महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आता बांध फुटला.. मजुरांची मूळ गावी परतण्यासाठी गर्दी! - mumbai lockdown news

वांद्रे स्थानकाजवळ परराज्यातील हजारो मजुरांनी एकाच वेळी गर्दी केल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र हे गर्दीचे लोण मुंब्र्यातून मुंबईत पसरले असल्याची जोरदार चर्चा आहे.

mumbai corona news
आता बांध फुटला.. मजुरांची मूळ गावी परतण्यासाठी गर्दी!

By

Published : Apr 14, 2020, 8:25 PM IST

मुंबई - वांद्रे स्थानकाजवळ परराज्यातील हजारो मजुरांनी एकाच वेळी गर्दी केल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र हे गर्दीचे लोण मुंब्र्यातून मुंबईत पसरले असल्याची जोरदार चर्चा आहे.

मागील 21 दिवस लॉकडाऊन असल्याने मुंबईतील अनेक भागात लाखो परराज्यातील मजूर अडकून पडले. काहींना जाण्यासाठी गाड्या मिळाल्या;तर काहींना आहे त्याच ठिकाणी अडकून पडावे लागले. ठाण्यातील मुंब्रा परिसरात लॉकडाऊन पायदळी तुडवत अचानक हजारो मजुरांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. मूळ गावी परत जाण्याची मागणी त्यांनी केली. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थान या भागात परत पाठवण्यासाठी सकरारकडे त्यांनी आग्रह धरला. याचेच लोण पूर्ण मुंबईत पसरल्याचे चित्र आहे.

पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवून शिष्टाईने मुंब्र्यात झालेली गर्दी पांगवली. मात्र हाच प्रकार मुंबईत घडेल, असे याचा अंदाज पोलिसांना आला नाही. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details