महाराष्ट्र

maharashtra

Lalu Prasad Yadav's Holi : तब्येत खराब असल्याने लालू प्रसाद यादव यांची होळी रुग्णालयातचं

By

Published : Mar 20, 2022, 9:04 AM IST

राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या निवासस्थानी प्रत्येक वर्षी मोठ्या धुमधडाक्यात होळी साजरी केली जाते. यामध्ये पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह असंख्य लोक उत्सवात भाग घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी करत असतात. परंतु, यावेळी लालू यांची तब्येत खराब असल्याने त्यांची होळी साजरी झाली नाही. त्यांना रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याने ते होळी साजरी करू शकले नहीत.

आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव
आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव

Ranchi:होळीच्या दिवशी जेव्हा राजकारण्यांची चर्चा होते तेव्हा त्यात लालूप्रसाद यादव यांची चर्चा नक्कीच होते. मात्र, लालुप्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरले आहेत. दरम्यान, त्यांच्यावर रांची येथील रिम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. काल सर्वत्र होळी साजरी झाली. मात्र, लालूकडे कोणी भेटण्यासाठी आले नाही. मात्र, तब्येत खराब असल्याने त्यांना या वर्षीची होळी साजरी करता आली नाही. तसेच, डॉक्टरांनीही त्यांच्यावर काही निर्बंध घातले आहेत.

अनेक लोक या उत्सवात भाग घेण्यासाठी त्यांच्या घरी येतात

लालू यांच्या आयुष्यात रंगांचा सण होळीला विशेष महत्त्व आहे. ते दरवर्षी पाटणा येथील त्यांच्या निवासस्थानी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह अनेक लोक या उत्सवात भाग घेण्यासाठी त्यांच्या घरी येतात. मात्र, यावेळी चारा घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर त्यांना हा उत्सव साजरा करता आला नाही.

कॉल करण्यासंबंधी कोणताही अर्ज प्राप्त झाला नाही

लालू प्रसाद यादव यांना रिम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. शुक्रवार (दि. 18 मार्च)रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत रिम्सच्या पेइंग वॉर्डाबाहेर पाहुण्यांची हालचाल नव्हती. बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंग अधीक्षक हमीद अख्तर यांनी ईटीव्ही भारत'ला फोनवर सांगितले, की लालू यादव यांना कॉल करण्यासंबंधी कोणताही अर्ज प्राप्त झाला नाही. वास्तविक, लालू यादव यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस दलाकडे पाहुण्यांचे अर्ज सादर केले जातात.

होळीच्या दिवशी कोणाच्याही नावाला मंजुरी देण्यात आलेली नाही

अनेक अर्जांपैकी लालू यादव यांच्या मंजुरीनंतर दर आठवड्याला फक्त दोन लोकांना भेटण्याची परवानगी आहे. ही माहिती तुरुंग व्यवस्थापनापर्यंत पोहोचते आणि पाहुण्यांची अंतिम नावे ठरवली जातात. मात्र, होळीच्या दिवशी कोणाच्याही नावाला मंजुरी देण्यात आलेली नाही. तुरुंग अधीक्षकांनी सांगितले की, त्यांच्याकडे अर्ज आल्यास ते त्यांना लालूंना भेटायला नक्कीच परवानगी देतील.

यंदा होळी जारात साजरी होईल असे वाटले होते

गेल्या वर्षी लालू यादव यांचे बंधू महावीर यादव यांच्या निधनामुळे होळी साजरी झाली नाही. परंतु, यावेळी त्यांचे अनुयायी, पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी होळीच्या आनंदाची अपेक्षा केली होती. कारण त्यांचा धाकटा मुलगा आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांचे गेल्या वर्षी लग्न झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा होळी जारात साजरी होईल असे वाटले होते. मात्र, लालू यांची तब्येत ठीक नसल्याने हे होऊ शकले नाही.

हेही वाचा -World Oral Health Day : तोंडाची स्वच्छता कशी ठेवणार? वाचा ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details