मुंबई- जगभरात स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण लक्षणीयआहेत. टाटा रुग्णालयासह ११ कर्करोग केंद्रांनी या आजारांची व्याप्ती रोखण्यासाठी अभ्यास केला. तब्बल अकरा वर्षानंतर स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी सुन्न होऊन त्यांची वाढ किंवा प्रसार थांबवणाऱ्या इंजेक्शनचा शोध अभ्यास गटाने लावला. हे इंजेक्शन केवळ तीस रुपयांत उपलब्ध होणार ( breast cancer treatment in thirty rupees ) आहे. आजवर सुमारे ८० टक्क्यापर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे, असा दावा डॉक्टरांकडून केला जातो आहे. मात्र, कर्करोग ग्रस्तांना या इंजेक्शनमुळे मोठा दिलासा मिळणार ( Lignocaine injection cures breast cancer ) आहे.
इंजेक्शनच्या एका डोसची किंमत केवळ ३० ते ४० रुपये ( Lignocaine injection in thirty rupees )देशात दरवर्षी अडीच हजार महिलांना स्तनाच्या कर्करोगासाठीची शस्त्रक्रिया करावी लागते. टाटा मेमोरियल रुग्णालयाने २०११ मध्ये स्तनाच्या कर्करोग्रस्त रुग्णांच्या उपचारांवर नवीन अभ्यास सुरू केला होता. ‘इफेक्ट ऑफ पेरी-टू मोरल इं फिल्ट्रेशन ऑफ लोकल एनेस्थेटिक प्रायर टू सर्जरी ऑन सर्व्हाइवल इन अर्ली ब्रेस्ट कँसर’ या शीर्षकाखाली झालेल्या अभ्यासात देशातील टाटा रुग्णालयासह ११ कर्करोग केंद्रांचा समावेश होता. तब्बल अकरा वर्षे स्तनाच्या कर्करोगावरील नवीन उपचार पद्धतीचा अभ्यास चालला. या अभ्यासासाठी ३० ते ७० वयोगटातील १६०० महिलांची निवड करण्यात आली होती. दोन गटांमध्ये महिलांची विभागणी करण्यात आली होती. दरम्यान, टाटा मेमोरियल रुग्णालयातील संशोधकांनी स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी सुन्न होऊन त्यांची वाढ किंवा प्रसार थांबवणाऱ्या इंजेक्शनचा शोध लावला आहे. ८०० महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगावर शस्त्रक्रियेद्वारे उपचार केले. तसेच इतर गटातील ८०० महिलांवर इंजेक्शनद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विशेष म्हणजे यावर दिलेल्या इंजेक्शनच्या एका डोसची किंमत केवळ ३० ते ४० रुपये असल्याची माहिती रुग्णालयामार्फत देण्यात आली. स्तनाच्या कर्करोगावर उपचारासाठी ‘वरदान’ म्हणून या इंजेक्शनकडे पाहिले जात आहे.