महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

फडणवीस सरकारच्या काळात लावलेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीची आता चौकशी होणार - वृक्ष लागवडीची चौकशी

या समिती मार्फत ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत खासगी संस्थेने केलेल्या आर्थिक योगदानाची माहिती तपासली जाईल. तसेच राज्य सरकारकडून किती पैसे खर्च करण्यात आले आणि वृक्ष लागवडीनंतर किती जागे जगली याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती वनराज्य मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत दिली.

planting of 33 crore trees
33 कोटी वृक्ष लागवडीची आता चौकशी होणार

By

Published : Mar 3, 2021, 12:12 PM IST

Updated : Mar 3, 2021, 12:39 PM IST


मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील 33 कोटी वृक्ष लागवडीची आता चौकशी होणार असून, वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी ही माहिती विधानसभेत दिली. राज्यात फडणवीस सरकारच्या काळात 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली त्याबाबत सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी वृक्ष लागवडीची चौकशी करण्यासाठी कमिटी नेमणार का? तसेच देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट्स यशस्वी झालं का? असा सवाल उपस्थित केला आहे. यावर उत्तर देताना वन राज्य मंत्र्यांनी विधिमंडळ समिती नेमली जाणार असे सांगितले.


या समिती मार्फत ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत खासगी संस्थेने केलेल्या आर्थिक योगदानाची माहिती तपासली जाईल. तसेच राज्य सरकारकडून किती पैसे खर्च करण्यात आले आणि वृक्ष लागवडीनंतर किती जागे जगली याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती वनराज्य मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत दिली.

जयकुमार गोरे यांनी उपस्थित केला प्रश्न-

वृक्षलागवडीसाठी निधी खर्च झाला आहे. तर झाडे जगविण्यासाठी शासनाने किती निधी खर्च केला.. वन मजूर का कमी केली. त्या वनमजुरांना पुन्हा सेवेत घेऊन ती झाडे जगवणार का असा प्रश्न भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी उपस्थित केला असता, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या झाडांचे संवर्धन करण्यासाठी ३५२ कोटी निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती दिली.

नाना पटोलेंनी केली समिती नेमण्याची मागणी-

७५ टक्के झाडे जिवंत आहेत. बाबा आत्राम म्हणतात झाडेच नाहीत. गोरे म्हणतात की २४०० कोटी पे्क्षा जास्त निधी खर्च केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची संयुक्त समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी नाना पटोले यांनी केली होती. त्यावर समितीकडून चौकशी करण्याची ग्वाही सरकारकडून देण्यात आली.

मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांचा विश्वास नाही का?


दरम्यान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मंत्र्यांचा विश्वास नाही का? असा सवाल उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखी उत्तरात 75 टक्के रोपे जिवंत असल्याचे म्हटल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राजकीय आखाड्या सारखा उपयोग करणे योग्य नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात म्हटले. तर भाजप आमदार आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने हे ईश्वरीय कार्य आहे. एक वर्षांपूर्वी वडेट्टीवार यांनी वृक्ष लागवडीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली. त्यावर मी 14 पत्र लिहिले की चौकशी करा. मात्र आता पुन्हा चौकशी करणार आहात तर माझं एक सांगण आहे ही चौकशी किती दिवसात स्थापन होईल आणि याचा अहवाल किती दिवसात सभागृहाला प्राप्त होईल, असा सवाल उपस्थित केला.

३१ मार्च पर्यंत समिती होणार स्थापन-

वृक्ष लागवडी संदर्भात समिती किती दिवसात गठीत होईल, आणि त्याचा अहवाल किती दिवसात येईल? असा सवाल मुनगंटीवार यांना केला होता. त्यावर 31मार्च 2021 पर्यंत समिती स्थापन करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच ही समिती पुढील 4 महिने चौैकशी करेल. त्या कालावधीत त्यांना माहिती मिळण्य़ास अधिकचा वेळ म्हणून २ महिने वाढवून देण्यात येतील अशा प्रकारे ६ महिन्यात ती समिती अहवाल सादर करेल, अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली.

Last Updated : Mar 3, 2021, 12:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details