महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

maharashtra assembly Live Updates : विधानसभेच्या कामकाजाचे ताजे अपटेडस् वाचा एका क्लिकवर... - etv bharat maharashtra

Live maharashtra legislative assembly monsoon session
Live Updates : विधानसभेच्या कामकाजाचे ताजे अपटेडस् वाचा एका क्लिकवर...

By

Published : Jul 5, 2021, 9:58 AM IST

Updated : Jul 5, 2021, 4:04 PM IST

14:58 July 05

  • मराठा आरक्षणासाठी केंद्राकडे शिफारस करण्यासंबंधिचा ठराव एकमताने मंजूर
  • अशोक चव्हाणांनी मांडला होता ठराव

14:56 July 05

  • विरोधकांचा सभात्याग

14:53 July 05

  • सभागृहाचे कामकाज संजय कुटे, योगेश सागर, बंटी बागडीया, अतुल भातकळकर, पराग आळवणी, आशिष शेलार,  नारायण कुचे, हरीश पिंपळे, अभिमन्यू पवार, गिरीष महाजन यांचा समावेश
  • एक वर्षासाठी निलंबन
  • निलंबनाच्या काळात मुंबई, नागपूर अधिवेशनात जाण्याला मज्जाव

14:49 July 05

  • विधानसभेच्या 12 सदस्यांचे एका वर्षासाठीच्या निलंबनासाठीचा ठराव मंजूर

14:46 July 05

काही लोक ठरवून विरोधकांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत - देवेंद्र फडणवीस

14:41 July 05

  • मी असंसदीय शब्द वापरले असतील तर शिक्षा भोगण्यास तयार-  तालीका अध्यक्ष

14:36 July 05

  • एका बाजूच्या सदस्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या- भास्कर जाधव

13:11 July 05

  • मुंबई - इंपेरिकल डाटावरून विधानसभा अध्यक्षांच्या केबिनमध्ये भाजप आमदार गेले असता, यावेळी भास्कर जाधव आणि भाजपा आमदार संजय कुठे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच भाजपाला गुंडगिरी करून हे कामकाज चालवायचे आहे. या सर्वावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

13:10 July 05

  • विधानसभेचे कामकाज पुन्हा  स्थगित

13:08 July 05

  • विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू

12:54 July 05

  • विधानसभा 10  मिनीटांसाठी स्थगित

12:54 July 05

  • ओबीसी इंपेरीकल डाटा संदर्भातील ठराव सभागृहात मंजूर

12:49 July 05

  • ओबीसींचा डाटा केंद्र सरकारच्या योजनेसाठी वापरता मग आरक्षणासाठी का देत नाही; छगन भुजबळांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

12:26 July 05

  • ओबीसी इंपेरीकल डाटा संदर्भातील ठरावावरून विरोधक आणि सरकारमध्ये खडाजंगी

12:16 July 05

  • मनात येईल तसा कारभार सुरु असल्याचा विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीसांचा आरोप

12:09 July 05

  • सरकारकडून सादर करण्यात येत असलेल्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांचा आक्षेप

12:08 July 05

  • महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2021 मंजूर करण्यात आले आहे.

11:58 July 05

  • उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2021 पटलावर ठेवण्यात आला असून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

11:45 July 05

  • सरकारविरोधात विरोधकांची सभागृहात घोषणाबाजी

11:35 July 05

अजित पवारांची प्रतिक्रिया
  • स्वप्निल लोणकरची आत्महत्या वेदनादायी असल्याची अजित पवारांची प्रतिक्रिया
  • काल झालेल्या मंत्रीमडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली असेही अजित पवार म्हणाले
  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे परीक्षा घेता आल्या नाहीत- अजित पवार
  • सरकार 31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार - अजित पवार
  • आम्ही स्वप्निलच्या कुटुंबियांच्या दुखात सहभागी आहोत - अजित पवार

11:31 July 05

  • एमपीएसीच्या कार्यप्रणालीवर चर्चा करण्याची सुधीर मुंगटीवारांनी मागणी

11:30 July 05

  • स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत द्या, अशी मागणी सुधीर मुंगटीवारांनी केली आहे.

11:25 July 05

  • स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक
  • एमपीएसीची कार्यप्रणाली सुधारण्याची गरज असल्याची फडणवीसांचे मत
  • सरकार या संदर्भात काही कारवाई करणार का? फडणवीसांचा सवाल
  • कामकाज बाजूला ठेवून एमपीएसीच्या कार्यप्रणालीवर चर्चा करण्याची फडणवीसांची मागणी
  • नियम 57 च्या माध्यमातून फडणवीसांची सूचना

11:16 July 05

  • मुंगटीवारांनी मला तरुंगात टाकण्याची घमकी दिली - भास्कर जाधव

11:06 July 05

सुधीर मुनगंटीवरांची प्रतिक्रिया
  • महाराष्ट्र विधानसभा कामकाज पुस्तकानुसार विधानसभेचे कामकाज व्हावे - सुधीर मुंगटीवार

11:04 July 05

  • प्रश्नोत्तरे आणि तारांकित प्रश्न नसल्याने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आक्रमक

10:48 July 05

  • जरंडेश्वरवर झालेल्या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिले - चंद्रकांत पाटील

10:44 July 05

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवन परिसरात दाखल झाले असून सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्रीही दाखल झाले आहेत.

10:34 July 05

  • ओबीसी इंपेरीकल डाटा संदर्भातील ठराव दिशाभूल करणारा, तरीही या ठरावाला आमचा पाठींबा - देवेंद्र फडणवीस
  • ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे धोरण वेळकाढूपणा - देवेंद्र फडणवीस
  • ओबीसी आरक्षणासाठी कोणताही प्रयत्न राज्य सरकारने केला तर त्याला आमचा प्रयत्न असेल - देवेंद्र फडणवीस
  • चंद्रकांत पाटलांचे पत्र पुढे करून मुळ मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस
  • एमपीएससी बाबत आमच्याकडून स्थगन प्रस्ताव - देवेंद्र फडणवीस

10:32 July 05

  • राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा कृषी कायदा तयार करणार-नाना पटोले

10:29 July 05

  • शेतकऱ्यांच्या मुद्यावर विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपाचे आंदोलन

10:22 July 05

  • पीकविम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनांंचे विधीमंडळाबाहेर आंदोलन

10:17 July 05

  • एमपीएससीच्या मुद्यावरून विधीमंडळाबाहेर आमदार राम सातपुते यांचे आंदोलन

10:05 July 05

नवाब मलिकांनी कृषी कायद्यांवर स्पष्ट केली भूमिका

  • केंद्राने नवे कृषी कायदे मागे घ्यावे
  • सर्वोच्च न्यायालयाने या या कायद्यांना स्थिगिती दिली आहे
  • हे कायदे चुकीचे आहे, हे केंद्राला समजू लागले आहे

09:12 July 05

नव्या कृषी कायद्याविरोधात ठराव आणणार - नितीन राऊत

मुंबई -अनेक दिवसांपासून शेतकरी नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. हा कृषी कायदा रद्द करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यांच्या मागणीचे समर्थन करण्याचे नियोजन असून त्यासंदर्भातील ठराव विधानसभेत आणणार असल्याची माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. 

Last Updated : Jul 5, 2021, 4:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details