मुंबई - सहप्रवाशासोबत गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत नुकतेच हवाई उड्डाण कंपन्यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला हवाई प्रवास बंदी घातली. त्यामुळे कुणाल कामरा चर्चेत आला होता. त्यात आता कुणालने चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वडापाव भेट म्हणून पाठवला आहे. त्याची माहिती आणि फोटो त्यानी आपल्या ट्विटरवरून दिली आहे.
हेही वाचा... 'ही मुलाखत म्हणजे २ पोपटांची जुगलबंदी, मुख्यमंत्री अजित पवारांच्या दबावात'
कुणाल कामराचा 'शट अप या कुणाल' हा शो सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. यामध्ये कुणाल वेगवेगळ्या व्यक्तींसोबत संवाद साधतो. आता कुणालने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आमंत्रित केले आहे. कुणालने सोशल मीडियावर याबाबत लिहीले आहे. त्याने राज यांना एक पत्र लिहीले आहे. यात त्याने, 'माझा अभ्यास पूर्ण झाला आहे. तुम्हाला किर्ती महाविद्यालयाजवळील वडापाव आवडतो. मी तुम्हाला लाच म्हणून वडापाव आणला आहे. किमान आता तरी तुम्ही माझ्या कार्यक्रमात येण्यासाठी वेळ द्यावी', अशी विनंती कुणालने राज यांना पत्राद्वारे केली आहे.
हेही वाचा... मनसेने मोर्चाचा मार्ग बदलला; सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी नाकारली परवानगी
राज ठाकरे यांनी कार्यक्रमासाठी वेळ द्यावी, म्हणून आपण एक प्रकारची लाच देत आहोत, असे कुणालने लिहीले आहे. तसेच माझ्या या भेटीचा आपण प्रेमाने स्वीकार करावा, अशी विनंतीही त्याने केली आहे. कुणालने राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या घराबाहेर हातात वडापाव आणि पत्र घेतलेला फोटो ट्विट केला आहे. आपल्या ट्विटमध्ये कामरा यांनी, 'माझ्या कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांना आणण्यासाठी मी काहीच प्रयत्न करत नाही, असे माझ्या चाहत्यांना वाटते. माझी मेहनत त्यांना कळावी, यासाठी मी हे ट्विट केले असल्याचे कामरा यांनी स्पष्ट केले.