महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Lata Mangeshkar Reaction : भारतीय संगीतातील तारा निखळला; मान्यवरांनी व्यक्त केल्या शोक संवेदना - lata mangeshkar passes away

lata
lata

By

Published : Feb 6, 2022, 10:41 AM IST

Updated : Feb 6, 2022, 5:30 PM IST

17:24 February 06

मराठी भाषेवर निस्सीम प्रेम - प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर प्रतिक्रिया

17:21 February 06

लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात पोकळी - बिद्या देवी भंडारी

14:17 February 06

अनेक सामाजिक विषयांवर होते लक्ष - नीलम गोह्रे

पुणे :-देशांच्या आणि जगाच्या गानसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर यांचे आजारामुळे निधन झालेले आहे. त्यांनी त्यांचे आयुष्य संगीताला समर्पित केलं होतं. देश आणि देवावर निष्ठा त्याचबरोबर माणुसकी, सकारात्मक दृष्टिकोन, प्रचंड परिश्रम, कामावर असणारी निष्ठा आणि सहृदय व्यक्तित्व असा अभूतपूर्व संगम त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या मध्ये झाला होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे तसेच शिवसेना यांच्याशी त्यांचे स्नेहाचे, प्रेमाचे आणि घरगुती स्नेहाचे संबंध होते, अशी भावना उपसभापती नीलम गोह्रे यांनी व्यक्त केली.

14:16 February 06

14:00 February 06

सता मंगेशकरांचा चिरतरुण आवाज कायम लोकांच्या स्मरणात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

13:40 February 06

आवाजाची निसर्गदत्त देणगी - आरोग्यमंत्री राजेश टोपे

लता मंगेशकर या गॉड गिफ्टेड व्यक्तिमत्त्व होत्या.लता मंगेशकर यांच्या निधनामुळे अवघ्या जगाला दुःख झालं आहे. त्या जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या स्वरांच्या माध्यमातून त्या नेहमीच आपल्यासोबत राहतील अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिलीय.गेल्या महिनाभरापासून मी त्यांच्या तब्बेतीची नियमित विचारपूस करत होतो. त्या कोरोना आजारातून बऱ्या झाल्या होत्या. मात्र इतर आजारांमुळे त्यांची तब्बेत खालावत गेल्यानं त्यांचं दुर्दैवाने निधन झालं त्यांना चिरशांती लाभो अशा शब्दांत टोपे यांनी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली.

13:37 February 06

लता मंगेशकर यांचे मोठे योगदान - राजनाथ सिंग

13:24 February 06

लता दिदींच जाणे म्हणजे एका युगाचा अंत आहे - मंत्री यशोमती ठाकूर

यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

अमरावती : .लता दिदींच जाणं म्हणजे एका युगाचा अंत आहे. त्यांचा आवाज, त्यांचा स्वर, तसेच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी गायलेली गाणे तसेच त्यांचं देशावर असलेलं प्रेम हे नेहमीच आठवणीत राहील. जब तस सुरज चांद रहेगा लतादीदी है तुम्हारा नाम रहेगा लता दीदी तुम्हाला नाम रहेगा अशा शब्दांत मंत्री यशोमती ठाकूर यांनी दुःख व्यक्त केलं आहे

13:22 February 06

संगीताचे सूर हरपले - अशोक चव्हाण

अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

12:53 February 06

लता मंगेशकरांचे जीवन हे संगीताला वाहिलेले - अमित शाह

12:44 February 06

लता मंगेशकरांचे जाणे दु:खद - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

12:36 February 06

लतादिदींच्या जाण्यानं बाळासाहेबानंतरचा मोठा आघात- रश्मी ठाकरे

मुंबई - लतादिदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या, सगळ्या सुख दुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दिदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठाआघात झाला आहे. बाळासाहेब असतांना आणि नंतर देखील लतादिदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दिदींचा फोन नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दिदी आज आपल्यात नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

12:32 February 06

भारतरत्न लता मंगेशकरांचे जाणे दु:खदायक - योगी आदित्यनाथ

12:29 February 06

लतादीदींच्या गाण्याने स्वर, भाषा, प्रांत यांच्या सीमा पार केल्या - ओम बिर्ला

12:26 February 06

जगाची ओळख लता दिदींच्या माध्यमातून झाली - राज्यमंत्री बच्चू कडू...

बच्चू कडू प्रतिक्रिया

अमरावती : महाराष्ट्रच नाही तर जगाची ओळख लता दिदींच्या माध्यमातून झाली आहे. अत्यंत सुरेख आवाज आणि नम्रता त्यांच्यात होती. त्यांचा आवाज जेवढा गोळा होता तेवढंच त्यांचं जीवन सुंदर होत. दीदींनी त्यांच्या सुरेख आवाजाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नाव मोठे केले अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

12:23 February 06

लता मंगेशकरांच्या जाण्याने संपूर्ण देश शोकाकुल - मोहन भागवत

लता दीदींच्या जाण्याने प्रत्येक भारतीयाच्या मनात जी पोकळी आणि वेदना निर्माण झाली त्या भावना शब्दात वर्णन करण कठीण आहे. आठ दशकाहून जास्त भारतीयांच्या मनावर स्वरवर्षा करत त्यांना तृप्त करत चाललेला 1तो आनंदघन आता बरसणार नाही. लतादीदीचा आयुष्य सुचिता आणि साधनेची तपश्चर्या याचा मूर्तिमंत उदाहरण आहे.
संगीत क्षेत्रातील त्यांची साधना आणि आठ दशक गायन केल्यानंतर ही विश्वमान्यता मिळाल्यानंतर ही प्रत्येक गाण्याच्या तयारी करता एक एक बारीक गोष्टीकडे त्या लक्ष द्यायच्या. त्यांचे जीवन सर्वांगीण दृष्टीतून पवित्रता आणि तपश्चर्येचा उदाहरण होते. लता दीदी त्यांच्या स्वरांच्या स्वरूपाने अमर राहतील. मात्र, पार्थिव रूपाने ते नसतील. त्यांना गाताना दृश्य स्वरूपात आता पाहता येणार होणार नाही. आपण एका अनुभवाला पोरके झालो आहे. या शब्दात मोहन भागवत यांनी शोक व्यक्त केले.

12:10 February 06

अतुलनीय सूरांनी केले अनेक पिढ्यांवर राज्य - अमित देशमुख

अमित विलासराव देशमुख

मुंबई - "लता दीदींनी आपल्या अतुलनीय सूरांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींच्या अनेक पिढ्यांना पडद्यावर आवाज देऊन त्यांचे व्यक्तिमत्व खुलविले. प्रत्येक भारतीयाच्या मनातील विविध भावभावना त्यांनी आपल्या गायनातून चपखलपणे व्यक्त केल्या. प्रदीर्घ काळ पार्श्वगायन क्षेत्रावर त्यांची मोहिनी होती आणि पुढेही राहील. देशाप्रती अत्यंत अभिमान असलेल्या लतादीदी संपूर्ण विश्वात भारताचा अभिमान म्हणून आदरास प्राप्त झाल्या. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. लतादीदींशी देशमुख कुटुंबीयांचे निकटचे संबंध होते. ", असेही अमित देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

12:07 February 06

आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला - देवेंद्र फडणवीस

भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही. ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे अशी भावना राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ऐ मेरे वतन के लोगो’तून प्रत्येकाच्या अश्रूंना वाट मोकळी करून देण्याचे सामर्थ्य ज्यांच्या सुरांमध्ये होते. तसेच अनेकांच्या आयुष्यातील स्वप्नांना आणखी उंच भरारी घेण्यासाठी बळ देण्याचे काम लतादिदींच्या सुरांनी केले. वृद्ध असो की तरुण लतादीदींच्या सुरात रममाण न होणारा विरळाच, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या.

12:04 February 06

थम गया सुरों का कारवां - छगन भुजबळ

लतादीदींच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी असून त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. दिदींच्या जाण्याने संगीतातले एक पर्व संपले.
लता मंगेशकर म्हणजे संगीतातील पूर्णविराम. त्याच्या गायनाने फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील संगीतप्रेमीं मंत्रमुग्ध होत असत. म्हणूनच त्यांना संगीतातील गानसरस्वती म्हटले जायचे. आज लतादीदी यांचे निधन झाले असले तरी संगीताच्या माध्यमातून त्या कायमच अजरामर राहतील. "नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज़ ही पहचान है ग़र साथ रहे… !" लतादीदी यांनी गायलेल्या या गाण्याप्रमाणे आज शरीराने जरी त्या नसल्या तरी त्यांचे स्वर कायम आपल्यात राहतील. लतादीदी यांच्या निधनाने मंगेशकर कुटुंबियांवर व संगीतप्रेमींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला.

11:03 February 06

एक चंद्र एक सूर्य एक लता दीदी - मुंबई महापौर किशोरी पेडणेकर

तेरे बिना क्या जीना
एक चंद्र एक सूर्य एक लता दीदी. भारतीय संगीत विश्व आज खऱ्या अर्थाने पोरकं झालं. चार पिढ्यांचा सूर हरपला आहे आजचा दिवस संपूर्ण देशाला दुःखद आणि वेदना देणारा दिवस आहे. अशा शब्दात मुंबई महापौर किशोरी पेडणेकर प्रतिक्रिया व्यक्त केली.

11:02 February 06

लता दीदींचे संगीत अंतरात्म्याला जागवणारे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई - भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ही देशातील प्रत्येक कुटुंबाकरिता दुःखद बातमी आहे. हा दिवस अटळ आहे हे माहिती असून देखील हा दिवस येऊच नये असे वाटत होते, अशा दुःखद भावना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केल्या. भारतरत्न लता मंगेशकर यांचे संगीत देश, भाषा व काळ यांच्या सीमा उल्लंघून थेट अंतरात्म्याला जागवणारे होते. आपल्या भावगीतांनी ईश्वराला जागविण्याची, प्रेमगीतांनी तरुणाईला खुलवण्याची, देशभक्तीपर गीतांनी जवानांना स्फुरण देण्याची तर प्रेमळ अंगाईगीतांनी तान्हुल्यांना निजविण्याची अद्भुत जादू त्यांच्या स्वरात होती.

10:59 February 06

संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळला - NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

मुंबई -भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. अनेक दशकं भारतात आणि भारताबाहेर संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज आज हरपला आहे. संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळल्याची भावना आहे. लता दीदी जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी गायलेली गीते आपल्यात कायम राहतील. मला आठवतंय की एक वेळ होती, जेव्हा सकाळी रेडिओ ऑन करून दिदींच्या आवाजाने अनेकांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. त्यांनी गायलेले 'ए मेरे वतन के लोगो' या गीताने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. ज्या आवाजाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केले, ते स्वर आणि सूर आता दिदींच्या स्मृती सदैव तेवत ठेवेल. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो, अशा शब्दात जयंत पाटील यांनी शोक व्यक्त केला.

10:56 February 06

संगीतविश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न भंगल - अजित पवार

पुणे - लतादिदींच्या निधनानं संगीतविश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न भंगलं. संगीत विश्वातला स्वर्गीय सूर हरपला. लतादिदींच्या निधनानं महाराष्ट्र आणि देशातल्या प्रत्येक घरात शोकाकूल वातावरण आहे. लतादिदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील. परंतु लतादिदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादिदी आद्वितीय होत्या. अशी गानकोकीळा पुन्हा होणे नाही. महाराष्ट्रकन्येच्या निधनानं देशाची हानी झाली आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रध्दांजली वाहिली.

10:52 February 06

लता मंगेशकर यांचं गीत अजरामर राहील - किरीट सोमैय्या

आपल्या घराघरातील व्यक्ती गेली आहे. लता मंगेशकर यांचं गीत अजरामर राहणार आहे. ऐ मेरे वतन के लोग म्हणणाऱ्या लता ताई आज आपल्यातुन निघून गेल्याची प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

10:38 February 06

लतादीदींच्या निधनाचे वृत्त वेदनादायी - सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे ट्विट

10:37 February 06

अलौकिक स्वर हरपला - शरद पवार

शरद पवार ट्विट

जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील.

10:00 February 06

माझे दु:ख शब्दात व्यक्त करू शकत नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

मी माझे दु:ख शब्दात व्यक्त करू शकत नाही. दयाळू आणि सर्वांची काळजी करणाऱ्या लतादीदी आपल्या सगळ्यांना सोडून गेल्या आहेत. येणाऱ्या पिढीला त्यांच्या गोष्टी आठवतील.

Last Updated : Feb 6, 2022, 5:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details