मुंबई - राज्यसभेच्या हाय होल्टेज निवडणुकीनंतर ( Rajya Sabha elections ) सध्या चर्चा सुरू आहे ती विधान परिषद ( Legislative Council elections ) निवडणुकीची. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi ) नाराजी समोर आली आहे. प्रमुख तिनही पक्षांचे नेते 'सब कुछ चंगा सी' म्हणत असले तरी, तीनही पक्षांची नाराजीची खदखद लपून राहिलेली नाही. त्यातच आता आघाडीचा मुख्य पक्ष असलेल्या शिवसेनेने ( Shiv Sena ) प्रत्येकाने आपआले बघा अशी भूमिका घेतल्याने काँग्रेस मात्र, टेन्शनमध्ये आहे. यासोबतच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीने सुद्धा आता चर्चेला वेग आला आहे. यासंदर्भात आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रपति कमी पक्षाचा कार्यकर्ता जास्त -यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, "राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी विरोधी आघाडीने किमान सहा महिने आधी करायला हवी होती. माननीय शरद पवार ही निवडणूक लढायला तयार नाहीत त्यामुळे पवार साहेबांनी नाही म्हटल्यावर त्या संपूर्ण विरोधी पक्षाच्या आघाडीतली ऊर्जा निघून गेली. सर्वसहमतीच्या नावाखाली कोणीही उमेदवार उभा केला असे चालत नाही. त्यामुळे आता सत्ताधारी भाजप आपल्याच पक्षातील एखाद्या नेत्याला राष्ट्रवादी करेल. तो राष्ट्रपती कमी आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच अधिक काम करेल. स्वतंत्रपणे काम करणारे राष्ट्रपती फार कमी काळात मिळाल्याचे त्यांनी सांगितले."