महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आज..आत्ता...IND vs WI १ST T-२० : भारताचा वेस्ट इंडिजवर चार गडी राखून विजय - top news maharastra

झरझर नजर... दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

मराठी बातम्या

By

Published : Aug 3, 2019, 8:19 AM IST

Updated : Aug 3, 2019, 11:40 PM IST

११.३५ - IND vs WI १ST T-२० : भारताचा वेस्ट इंडिजवर चार गडी राखून विजय

प्लोरिडा - भारतीय गोलंदाजांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुध्दचा पहिला टी-२० सामन्यात ४ गडी राखून जिंकला. कर्णधार कोहलीने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय युवा गोलंदाजी सार्थ ठरवला आणि विंडिजच्या संघाला अवघ्या ९५ धावांवर रोखले.सविस्तर वाचा...

११.30 - पक्षाने आदेश दिला तरच विधानसभा लढवणार - अशोक चव्हाण

नांदेड - जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. या दोन्ही दिवशी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. मात्र, मी कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी संदर्भात अर्ज केला नाही. पण, पक्षाने आदेश दिला तरच निवडणूक लढवेन, अन्यथा नाही, असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे या मागे चव्हाण यांचा काय हेतू आहे ? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.सविस्तर वाचा...

९.०० - राजकीय पक्षांकडून होणाऱ्या पैसे हस्तांतरणावर सेबीकडून चिंता व्यक्त

कोलकाता - राजकीय पक्षांकडून करण्यात येणाऱ्या पैसे हस्तांतरणावर सेबीचे कार्यकारी संचालक अमरजीत सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. या मार्गाचा अनेकदा कॉर्पोरेटकडून पैसे वळविण्यासाठी वापर होतो, असेही त्यांनी म्हटले आहे. ते सीआयआयच्या वित्तीय बाजार परिषदेत बोलत होते. सविस्तर वाचा...सविस्तर वाचा...

८.४८ - मराठी अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचं निधन, चतुरस्त्र अभिनेता हरपल्याची भावना

मुंबई - मराठी सिने नाट्य सृष्टीतील परिचित चेहरा असलेले ज्येष्ठ अभिनेते श्रीराम कोलहटकर यांचं आज सकाळी गिरगावातील राहत्या घरी निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने एक चतुरस्त्र अभिनेता हरपल्याची भावना सिने आणि टीव्ही इंडस्ट्रीतुन व्यक्त होते आहे.सविस्तर वाचा...

७.०० - अखेर 4 तासानंतर मध्य, हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा धीम्या गतीने सुरू

मुंबई- सायन ते कुर्ला दरम्यान दुपारपासून ठप्प असलेली लोकल सेवा अखेर 4 तासानंतर संध्याकाळी सुरू झाली. त्यामुळे परतीच्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. संध्याकाळी 4 वाजून 43 मिनिटांनी कुर्ला येथून कल्याणला लोकल रवाना झाली. सविस्तर वाचा...

६.४० - जेव्हा आठवले रागवले...

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात एका उद्घाटन कार्यक्रमात आलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, हे आज रागवल्याचे पाहायला मिळाले. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देत असताना अचानक एका तरूणाने हलगी वाजवायला सुरूवात केली.सविस्तर वाचा..

६.३० - मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान 4 ते 5 नेत्यांचा भाजप प्रवेश, आमदार देशमुखांचा गौप्यस्फोट

सांगली- मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान मोठा राजकीय भूकंप घडणार आहे. यावेळी 4 ते 5 मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार, असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केला. सविस्तर वाचा..

६.१५ - मिसेस फडणवीसांचं नवं गाणं, ग्लॅमरस अंदाजात करणार सादर

मुंबई -महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांच्या गायनाच्या आवडीबद्दल सर्वांना माहिती आहे. बऱ्याच कार्यक्रमांमधुन, अल्बममधुन त्यांचे गाण्याबद्दलचे प्रेम नेहमीच दिसून आले आहे.सविस्तर वाचा..

६.०० - पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना जोड्याने मारले पाहिजे, आमदार बच्चू कडू यांचा दलबदलू नेत्यांवर 'प्रहार'

अमरावती - प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी राज्यातील दलबदलू नेत्यांवर जोरदार 'प्रहार' केला आहे. भाजपात सध्या मेघाभरती सुरू आहे. सविस्तर वाचा..

५.५० - जम्मू-काश्मीर : अमरनाथ यात्रेकरुंना एअरलिफ्ट करण्यासाठी वायुसेनेच्या सी-१७ विमानाचे पाचारण

श्रीनगर - अमरनाथ यात्रेकरुंना काश्मीरमधून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने भारतीय वायुसेनेची मदत मागितली आहे. यात्रेकरुंना सी-१७ विमानाने राज्याबाहेरील कोणत्याही सुरक्षितस्थळी हलवण्याची विनंती सरकारकडून करण्यात आली आहे. सविस्तर वाचा...

५.४० - भंडाऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोसे प्रकल्पग्रस्तांचा गोंधळ; पूनर्वसन करण्याची मागणी

भंडारा - शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये गोसे प्रकल्पग्रस्तांनी गोंधळ घातला. आधी पूनर्वसन, नंतर धरण असे नारे लावत सरकारचा निषेध केला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सभास्थळाच्या बाहेर नेले. सविस्तर वाचा..

५.३० - हार्बर मार्गावर लोकलच्या विद्युत वायरवर कोसळला पुलाचा स्लॅब

मुंबई- चेंबूर ते टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या पुलाखालील स्लॅब रेल्वेच्या विद्युत वायरवर पडल्याची घटना घडली. सविस्तर वाचा..

५.१५ - कृष्णा नदीच्या पाण्याचा संजय गांधी नॅशनल पार्कला फटका; पार्क पर्यटकांसाठी बंद

मुंबई- बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) मधून वाहणारी कृष्णा नदी आज (शनिवारी) सकाळी दुथडी भरून वाहू लागल्याने पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सविस्तर वाचा..

४.५० - कृष्णा नदीच्या पाण्याचा संजय गांधी नॅशनल पार्कला फटका; पार्क पर्यटकांसाठी बंद

मुंबई- बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) मधून वाहणारी कृष्णा नदी आज (शनिवारी) सकाळी दुथडी भरून वाहू लागल्याने पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सविस्तर वाचा..

४.३० - कोयना धरणाचे 6 दरवाजे 2 फुटांनी उघडले

सातारा- गेल्या 10 दिवसांपासून कोयना परिसरात सुरू असलेल्या धुवांधार पर्जन्यवृष्ठीमुळे महाराष्ट्राची भाग्यलक्षमी कोयना जलाशयात तब्बल 64 हजार 400 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर 105.25 टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या कोयना जलाशयात शुक्रवारी 89 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. सविस्तर वाचा..

४.०० - केरळ : आयएएस अधिकाऱ्याच्या कारने दिलेल्या धडकेत पत्रकाराचा मृत्यू

तिरुवनंतपुरम- आयएएस अधिकाऱ्याच्या कारने दिलेल्या धडकेमुळे केरळमध्ये दुचाकी चालवत असलेल्या पत्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना घटली आहे. के. एम बशीर (३५) असे मृत्यू झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. सविस्तर वाचा..

३.३० - मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा, नांदेड जिल्ह्यात संततधार सुरू

नांदेड - मराठवाड्यातील अनेक भागात २ ते ८ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या हवामान खात्याने वर्तविली आहे. या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला गेला आहे. सविस्तर वाचा..

३.०० - गंगापूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले, गोदावरी नदीला पूर

नाशिक - पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरण ९० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणातून सकाळी ९ वाजल्यापासून ११,३५८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सविस्तर वाचा..

२.४० - सावधान ! पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर उसळणार 5.88 मी. उंचीच्या लाटा; किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा

पालघर- जिल्ह्याच्या किनारपट्टीवर दुपारी 2.35 मिनिटांनी 5. 88 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सविस्तर वाचा..

२.०० - रत्नागिरीतील पंधरामाड भागात लाटांचे तांडव; धुपप्रतिबंधक बंधारा गेला वाहून

रत्नागिरी- पावसापाठोपाठ आता समुद्रातील लाटांचा फटका मिर्या ते पंधरामाड परिसराला बसत आहे. अजस्त्र लाटांमुळे येथील बंधारा आणि त्यावरील रस्ता पूर्णतः वाहून गेला आहे. सविस्तर वाचा..

१.५० - चांदोलीत अतिवृष्टी कायम; धरण ९१ टक्के भरल्याने वारणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू

सांगली- चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असून धरण ९१ टक्के भरले आहे. यामुळे धरणातून वारणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र पावसाची संततधार सुरूच असल्याने आजपासून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सविस्तर वाचा...

१.३० - नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्यात 4 तरुणी गेल्या वाहून, तिघींचे मृतदेह सापडले

मुंबई- नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्यात ४ तरुणी वाहून गेल्याची घटना घडली आहे. ३ तरुणींचे मृतदेह सापडले असून या तरुणी चेंबूरच्या असल्याची माहिती मिळाली आहे. सविस्तर वाचा...

१.२० - महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चकमक.. सुरक्षा दलाकडून ७ नक्षलवाद्यांचा खात्मा

रायपूर -छत्तीसगड राज्यामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. आत्तापर्यंत ७ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. सविस्तर वाचा..

१.०० - नागपुरात महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांना युवक काँग्रेसने दाखवले काळे झेंडे

नागपूर - शहरात मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. नागपूरच्या टेलिफोन एक्सचेंज चौकात हा प्रकार घडला. सविस्तर वाचा...

१२.४० - भाजप खासदारांचा 'अभ्यासवर्ग' आजपासून सुरू; सोशल मीडियासह नमो अॅपचे मिळणार प्रशिक्षण

नवी दिल्ली - भाजप खासदारांचे २ दिवसीय प्रशिक्षणाला आज (शनिवार) सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा हे खासदारांना प्रशिक्षण देणार आहेत. सविस्तर वाचा...

१२.३० - MUMBAI RAIN UPDATE : मुंबईसह उपनगरात मुसळधार, येत्या 3 तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबई- गेल्या आठवड्यात दाणादाण उडवणाऱ्या मुसळधार पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पुनरागमन केले. सविस्तर वाचा...

१२.०० - सातारा-महाबळेश्वर रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प

सातारा -जिल्ह्यातील सातारा - महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर घाटात सकाळी दरड कोसळली. रस्त्यावर मोठमोठे दगड, मुरूम चिखल आल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. सविस्तर वाचा...

११.४० - हिंगोलीत 'त्या' हृदयद्रावक घटनेची पुनरावृत्ती, रस्त्याअभावी गरोदर महिलेला बाजेवरून पोहोचवले रुग्णवाहिकेत

हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील ग्रामस्थांची रस्त्याअभावी होणारी हेळसांड अद्याप थांबलेली नाही. गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांना चिखल तुडवत प्रवास करावा लागतो. २ ते ३ दिवसांपूर्वीच एका गरोदर मातेला बाजेवरून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली होती. सविस्तर वाचा...

११.२० - पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या तीन तरुणांना हरियाणातून अटक

हरियाणा- राज्यातील हिसार येथील लष्करी भागामध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली पोलिसांनी ३ तरुणांना ताब्यात घेतले आहे. संवेदनशिल माहिती पाकिस्तानला पूरवत असल्याचा संशय त्यांच्यावर आहे. या तिघांकडे लष्करी परिसराचे व्हिडिओ चित्रण आढळून आले आहे. त्यांच्या मोबईलवरुन पाकिस्तानात संपर्क केल्याचे तपासात पुढे आले आहे. सविस्तर वाचा...

११.२२ - गडचिरोलीच्या पर्लकोटाचे पाणी भामरागडच्या बाजारवाडीत; शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटलेलाच

गडचिरोली - जिल्ह्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने पर्लकोटा नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी भामरागडच्या बाजारवाडीत शिरले आहे. त्यामुळे भामरागड आणि तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क शुक्रवारपासून तुटलेलाच आहे. त्यासोबतच अनेक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यावसायिक साहित्य हलवण्यासाठी कसरत करीत आहेत.सविस्तर वाचा...

११.०० - खडकवासला ओव्हरफ्लो; धरणातून 27 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

पुणे - उत्तर पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पाच्या 5 धरणांतील पाणी साठवणूक करणाऱ्या येडगाव धरणात ९५% पाणीसाठा झाला आहे. सांडव्यातून ५ हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग कुकडी नदीत करण्यात आला आहे. सविस्तर वाचा...

१०.२० - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

सातारा- पाटणसह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग आठ दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जलाशयात तब्बल ५८ हजार २१ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. धरणात ८८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजतापासून कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहे. दुपारी १ वाजतापासून धरणामधून २० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सविस्तर वाचा...

१०.०० - ठाण्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

ठाणे- मुंबईसह ठाण्यात दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी सकाळपासुनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ठाण्यातील अनेक सखोल भागात साचले पाणी आहे. तसेच डॉ. आंबेडकर मार्गावरील नाला तुडुंब भरला. त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर आले. रस्त्यावर कंबरेपर्यंत पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहे. शिवाय, ठाणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सविस्तर वाचा...

९.३० - डोंबिवलीत कोसळधार! स्टेशन परिसर पाण्याखाली गेल्याने चाकरमानी परतले घरी

ठाणे- येथील डोंबिवली तसेच उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. कल्याण-डोंबिवलीत रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने फज्जा उडविला आहे. कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याणच्या स्टेशन परिसरात अक्षरशः नद्या वाहू लागल्या आहेत. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या डोंबिवलीकरांना पुढील प्रवास करणे शक्य नसल्याने घरी परतावे लागत आहे. सविस्तर वाचा...

९.०० - मुंबईसह उपनगरात मुसळधार, वेस्टर्न एक्सप्रेसवरील वाहतूक ठप्प

मुंबई- गेल्या आठवड्यात दाणादाण उडवणाऱ्या मुसळधार पावसाने काल मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे, मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रस्ते वाहतुकीवरही परिणाम होत असून, पश्चिम द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली आहे. सविस्तर वाचा...

८.४० - सिंधुदुर्गात संततधार; आंबेरी पूल पाण्याखाली गेल्याने २७ गावांचा संपर्क तुटला

सिंधुदुर्ग- जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी २८.०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. सततच्या पावसाने कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला पूर आल्याने आंबेरी पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे २७ गावांचा संपर्क तुटला आहे. सविस्तर वाचा..

८.३० - खेडमधील दहीवली गावातील जमिनीला पडल्या भेगा, 24 तासांत 41.56 मिमी पावसाची नोंद

रत्नागिरी -अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी जमिनीला भेगा पडण्याचे प्रमाण वाढले आहे. संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यात काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या, त्यानंतर आता खेड तालुक्यातही काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहेत. सविस्तर वाचा...

८.२० - पालघरमध्ये मुसळधार; अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडून वाहतूक बंद

पालघर - शुक्रवारपासून पालघर परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाने मुसंडी मारली आहे. हा पाऊस रात्रभर सुरुच राहिला. पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर आणखी वाढला आहे. या आधीच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. पावसाची तीव्रता आता वाढण्याची शक्यता असून सध्या 45 किमी प्रति तास वारे वाहत आहेत. साधारण 10.30 सायंकाळी 4 वाजेपर्यंत हा वेग 50kms/hr हुन अधिक राहण्याची शक्यता आहे . सविस्तर वाचा...

८.१० - सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये सोपोरो भागात चकमक सुरु, एक जवान जखमी

८.०५ - मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात पुन्हा कोसळली दरड; वाहतूक ठप्प

रायगड- मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पोलादपूर पोलीस स्टेशन हद्दीमधील मौजे चोळई येथे ही घटना घडली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी रोडवरील माती काढण्याचे काम सुरू आहे. याच महामार्गावर शुक्रवारीही कशेडी घाटातील धामणदेवी येथे दरड कोसळली होती. सविस्तर वाचा...

८.००- ठाणे महापालिकेत फिरताहेत रिव्हॉल्वरधारी, मुख्यालयातील सुरक्षेचे तीन तेरा

ठाणे- महापालिकेच्या व्हीआयपी प्रवेशद्वारातून कंबरेला रिव्हॉल्वर लटकवून एक आगंतुक व्यक्ती थेट महापालिकेत शिरल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. त्यानंतर हा रिव्हॉल्वरधारी व्यक्ती बराच वेळ महापौर व इतर बड्या पदाधिकाऱ्यांची कार्यालये असलेल्या पहिल्या मजल्यावर रिव्हॉल्वरचे प्रदर्शन करीत फिरतांना असल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिकेची सुरक्षाव्यवस्था ढिसाळ झाल्याचा प्रत्यय आला आहे. सविस्तर वाचा

७.४५ - काट्याने काटा काढायला आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलोय का, कल्पनाराजेंचा शिवेंद्रराजेंना सवाल

सातारा -माझा काटा काढायचा प्रयत्न झाल्यास काट्याने काटा काढू, असा अप्रत्यक्ष इशारा भाजपचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधकांना दिला होता. याला उत्तर देताना काट्याने काटा काढायला आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलोय का? असे वक्तव्य करत आज कल्पनाराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे यांचा समाचार घेतला. सविस्तर वाचा...

Last Updated : Aug 3, 2019, 11:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details