महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Landslide In Mumbai : सायन चुनाभट्टी येथे एका चाळीवर दरड कोसळली; ३ जण जखमी - landslide in sion

सायन चुनाभट्टी ( Sion Chunabhatti ) येथे एका चाळीवर दरड कोसळून ( landslide ), ३ जण जखमी झाले आहेत. चुनाभट्टी येथील स्वदेशी मिल ( Indigenous mill ) जवळच्या परिसरात कसाई वाड्यात मोठा डोंगर आहे. या डोंगराच्या पायथ्याशी मोठया प्रमाणात झोपटपट्टी वसलेली आहे. तीन दिवस पावसाची संततधार सुरु असल्याने बुधवारी या डोंगरावरील दरडीचा मोठा भाग तीन घरावर ( Dardi collapsed on three houses. ) कोसळला. यात शुभम सोनवणे (१५), प्रकाश सोनावणे (४०), सुरेखा वीरकर ( २०) असे एकूण तीन जण जखमी झाले.

Three people were injured in a landslide at Sion Chunabhatti
सायन चुनाभट्टी येथे एका चाळीवर दरड कोसळून, ३ जण जखमी

By

Published : Jul 6, 2022, 8:06 PM IST

मुंबई -मुंबईमध्ये जूनपासून पाऊस पडतो. पावसाळा सुरु झाला की पडझडीच्या घटनांचे सत्र सुरु होते. यात अनेकांचा मृत्यू होतो, काही जखमी होतात. पहिल्याच पावसांत वांद्रे येथे घर कोसळून एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांतच कुर्ला येथे तीन मजली इमारत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला. या घटना ताज्या असतानाच सायन चुनाभट्टी ( Sion Chunabhatti ) येथे एका चाळीवर दरड ( landslide ) कोसळून ३ जण जखमी झाले आहेत.

Landslide In Mumbai : सायन चुनाभट्टी येथे एका चाळीवर दरड कोसळून, ३ जण जखमी

३ जण जखमी -चुनाभट्टी येथील स्वदेशी मिल जवळच्या परिसरात कसाई वाड्यात मोठा डोंगर आहे. या डोंगराच्या पायथ्याशी मोठया प्रमाणात झोपटपट्टी वसलेली आहे. येथे यापूर्वी अनेक पावसाळ्यात दरड कोसळून काहींना जीव गमवावा लागला आहे. सातत्याने येथे दरड किंवा दरडीसह मोठा दगड कोसळण्याच्या घटना घडत आल्या आहेत. दोन - तीन दिवस पावसाची संततधार सुरु असल्याने बुधवारी या डोंगरावरील दरडीचा मोठा भाग तीन घरावर कोसळला. यात शुभम सोनवणे (१५), प्रकाश सोनावणे (४०), सुरेखा वीरकर ( २०) असे एकूण तीन जण जखमी झाले. प्रकाश सोनवणे यांच्या हाताला व पायाला जबर दुखापत झाली आहे तर सुरेखा वीरकर यांच्या डोक्याला मार लागला आहे. अग्निशमन दल, पोलीस व पालिका कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. जखमींना शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

हेही वाचा -Shinde-Fadnavis Ministry Expansion : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार 'या' तारखेनंतर होणार

महिनाभरात २६ जणांचा मृत्यू -मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात समुद्रात बुडणे, मॅनहोलमध्ये पडून मृत्यू होणे, दरड कोसळून, इमारती घरे झाडे विजा कोसळून मृत्यू होतात. तसेच काही जण जखमी होतात. यंदा मुंबईत ११ जूनला पावसाला सुरुवात झाली. तेव्हापासून मुंबईत पावसाळ्यामुळे होणाऱ्या दुर्घटनांना सुरुवात झाली आहे. जून महिन्यात एकूण ६०८ दुर्घटनांची नोंद झाली आहे. त्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून ५३ जण जखमी झाले आहेत. जून महिन्यात घर आणि इमारती कोसळण्याच्या ५३ घटना नोंद झाल्या. त्यात २३ जणांचा मृत्यू झाला असून ४७ जण जखमी झाले आहे. झाड कोसळण्याच्या ३२५ घटना नोंद झाल्या. त्यात ४ जण जखमी झाले आहेत. दरडी कोसळण्याच्या ६ घटना नोंद झाल्या त्यात २ जण जखमी झाले आहे. शॉर्टसर्किटच्या २१३ घटना नोंद झाल्या. तर वीज कोसळण्याच्या ११ घटना नोंद झाल्या असून त्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरडी कोसळणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांना प्रशिक्षण -मुंबईमध्ये मागील वर्षी चेंबूर आणि विक्रोळी येथे दरडी कोसळून ३० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. मुंबईत दरडी कोसळू शकतात अशा ७२ ठिकाणांचा समावेश आहे. याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. या ठिकाणांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. अशा ठिकाणी दुर्घटना घडल्यावर त्याठिकाणी बचाव पथक पोहचण्यास काही कालावधी लागतो. दुर्घटना घडल्यापासून बचाव पथक पोहोचण्याच्या काळात नागरिकांची पळापळ असते. अशा वेळी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे, त्यांना प्रथोमोपचार देणे याचे १० हजार नागरिकांना प्रशिक्षण दिले जात आहे अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी दिली.

हेही वाचा -Maharashtra Rain Live : चुनाभट्टीत चाळीवर दरड कोसळली, ३ जण जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details