्या विषयावर मतदानासाठी संबंधित पक्षाने कोणाला मतदान करायचे याचा निर्णय घ्याचा असेल, तर याबाबद पक्षादेश व्हीपमार्फत जारी करण्यात येतो. तसेच पक्षाच्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पक्ष असे वेळेवेळी व्हीप जारी करतात.
06:35 July 03
विधानसभेच्या विशेष अधिवेशनानिमित्त व्यूहरचना... एकनाथ शिंदे गटाची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक
विधानसभेच्या विशेष अधिवेशनानिमित्त एकनाथ शिंदे गट आणि भाजपने तयारी सुरू केली आहे. शनिवारी रात्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपची हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.
06:16 July 03
Live Maharashtra Breaking news : जावई आमच्यावर लक्ष ठेवतील, अन्यथा आम्ही लेकीला कळवू- जयंत पाटील
मुंबई- विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात होणार आहे. भाजपकडून नार्वेकर आणि शिवसेनेचे सावळी यांच्यामध्ये थेट लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. नार्वेकर यांच्या बाजुने मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडखोर शिवसेना गटाचे 40 आणि 10 अपक्ष आमदार आणि त्याशिवाय भाजपचे 106 व भाजपसोबत असलेले जवळपास 14-15 असे 120 आमदार आहेत. त्यामुळे नार्वेकर यांना 170 आमदारांचे मतदान निश्चितपणे होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडे शिवसेनेकडे उरलेले 16, राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 एवढेच आमदार आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर सहज विजयी होतील, असे चित्र सध्यातरी दिसत आहे. तथापि, ऐनवेळी काही घडामोडी होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार साळवी बाजी मारतात का, हे बघणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यपालांनी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलाविले आहे. आज ( 3 जुलै ) आणि उद्या ( 4 जुलै ) असे दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे. आज अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतच संख्याबळाचा फैसला होणार असला तरी या निवडणुकीवर विरोधकांनी, प्रामुख्याने काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर रंगतदार ठरत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.