महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

संजय राऊतांच्या वक्तव्यांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता - दरेकर - मुंबई न्यूज अपडेट

शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा असतील. पण महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष टिकलं तर मुख्यमंत्रीपदासाठी 'वाटा' की 'घाटा' असा प्रश्न निर्माण होईल. कारण, आताच राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपला मुख्यमंत्री व्हावा म्हणून तयारीला लागले आहेत. मुख्यमंत्रीपदाची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सुप्त भावना आणि नाना पटोले यांची इच्छा लपून राहिलेली नाही. अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

प्रविण दरेकर
प्रविण दरेकर

By

Published : Jun 13, 2021, 9:54 PM IST

मुंबई -शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा असतील. पण महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष टिकलं तर मुख्यमंत्रीपदासाठी 'वाटा' की 'घाटा' असा प्रश्न निर्माण होईल. कारण, आताच राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपला मुख्यमंत्री व्हावा म्हणून तयारीला लागले आहेत. मुख्यमंत्रीपदाची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सुप्त भावना आणि नाना पटोले यांची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यामुळे ५ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील, या संजय राऊतांच्या वक्तव्यात आत्मविश्वासाची कमतरता दिसून येत असल्याचा पलटवार विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील राजकारण वेगळं आहे, येथे टोकाची भूमिका नसते, असं सांगून चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावर बोलताना दरेकर म्हणाले, संजय राऊत बोलतात त्याप्रमाणे त्या गोष्टी आचरणात येताना दिसत नाहीत. खरं तर टोकाचं राजकारण आपल्या वक्तव्यांमधून प्रसार माध्यमांमार्फत कुणी नेलं असेल तर ते संजय राऊत यांनीच नेलं आहे. पक्ष विचारधारा आणि वैचारिक बैठक बदलतो तेव्हा सत्तेचा क्षणिक फायदा होतो. परंतु येणाऱ्या काळात सोडलेल्या विचारांची किंमत मोजावी लागते, असंही दरेकर यांनी म्हटले आहे.

राजकारण कधीच चंचल नसते - दरेकर

राजकारण चंचल असतं, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं, या चंचल राजकारणाचा फायदा भाजपा करून घेणार का, यावर बोलताना दरेकर म्हणाले की, राजकारण कधीच चंचल नसतं, राजकीय नेते चंचल असतात. त्यामुळे राजकारण चंचल होताना दिसतं. एकावेळी राजकारण चंचल झाले तरी चालेल, मात्र आपली विचारधारा चंचल झाली तर फार अडचण होते. कोणत्याही पक्षाचा पाया हा स्वीकारलेली विचारधारा आणि वैचारिकता हा असतो. राजकारण चंचल झालं म्हणण्यापेक्षा आपली विचारधारा विचलित झाली आहे का याचे आत्मपरीक्षण करायला हवे असा टोला देखील यावेळी दरेकरांनी लगावला आहे.

हेही वाचा -अकोल्याच्या पातूरमध्ये काही गावांमध्ये पेरणीला सुरुवात, कपाशीवर शेतकऱ्यांचा जोर; घाई नको, कृषी विभाग

ABOUT THE AUTHOR

...view details