मुंबई - सर्वोच्च न्यायालयातील शिंदे गट विरुद्ध शिवसेना यांचा वाद सर्वोच्च न्यायालयमध्ये पोहोचला आहे आणि सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो लोकशाहीची दिशा ठरवणारा असेल या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटत आहेत मात्र आता साहित्यिक लेखक आणि कवी कवयित्री यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत नीलम ताई गोरे यांच्या पुढाकारात भेट घेतली त्यामुळे राज्यातील साहित्यिक वर्तुळात ह्या घडामोडी बाबत चर्चेला सुरुवात झाली आहे
साहित्यिकांनी दुःख व्यक्त केले हा संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला देशातील जनतेला उत्सुकता आहेच मात्र साहित्यिक वर्तुळातीलसुद्धा अनेक दिग्गज लेखकांना याबद्दल उत्सुकता आहेत त्यामध्ये साहित्यिक अर्जुन डांगळे लेखिका मेधा कुलकर्णी कवी अरुण म्हात्रे कवयित्री नीरजा तसेच डॉक्टर महेश केळुसकर हेमंत करणे रवींद्र पोखरकर आधी अनेक साहित्यिक कवी लेखक यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक केली भेट घेतली ह्या भेटी बाबत नीलम ताई गोऱ्हे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या या अनौपचारिक बैठकीत राज्यातील सध्याच्या दुषित राजकीय परिस्थितीवर या सर्व साहित्यिकांनी दुःख व्यक्त केले
शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोविड काळात केलेले काम आणि त्यांच्या काळात झालेले महाराष्ट्र शासनाचे काम याबद्दल अनेक सकारात्मक बाबी त्यांनी सांगितल्या आहेत अशी माहिती नीलमताई गोऱ्हे विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना उपनेत्या यांनी ईटीव्ही सोबत संवाद साधताना दिली येत्या काळात मराठी भाषेच्या संदर्भात तसेच रंगभूमीच्या संदर्भात आणि साहित्य कलेच्या संदर्भात अनेक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित साहित्यिकांना दिले ही माहिती विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना दिली