महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Koyna Water To Alibaug New Mumbai : कोयनेचे पाणी अलिबाग - नवी मुंबईला वळवणार : जलसंपदामंत्र्यांची घोषणा - जलसंपदा मंत्री जयंत पाटील

कोकणातील सिंचन, बिगर सिंचन क्षेत्रासाठी कोयना अवजलाचा वापर करणेबाबत शिवसेना आमदार सुनिल शिंदे ( MLC Sunil Shinde ) यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी ( Water Resources Minister Jayant Patil ) मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार कोयनेचे पाणी अलिबाग - नवी मुंबईला वळविण्यात येणार असल्याचे त्यांनी ( Koyna Water To Alibaug New Mumbai ) सांगितले.

जयंत पाटील
जयंत पाटील

By

Published : Mar 25, 2022, 10:55 PM IST

मुंबई - कोकणात जलविद्युत प्रकल्पातून 67.5 घनमीटर पाणी नंतर कोकणात सोडण्यात येते. त्यापैकी समुद्रात वाहून जाणारे बहुतांश पाणी अलिबाग आणि नवी मुंबई विभागात वळवण्यात ( Koyna Water To Alibaug New Mumbai ) येईल, अशी घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Water Resources Minister Jayant Patil ) यांनी आज विधान परिषदेत केली.



समितीचा अहवाल आल्यावर पुढील कार्यवाही : कोकणातील सिंचन, बिगर सिंचन क्षेत्रासाठी कोयना अवजलाचा वापर करणेबाबत शिवसेना आमदार सुनिल शिंदे ( MLC Sunil Shinde )यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. कोकणातील कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटी ग्रीडद्वारे सिंचन, बिगर सिंचन पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी व्यापकशाला काम देण्यात आले आहे. सविस्तर अहवाल पूर्ण झाल्यावर कोयनेच्या पाण्याचा वापर करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येईल. कॉरिडॉरच्या माध्यमातून हे पाणी अलिबाग ते नवी मुंबईला वळवण्याबाबत अभ्यास सुरू आहे. याचा अभ्यास करून आढावा घेतल्यानंतर कोकण पाटबंधारे महामंडळाला तातडीने सूचना दिल्या जातील, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.


रिक्त जागा भरणार :राज्यात जलसंपदा विभागात 4075 पदे रिक्त असून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 करीता विभागाकडून पाठवण्यात आलेल्या 581 पदांकरिता ऑक्टोबर 2019 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुलाखती घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2020 करिता 117 पदांकरिता मुलाखती घेतल्या होत्या. परंतु परीक्षांमधून आयोगास अद्याप उमेदवारांच्या शिफारसी विभागाकडे प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे उर्वरित रिक्त पदांसाठी एप्रिल 2022 मध्ये जलसंपदा विभागातील विविध रिक्त पदांकरिता भरती करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details